60 सेकंदात समजेल तुमच्या नावावर किती सिमकार्ड

60 सेकंदात समजेल तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत या विषयी सविस्तर माहिती.

सध्या सायबर गुन्हेगारी ही वाढत चालली आहे आणि ऑनलाईन फ्रॉड देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सायबर गुन्हेगार लिंक किंवा एसएमएस पाठवतात व त्याद्वारे तुम्हाला फसवण्यात येते. काही वेळेस अशा प्रकारच्या प्रकरणात हॅकर तुमच्या नावावर सिम कार्ड बनवतो व त्याद्वारे दुसऱ्या व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न करतो. In 60 seconds you will know how many SIM cards are in your name

म्हणूनच कोणी तुमच्या नावाचे सिम कार्ड वापरून इतर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची फसवणूक करत नाही ना? याविषयी तुम्ही सावधान राहायला हवे. तुम्हाला माहित असायला हवे की तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत. कोणी दुसऱ्या व्यक्ती तर तुमच्या नावाचे सिमकार्ड वापरत नाही आहे ना?

हे ही वाचा: (PMJJBY) 2 लाखांचा विमा फक्त 20 रुपयांत सरकारची अनोखी योजना !

पूर्वी तुम्हाला तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ही माहिती मिळवता येत नव्हती परंतु आता हे शक्य झाले आहे. आता फक्त काही सेकंदात केवळ तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत तुम्ही 60 सेकंदात म्हणजेच एका मिनिटात माहिती करून घेऊ शकता.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहेत हे समजण्यास सोपे झाले आहे.एखाद्या वेळेस हॅकर ने तुमच्या नावाचे सिम कार्ड वापरून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची फसवणूक केली तर ? त्यासाठी केंद्र सरकारने संचार सारथी पोर्टलची निर्मिती केली आहे. या संचार सारथी पोर्टलच्या मदतीने तुम्ही लगेच काही सेकंदात माहिती करून घेऊ शकतात.

या पोर्टलच्या मदतीने तुम्ही तुमच्या नावावर किती सिमकार्ड सुरू आहेत ही माहीत घेतल्यानंतर नंतर लगेच तुमच्या नावावर चालू असणारे किंवा बंद असणारे सिम कार्ड त्याच क्षणी बंद करू शकता.

हे ही वाचा: विक्रमवीर गणेश लोहारांनी केली 2700 कि.मी.व्हर्च्युअल सायकलिंग.

तुम्हाला जर संचार सारथी पोर्टलच्या मदतीने तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे माहित करायचे असेल तर खालील गोष्टी कराव्या:-

  • सर्वप्रथम tafcop.sancharsaathi.gov.in या वेबसाईटवर जा.
  • नवीन पेज उघडा त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाका.
  • आता तर पेजवर कॅपचा कोड नोंद करा.
  • आता तुमचा नंबर वर एक ओटीपी येईल तो भरा आता या पोर्टलवर तुमचे लॉगिन झाले असेल.
  • आता तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहेत याची माहिती तुम्हाला आली असेल.

हे ही वाचा: WhatsApp वर अशी सेटिंग सुरू असेल तर फोन हॅक होऊ शकतो | संरक्षण असे करा.

यामध्ये तुमच्या नावावर एखादा वेगळा मोबाईल नंबर दिसत असेल तर त्या नंबरला तुम्ही बंद करू शकता.

अशाप्रकारे संचार सारथी पोर्टलच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन फ्रॉडच्या पासून वाचू शकतात.

Leave a Comment