तुमच्या Aadhar Card चा वापर दुसरा कोणी वापरत असेल का ? असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील ते तुम्ही कसे तपासाल या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
Aadhar Card हे खूप महत्त्वाचे रेकॉर्ड असते.आधार कार्ड हे आपले ओळख असते. तुम्ही तुमचा Aadhar Card कुठे वापरतात किंवा कोणत्या उद्देशाने वापरतात याची माहिती नोंद असते. तुम्ही तुमचे Aadhar Card कुठेही वापरता तेव्हा त्याचा रेकॉर्ड तयार केला जातो.
या रेकॉर्डमुळे तुमचे Aadhar Card दुसरे कोणी वापरत आहे की नाही हे सहज करू शकते त्यासाठी तुम्हाला हे समजण्यासाठी ऑनलाईन कसे तपासायला हवे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
हे ही वाचा: (PMJJBY) 2 लाखांचा विमा फक्त 20 रुपयांत सरकारची अनोखी योजना !
तपासण्याची प्रक्रिया

- सुरुवातीला तुम्हाला uidai वेबसाईट https://uidai.gov.in वर जा.
- त्यानंतर तुम्हाला तेथे ‘Aadhaar Authentication history’ चा पर्याय दिसेल व तुम्हाला त्याच्यावर क्लिक करावे लागेल.
- या पर्यायावर तुम्हाला ‘My Aadhaar’ tab मध्ये दिसेल.
- किंवा तुम्ही https://resident.uidai.gov.in/aadhaar-auth-history या लिंक वर क्लिक करा.
- या प्रक्रियेनंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल.
- त्यानंतर तुमचा बारा अंकी आधार क्रमांक भरा आणि नंतर security captcha भरा.
- यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर आधार सोबत नोंदणीकृत तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल.
हे ही वाचा: विक्रमवीर गणेश लोहारांनी केली 2700 कि.मी.व्हर्च्युअल सायकलिंग.
ओटीपी सबमिट झाल्यानंतर तुमचे Aadhar Card कुठे व कधी किंवा कोणत्या कारणासाठी वापरला गेला आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. हे रेकॉर्ड फक्त गेल्या सहा महिन्यांसाठी उपलब्ध असेल. हे रेकॉर्ड तुम्हाला मिळाल्यानंतर आपण आधारचा वापर केला आहे की नाही हे तपासून शकता.
तुम्ही तुमचे आधार कार्ड दुसरे कोणी वापरत आहे की नाही याची तपासणी खूप आवश्यक आहे. याने तुमच्या आधार कार्डचा कोणीही गैरवापर करू शकत नाही.

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680