सैंधव मीठ रस्त्यावर विकले जात आहे ,खरंच सैंधव मीठ आहे का ते ?

सैंधव मीठ रस्त्यावर विकले जात आहे , खरंच सैंधव मीठ आहे का ते ?

माणूस आज आरोग्यासाठी काय नाही करत. कशाने काही होत नाही, फरक पडत नाही असे समजल्यावर लोक ऐकीव माहितीवर वर सुद्धा विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागतात. असाच एक प्रकार काही शहरातील रस्त्यावर घडत असताना अलीकडे दिसत आहे.कोल्हापूर व इतर शहरांमध्ये सैंधव मीठ आहे असे सांगून काही गाड्यातून मिठाचे मोठमोठे दगडासारखे खडे फोडून विकले जात आहेत. Saindhava salt is being sold on the street, is it really Saindhava salt?

हे ही वाचा.

अनेक पुरस्कार विजेता लघुपट “लेस” ची पटकथा नक्की वाचा

याबाबत चौकशी केली असता,कधी ते राजस्थान या राज्यातून आणले आहे असे सांगतात तर कधी पंजाब राज्यांमधून विकत आणले असल्याचे सांगतात. ही अशी नेमकी वेगवेगळी ठिकाणी सांगण्याची काय कारणे असावेत. किंवा खरच तिथून आणत असतील का ? असा प्रश्न पडतो. हे जे लोक आहेत ते परप्रांतीय असल्याचे समजून येते. त्यांची भाषा ही हिंदी आहे. यांच्या दुकानाच्या ठिकाणी  लोकांची प्रचंड गर्दी सुद्धा पाहायला मिळत आहे.Saindhava salt is being sold on the street, is it really Saindhava salt?

हे ही वाचा

आपल्या मुलाचा किंवा मुलीचा जवाहर नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश घ्यायचा आहे का ? मुदतीच्या आतच हे करा.मुदत किती आहे वाचा.

लोकांमध्ये अशी जाहिरात केली जात आहे की, बी.पी. शुगर,मुतखडा यावर अत्यंत गुणकारी आहे हे सैंधव मीठ. लोकांचा सुद्धा या सेंधव मिठावर विश्वास आहे. पण शंका ही येते आहे. हे इतक्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत आहे ते ही परराज्यातून याची अन्न आणि प्रशासन खात्याने परीक्षण करणे आवश्यक आहे. सैंधव मिठाच्या खाणी या काही राजस्थानच्या भागात आहेत. त्याचबरोबर काही खाणी पंजाब राज्यातही आहेत. पंजाब राज्याच्या पलीकडे पाकिस्तान मध्येही सिंध प्रांतात सुद्धा सैंधव मिठाच्या खाणी असल्याचे दिसून येते. हे मीठ कदाचित चोरट्या मार्गाने पाकिस्तान मधून तर येत नसेल का ? 

हे ही वाचा

नागरिकांसाठी नाशिक मनपा आपत्कालिन कक्षाचे हे विभागनिहाय संपर्क नंबर अत्यंत महत्वाचे आहेत.

अलीकडे विविध ब्रँडचे मीठ salt आपण वापरत असतो. प्रत्येक brand चे गुणधर्म वेगवेगळ्या आहेत. काहीत साधारण आयोडीन आहे. काहीत आयोडीन जास्त आहे. काही मीठ अति खारट आहे. काही मीठ कमी खारट आहे. या ब्रँड मध्ये विविध केमिकलचा वापर करण्यात आलेला असतो. त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. केमिकल विरहित ऑरगॅनिक खाणे आज प्रत्येकाला गरजेचे वाटू लागले आहे. त्या दृष्टीने नैसर्गिक कडे लोकांचा कल वाढलेला दिसून येतो. त्यामुळे सैंधव या नैसर्गिक मिठांकडे लोकांचा कल वाढत आहे.Saindhava salt is being sold on the street, is it really Saindhava salt?

हे ही वाचा

हेल्थ इन्शुरन्स काढताय का ? काळजी घ्या,अन्यथा अडचण येऊ शकते.

सैंधव मिठावर कोणत्याही अनैसर्गिक प्रक्रिया करण्यात येत नाहीत. सैंधव मिठाचा वापर विविध खाद्य पदार्थात केलेला असतो. उदाहरणार्थ पाणीपुरी. काळे मीठ आपण बाजारातून घेत असतो पण हे जे काळे मीठ आहे ते दगडासारखे मोठे खडे आहेत. काळे मीठ 80 रुपये किलो आणि जे मोठे पांढरे खडे असतात ते 60 रुपये किलो असे विकले जात आहेत. गुलाबी रंगाचे मिठाचे खडे जास्त दिसून येत आहेत. हे जे लोक सैंधव मीठ म्हणुन विकत आहेत त्यांचे म्हणणे असे आहे की, आरोग्याच्या सर्व तक्रारीवर हे मीठ गुणकारी आहे. एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की, सैंधव मीठ आरोग्याची संबंधित जरी असले तरी ते खरेच सैंधव मीठ आहे का याची तपासणी करणे खरंच गरजेचे आहे. जर काही लोकांच्या आरोग्याशी खेळ झाला तर मात्र मोठी समस्या पैदा होऊ शकते.

Leave a Comment