आपल्याला सर्वांना असे वाटते की आपली मुलं शाळेत टॉपर व्हायला पाहिजेत. नुसता अभ्यास करून काही फायदा नसतो,अभ्यास कसा करायला हवा ? हे जाणून घेणे खूप महत्त्वाच आहे. मुलांनी अभ्यासात मन कसे लावावे ?वाचलेले लक्षात कसे ठेवावे ? या सर्व गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे.असे अनेक विद्यार्थी असतात की ज्यांना वाचलेले लक्षात राहत नाही व लक्षात राहिले तरी परीक्षेच्या (Exams) वेळी विसरत असतात व त्याचबरोबर त्यांच्या लक्षात असूनही त्यांना लिहिता येत नाही. How exactly should the study be done? Some important points about study
हे ही वाचा
आपण काही टॉपर विद्यार्थ्यांकडे पाहिले तर ते जास्त अभ्यास करत नाहीत असे दिसते. तरी ते कायम वर्गात प्रथम येत असतात. त्यामागे ही काही कारणे आहेत. टॉपर विद्यार्थी Hard work न करता Smart work करत असतात. त्यांना माहिती असते की कशा पद्धतीने वाचलेले लक्षात राहील. ज्यामुळे आपल्याला मदत मिळेल. कसा अभ्यास केल्याने आपल्याला Marks जास्त मिळणार आहेत याचा विचार त्यांनी अगोदरच केलेला असतो .या सर्व अभ्यासाच्या Tips आपण आज पाहणार आहोत. अभ्यास करणे ही एक कला आहेच, पण लक्षात ठेवणे सुद्धा कला आहे.पाठांतर करणे म्हणजे अभ्यास नाही.How exactly should the study be done? Some important points about study
सोप्या पद्धती पुढील प्रमाणे:-
हे ही वाचा
आकलन
ब-याचदा आपण घोकंपट्टी करत असतो.घोकंपट्टी म्हणजे अभ्यास नाही.समज पूर्वक वाचन करणे आणि त्याचे आकलन होणे म्हणजे खरा अभ्यास असतो.वर्गात शिकवत असताना आपण जर लक्ष देऊन ऐकले तर त्याचे आकलन होते.आकलन झालेले थोडे जरी वाचले तरी लक्षात राहते.तेच आपल्याला आकलन झाले नाही आणि आपण वाचन करत राहिलो तर समजायला वेळ लागतो.लवकर लक्षात राहत ही नाही.यासाठी आकलन खूप महत्वाचे आहे.How exactly should the study be done? Some important points about study
सकाळी किंवा पहाटे लवकर उठणे.
विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची योग्य वेळ कोणती ? हा प्रश्न नक्कीच पडत असेल. असं पाहिलं तर तुमचे जेव्हा अभ्यासात मन लागते तेव्हा तुम्ही अभ्यास करू शकता. परंतु सकाळच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी अभ्यास केल्याने अधिक प्रमाणात वाचलेले लक्षात राहते कारण, सकाळी आपले मन प्रसन्न असते व पहाटे संपुर्ण वातावरण शांत असते. आपली रात्रभर चांगली झोप झाल्याने सकाळी व पहाटे शरीर व मन fresh असते.जर एखाद्या विद्यार्थ्याचं मन अभ्यासात लागत नसेल व त्यावर concentration होत नसेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सकाळची व पहाटेची वेळ अतिशय योग्य आहे.
सकाळी किंवा पहाटे वाचन केल्याने लक्षात राहते म्हणून सकाळच्या वेळी विद्यार्थ्यांना जे विषय अवघड वाटत असतात ते त्यांनी सकाळी किंवा पहाटे वाचावेत.
आता आपण पाहूया की अभ्यास करण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या लागतात.How exactly should the study be done? Some important points about study
हे ही वाचा
- इच्छा
अभ्यास करताना विद्यार्थ्यांना किंवा मुलांना इच्छा असावी लागते. इच्छा नसेल तर अभ्यास करण्यास अधिक कठीण जात असते.अभ्यास करताना पहिली व शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे इच्छा.इच्छेशिवाय कोणतेच काम पूर्ण होत नसते म्हणून इच्छा असणे खूप महत्त्वाचे असते. अभ्यास करण्याची इच्छा होत नसेल तर काही उपाय करून फायदा नाही. अभ्यास करताना आधी आपले मन व शरीर fresh करा. अभ्यासाला बसताना टेबल व खुर्चीवर ताठ बसा कारण,ताठ बसल्यामुळे आपल्या पाठीचा कणा सरळ राहतो व आपल्याला आराम न मिळाल्यामुळे झोप येत नाही.झोप न आल्याने मेंदू सतर्क राहतो. त्याचबरोबर आपल्याला वाचलेले अधिक लक्षात राहते. आपल्याला आवश्यक असेल तेवढ्या प्रकाशातच आपण अभ्यास केला पाहिजे.अपु-या प्रकाशात अभ्यासाला बसू नये.
- सातत्य
आपल्या सवय बदलून जर आपण रोज चांगल्या पद्धतीने सगळे प्रयत्न करू लागलो तर त्याची आपल्या मनाला व शरीराला सवय होऊन जाते. उदाहरणार्थ…, जर आपण पहाटे 05.00 वाचता उठण्याचे ठरवले तर आपण दुसऱ्या दिवशी 06.00 वाचता तरी किमान उठतो. थोडे दिवस आपल्याला उठण्यास कंटाळा येईल परंतु,आपण नियमितपणे सकाळी लवकर उठू लागतो. काही दिवसांनी आपोआप लवकर जाग येत असते.कारण आपल्या मनाला व शरीराला याची सवय झालेली असते. जर या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी मन लागत नसेल तर बळजबरीने बसा कारण, काही दिवसांनी आपल्या मनाला व शरीराला सवय लागते. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण होते. यासाठी तुम्हाला सुरुवात करावी तर लागणारच आहे. अभ्यासाला बसण्याआधी काही गोष्टी दूर केल्या पाहिजेत . विद्यार्थ्यांनी पालकांना सांगून ठेवावे की,मी अभ्यास करत आहे. कृपया शांतता ठेवा. अभ्यास करताना शक्यतो मोबाइल, TV, लॅपटॉप व इतर इलेक्ट्रिक गॅझेट्स पासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. कारण इलेक्ट्रिक गॅझेट आपल्याकडे असल्यावर आपले अभ्यासात मन लागत नाही . त्या गॅझेट मध्ये मन अडकलेले असू शकते .
हे ही वाचा
- तेच तेच परत परत वाचने
विद्यार्थ्यांना वाचलेले लक्षात ठेवण्यासाठी परत परत तेच तेच वाचले पाहिजे. असे खूप विद्यार्थी असतात की जे मनातल्या मनात वाचत असतात.मनातल्या मनात वाचल्याने एकाग्रता टिकत नाही . मनातल्या मनात न वाचता मोठ्याने वाचावे कारण, त्यामुळे एकाग्रता अधिक टिकते. अधिक लक्षात राहत असते. वाचन करत असताना त्या शब्दावर किंवा वाक्यावर एकाग्रतेने(concentration) लक्ष देऊन वाचले पाहिजे. पुन्हा पुन्हा लक्ष देऊन वाचल्याने ते कायम लक्षात राहते. त्याचा result आपल्याला परीक्षेच्या (Exam) वेळी जाणवत असतो.रंगा-याचे उदाहरण इथे लागू पडते.भिंतीला रंग देताना रंगा -याला सुरवातीला रंग बसत नाही.दुसरा हात मारल्यावर मध्यम रंग बसतो. तिसरा हात मारला कि रंग पाहिजे तसा बसतो.असेच आहे वाचन करण्याचे.पुन्हा पुन्हा वाचन केले पाहिजे.
- लिहिणे
एखाद्या विद्यार्थ्याने वाचन किंवा अभ्यास केला असेल आणि त्याला जर वाटत असेल कि लक्षात राहिले नाही,आपण वाचलेलं विसरलो आहोत. त्या विद्यार्थ्यांनी पुस्तक किंवा त्या विषयाची वही बंद करून द्यावी. व दुसऱ्या वहीत जे आपण काही वाचले आहे ते लिहावे. त्यामुळे समजते कि आपण वाचलेले लक्षात राहिले आहे किवा नाही .अधिक लिखाण केल्याने आपल्याला परीक्षेच्या (Exam) वेळी लिहिण्यासाठी सराव झालेला असतो. अधिक लिहिल्याने ही अधिक लक्षात राहते.
- मनाची एकाग्रता (concentration)
अभ्यास करताना एकाग्रता नसेल तर आपले कोणतेच काम पूर्ण होत नसते. मनाची एकाग्रता खूप महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी शांत मन व एकाग्रता खूप महत्त्वाची असते. एकाग्रतेने काम केल्यास त्याचा Result आपल्याला दिसून येत असतो. मनाची एकाग्रता करण्यासाठी योगा करणे , ध्यान, प्राणायाम हे सर्व तुम्ही करू शकता. अभ्यासाला बसण्यापूर्वी 10 मिनिटे शांततेत बसावे व मनात कोणताच विचार येऊ देऊ नका. आपले चित्त श्वासावर एकाग्र करा. आपला श्वास आत बाहेर होत असतो त्याचा अनुभव घ्या.
हे ही वाचा
Pan Card ला Aadhar Card शी लिंक कसे कराल ? जर करणे बाकी असेल तर आत्ताच करा
- प्रेरणा
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेरणा. प्रेरणे शिवाय माणूस पुढे जाऊच शकत नाही. म्हणून प्रेरणा असणे खूप महत्त्वाचे असते.अभ्यास करणे किंवा इतर कोणतीही काम असो ते चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तुम्हाला स्वतःला self motivated व्हावे लागेल. आपल्या मनातून प्रेरणा निर्माण करण्यासाठी आयुष्यामध्ये स्वप्न किंवा ध्येय तुम्ही ठरवू शकता आणि त्या दिशेने आपली वाटचाल सुरू ठेवू शकता. त्याचबरोबर Motivational Books वाचू शकता. Video पाहू शकता. प्रेरणा असणे खूप महत्त्वाचे असते.त्यासाठी कोणाला तरी आदर्श मानून त्यांचे आपण अनुकरण केले पाहिजे.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680