महाराष्ट्रातील हे सर्वात सुंदर आणि स्वच्छ मंदिर कधी पाहिले का ? या ठिकाणी सहली काढा.

           कधी कधी आपण अनपेक्षित ठिकाणी जातो. आपल्याला माहिती ही नसतं कि आपण या ठिकाणी जाणार आहोत. आपण अचानक आपल्या आवडत्या ठिकाणी जातो , जिथे जायचा विचार आपण केला होता कधीतरी.असे कधी तुमच्याबाबत झाले आहे का ? माझ्या बाबतीत मात्र असंच काहीसं झालं एकदा . आम्ही पुण्याच्या पुढे पुणे-बंगलोर रोड वर असताना अचानक ठरले की, आपण प्रति बालाजीला जायचे आहे,तेव्हा मला आभाळ ठेंगणे झाले होते.

युटूब वर व्हिडीओ नक्की पहा.

pratibalaji pune

            आम्ही पुणे-बंगलोर हायवे वरून कापूरहोळ जवळून नारायणपूर या गावाजवळून पाच किलोमीटर आत मध्ये आम्ही गेलो होतो. आत जात असताना तेथे खूप प्रकारचे तांदूळ विकत असताना लोक दिसत होते. कांदा व्यापार ही शेतकरी व व्यापारी करत असताना दिसले. तेथे वेगवेगळ्या प्रकारची हॉटेलस होती . कित्येक हॉटेल वर प्रति बालाजी चे चिन्ह होते. मंदिर जेव्हा एक किलोमीटर अंतरावर होते,तेव्हा मात्र तेथे भांडी विकत असताना एक माणूस दिसू लागला . उदा. तवा,कढई, वेगवेगळ्या प्रकारचे चमचे व स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा चिमटा अशी कित्येक भांडी आणि संसार उपयोगी वस्तू दिसत होत्या.

             प्रति बालाजीच्या गेटमध्ये आम्ही आलो तेव्हा वाहन तळाची जागा विशाल अशी होती.ती खूप मोठी होती तिथे खूप प्रकारची दुकाने होती . उदा…, आईस्क्रीम, बर्फाचा गोळा,उसाचा रस, पेढ्याचे दुकान, वडापावचे हॉटेल सह काही लोक देवाची मूर्ती ही विकत होते.मंदिराकडे वळताना तेथे सिमेंटचे चार पदरी रस्ते होते.आम्ही जेव्हा गाडी पार्किंग करून बाहेर आलो,तेव्हा एवढी स्वच्छता पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. तेथे खूप झाडे लावण्यात आली होती . मंदिराजवळ जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला समजले की, तिथे चप्पल व मोबाईल ला आत मध्ये प्रवेश मिळणार नाही.आम्ही चप्पल ताब्यात ठेवण्याची व्यवस्था जिथे होती तिथे चप्पल ठेवले,त्यावेळी आम्हाला समजले, तिथे चप्पलची नि:शुल्क सेवा आहे. मोबाईल ठेवण्यासाठी गेलो तर तिथेही निशुल्क सेवा होती . महाराष्ट्रातील बहुतांश मंदिरात पैसे हे घेतले जातात परंतु, प्रति बालाजी येथे मात्र सर्व नि:शुल्क सेवा होती .

             तिथे प्रत्येक कोपऱ्यात कोणी ना कोणी स्वच्छता करताना दिसत होता. मंदिरामध्ये प्रवेश करताच आमची तपासणी करण्यास सुरुवात केली. मंदिराच्या सर्व बाजूंना प्रति बालाजीचे भक्तिमय गाणे ऐकू येत होते. तेथे खूप प्रसन्न वातावरण होते. मंदिराच्या चारही दिशांना मंदिर होते व मध्यभागी एक मंदिर होते. सर्व मंदिराचे दर्शन झाल्यावर तेथे प्रसाद घेण्यास सांगितले. प्रसाद देण्याची वाटी ही सुकलेल्या पानांपासून तयार करण्यात आलेली होती. तिथे प्रसाद म्हणून दही आणि भात मिळून आम्हाला मिळाले व त्यावर एक किंवा दोन तुळशीचे पाने ही होती . तिथे स्वच्छतागृह खूप स्वच्छ होते व तिथे आरामाची ही व्यवस्था होती. मंदिरामध्ये ही खूप स्वच्छता होती. प्रत्येक मंदिराजवळ दानपेटी होती .आम्ही मंदिराच्या बाहेर आल्यावर थोडा वेळ तिथे आम्ही प्रसाद खात गप्पा मारत बसलो. तिथले पाणी तर खूप म्हणजे खूप चविष्ट व गार लागत होते.

            त्या ठिकाणी लहान मुलांची व मोठ्या मुलांची शाळेची सहल आली होती आणि महाराष्ट्रातील सर्व शाळांना सांगावेसे वाटते की, शैक्षणिक सहल नेण्यासाठी हे ठिकाण खूप उत्कृष्ट आहे. तेथील दर्शन झाल्यावर आम्हाला गावी जायचे होते. महाराष्ट्रातील हे असे एकमेव मोठे मंदिर असावे,जिथे स्वच्छतागृहासाठी नि:शुल्क सेवा,मोबाईल ठेवण्यासाठी निशुल्क सेवा,चप्पल ठेवण्यासाठी निशुल्क सेवा होत्या.

            महाराष्ट्रातील कित्येक मंदिरांमध्ये पैसे हे घेतले जातात आणि भक्तांची लूट केली जाते. महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ मंदिर हे प्रति बालाजी चेच असेल असे वाटल्यावाचून राहणार नाही .

             तामिळनाडू राज्यांमधील बालाजीच्या मंदिराची प्रतिकृती म्हणून नारायणपूर जवळ प्रति बालाजी मंदिर बांधण्यात आले आणि म्हणून या मंदिराला ला प्रति बालाजी असे म्हणतात.

Leave a Comment