Disaster Alert होता पण….! भल्या भल्यांचे धाबे दणाणले होते.

सुर्य दररोज नव्याने उगवतो, नेहमीप्रमाणे मावळतो, हे प्रत्येकालाच माहीत आहे. त्याबद्दल कोणाला काहीच वाटत नाही. हा तर एक दैनंदिन जीवनाचा भाग आहे असे आपण गृहीत धरतो. प्रत्येक दिवस येणारा असाच असत नाही. कधीतरी कालच्या गुरुवार सारखा दिवस उगवतो. असा दिवस विजेचा शॉक लागल्यासारखा माणसाची अवस्था करून जातो. काल सकाळी गुरुवारी साडे दहाच्या सुमारास मोबाईलवर अलर्ट येऊ लागला. तोही अचानकच. त्यावेळी स्क्रीनवर फक्त Alert,Government आणि alarm इतकंच काही ते जाणवत होतं.

मोबाईल मध्ये आज पर्यंत कधीही असा अलर्ट आलेला अनुभवलेला नव्हता. तो अलर्ट होता तोही Government च्या संदर्भाने. प्रथम असे वाटले की, माझ्या मोबाईल मध्ये Virus घुसला असावा. नंतर वाटू लागले की आपण कोणत्यातरी Social media वर चुकीचा आक्षेपार्य मजकूर टाकला असावा. तो मजकूर Govenment धोरणाच्या विरोधात असावा म्हणून आपल्याला Govenment system च warning देत आहे. तेवढ्यात वाटू लागले फोन पे,पेटीएम यासारखे आर्थिक व्यवहार करणारी अपलिकेशन्स अनइन्स्टॉल करावी. पण ते करूनही काहीही होणार नव्हते हे नंतर समजले.त्या दहा सेकंदात एका मागून एक असे कित्येक विचार मनात डोकावून गेले. एक मेसेज आणि त्याखाली Yes आणि No असे काहीतरी दिसत होते. पूर्ण संदेश न वाचताच अंदाजाने अर्थ लावला आणि Yes केला आणि Alert बंद झाला.

कदाचित तो अलर्ट बंद करू का असा प्रश्न असावा. आजकाल Cyber Crime चे प्रमाण खूप वाढले आहे. एखादा व्हायरस घुसवून आपल्या मोबाईलचा सर्व ॲक्सेस Hacker ने घेतला की काय वाटत होते. Disaster Alert इतक्या सहजासहजी बंद झाला नाही. Yes करायचे की नो करायचे या विषयावर सुद्धा मनात द्वंद्व चालू होते. त्या notification चा अर्थ कळत असून सुद्धा गोंधळामुळे तो अर्थ लावण्याकडे सुद्धा दुर्लक्ष झाले. Disaster Alert बंद झाल्यावर मोबाईलवर पाच ते सात अलर्ट चे पर्याय दिसत होते. हे मोबाईल मधील पर्याय मी प्रथमच पाहत होतो. मनात आले मोबाईल सुद्धा माणसासारखे रंग बदलू लागला की काय ? आज-काल “कुछ भी हो सकता है” अशी परिस्थिती देशात दिसत आहे.

Disaster Alert बंद करत असताना मला त्या पाईपलाईनचे काम करणाऱ्या मजुराची आठवण झाली. सुरुवातीच्या काळात नोकिया 3310 सारखे मोबाईल बाजारात होते. पाईपलाईनचे काम करणा-या एका हौशी मजुराने मोबाईल घेतला होता. दुकानदाराने सर्व फीचर्स कशी चालू करायची ते सांगून मजुराला मोबाईल दिला होता. मोबाईल मध्ये दुकानदाराने Alarm कसा सेट करायचा त्याला शिकवलेला होता. त्त्याच्याकडून Alarm चालू केल्याचा पर्याय नकळत तसाच सक्रीय राहून गेला होता . मजूर घरी आल्यावर झोपला आणि रात्री बरोबर तीन वाजता अलार्म वाजायला लागला. 

मजुराला वाटले इतक्या रात्री फोन कसा आला. तो बंद करण्याचा प्रयत्न करू लागला परंतु तो आवाज काही बंद होईना. झोपलेल्या माणसांची झोपमोड झाली. पण आवाज काही बंद होईना. त्याच्या समूहातील झोपलेले लोक जागे झाले. कोणासही त्याचा आवाज बंद करता येईना. मग काही लोकांनी त्याला सल्ला दिला की या मोबाईलवर सगळे अंथरून पांघरून टाकून द्यावे. त्याने तसेच केले. त्यावेळी थोडा मोबाईलचा आवाज कमी होऊन गेला. घरातले बिना पांघरूणाचे असे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी दुकानदारानेच अलार्म बंद केला. असा होता तो अलार्म चा गोंधळ.

मी सुद्धा सुरुवातीला मजुरासारखाच भेदरलेलो, गोंधळलेलो होतो. नंतर युट्युब वर सर्च करून बघितले तर अमेरिका व पाश्च्यात्य देशात मोबाईलवर ही यंत्रणा अगोदर पासूनच सक्रीय आहे हे कळले. आपत्तीकालीन परिस्थितीत सरकार जनतेला Disaster Alert देण्यासाठी असा वापर करते असे समजले. थोड्यावेळाने आमचे मित्र व्हाट्सअप ग्रुप वर याबाबत शंकांचे प्रश्न विचारू लागले. मग समजले हा अलर्ट सर्वांनाच आलेला आहे. काहींनी मेसेज टाकला जिओ ग्राहकांना आलेला आहे. मग थोडी सुटका झाल्यासारखे वाटू लागले.

दूरसंचार विभाग आपत्ती व्यवस्थापनासाठी नागरिकांना संदेश देण्यासाठी हा Disaster Alert टेस्ट करत आहे असे छोटे छोटे संदेश मोबाईलवर फिरू लागले. दिवसभर याच Disaster Alert विषयी बातम्या फिरत होत्या.

एक काय हजार Disaster Alert द्या पण लोकांना सुरुवातीला  टेस्ट चालू आहे असे सांगा. नागरिक सतर्क जागरूक राहतील. नाहीतर जनतेमध्ये काहीच आपत्ती नसताना अलर्टमुळे आपत्ती तयार व्हायची विनाकारण.

Leave a Comment