उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण होण्यासाठी कोणती काळजी घ्याल?

आपणा सर्वांना माहित आहे की, जागतिक तापमान वाढत आहे. जागतिक तापमान वाढीची विविध कारणे जरी असली तरी त्या कारणाविषयी आपणास या ठिकाणी बोलायचे नाही. आपणास फक्त हे जे वाढलेले तापमान आहे या तापमानापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे याकडे आपण लक्ष देऊ या. अलीकडे सर्व ऋतूमध्ये उन्हाळा ऋतू खूपच कडक भासत आहे. अलीकडे महाराष्ट्रात तसेच देशात तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस च्या पुढे गेलेले आहे. या तापमान वाढीचा मानवी शरीरावर ही दुष्परिणाम होत आहे. काळजी न घेण्यामुळे बरेचशे लोक आजारी पडत आहेत. आजारावर उपाय शोधण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी हे या लेखात पाहणार आहोत. Prevention is better than you cure.

  1. पुरुषांनी डोक्यावर टोपी आणि महिलांनी स्कार्फचा वापर करावा.

 उघड्या डोक्यास काळया केसामुळे ऊन खूप लागते. काळा रंग हा प्रकाशाचे परावर्तन करत नाही. त्यामुळे केसांमध्ये उष्णता शोषली जाते. उष्णता शोषली गेल्यामुळे उन्हामुळे डोके दुखू लागते. त्यामुळे पुरुषांनी शक्यतो लाईट रंगाची टोपी आणि स्त्रियांनी स्कार्फ चा वापर केला पाहिजे.

  1. वेळोवेळी पाणी प्यावे.

उन्हामध्ये आपल्या शरीरातील पाणी कमी होत असते. घाम जास्त आल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तहान जरी नाही लागली  तरी थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे पाणी पीत राहिले पाहिजे. त्यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन राहील.

  1. सैल कपड्यांचा वापर करावा.

उन्हाळ्यात मुली किंवा स्त्रिया या अंगाला टाईट कपड्यांचा वापर करतात. त्यामुळे घाम येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे सैल कपड्यांचा वापर करावा. सेल कपडे वापरल्यामुळे खेळत्या हवेचे प्रमाण वाढते, त्यामुळे घाम कमी येतो आणि शरीराला सुद्धा सुरक्षितता वाटते. जास्त टाईट कपडे वापरल्याने जास्त घाम येऊन गजकर्ण सारखे आजार उद्भवू शकतात.

       4. जरुरी काम असेल तरच घरातून बाहेर पडा.

आपण तर जाणतोच उन्हाळा त्रीव्र होत आहे, तरीसुद्धा काही तरुण मंडळी या उन्हात सुद्धा कारण नसताना भटकंती करत असलेली दिसून येतात, क्रीडांगणावर खेळत असलेले दिसून येतात, अशा वेळेस यावर आपल्या सर्वांचे नियंत्रण असले पाहिजे. अन्यथा उन्हाळ्याच्या आरोग्याच्या समस्ये ला आपल्याला सामोरे जावे लागेल.

         5. डोळ्याला काळा गॉगल घालने आवश्यक

  उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता जास्त असल्याने त्याचा डोळ्यावर विपरीत परिणाम होत असतो. डोळे जळजळणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे इत्यादी लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणजे घरातून बाहेर पडत असताना आपण काळा गॉगल घालने आवश्यक आहे.

         6. वेळोवेळी लिंबू सरबत पिणे.

उन्हाळ्यामध्ये घामाच्या रूपामध्ये शरीरातील सोडियम क्लोराइड चा भाग कमी होत असतो. तो भरून काढण्यासाठी वेळोवेळी लिंबू सरबत पिणे आवश्यक आहे.

        7. उन्हात छत्रीचा वापर करावा.

उन्हाळ्यामध्ये आपण डोक्याला टोपी,तोंडाला स्कार्फ घालून उन्हापासून संरक्षण करीत असलो तरी या सर्वात जास्त उन्हापासून संरक्षण करण्यास सक्षम उपकरण म्हणजे छत्री. छत्रीचा वापर जर आपण केला तर जास्तीत जास्त उन्हापासून आपण संरक्षण करू शकतो. तरुणांना छत्री घेऊन फिरणे आजकाल आवडत नाही. तरीपण छत्रीचा वापर खूप आवश्यक आहे.

         8. कमीत कमी 3 लिटर पाणी दिवसात पिणे.

उन्हाळ्यात तरुणांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने पाण्याचा समतोल राहण्यासाठी कमीत कमी तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. याहून पाणी जर कमी पिले तर लघवी पिवळी होणे, मुतखड्याचा त्रास होणे इत्यादी गोष्टी घडू शकतात.

अशाप्रकारे उन्हाळ्यामध्ये विविध प्रकारची आपण जर काळजी घेतली,तर उन्हाळा आपल्याला सुसह्य होऊ शकतो. अन्यथा तो असह्य होऊ शकतो याची काळजी आपण घेतली पाहिजे. प्रत्येक ऋतूमध्ये जसे शरीराचे वेगवेगळे आजार उद्भवतात तसेच उन्हाळ्याचे सुद्धा आजार उद्भवत असतात. ही गोष्ट आपण सर्वांनी ध्यानात घेतली पाहिजे.

Leave a Comment