प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या शाळामधून परसबाग विकसित करण्याबाबतच्या आदेशाचे पत्र शिक्षणाधिकारी नाशिक जिल्हा परिषद यांचेकडून प्रशासनाधिकारी मनपा शिक्षण विभाग नाशिक यांना काही दिवसांपूर्वी प्राप्त झाले होते.
त्यानुसार नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये परसबाग विकसित करण्याचे आदेश मा.प्रशासनाधिकारी बी. टी.पाटील यांनी परिपत्रकाद्वारे काढलेले आहेत.Courtyard to be developed in Nashik Municipal Corporation school
त्यानुसार नाशिक महानगरपालिकांच्या शाळांमध्ये परसबाग विकसित करण्याच्या कामाची अंमलबजावणी काही शाळांमध्ये होत असताना दिसत आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत जिल्हयातील अनेक शाळांकडुन मोठया प्रमाणात शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी परसबाग विकसित केलेल्या आहेत. विकसित करण्यात आलेल्या परसबागेतील उत्पादित भाजीपाल्याचा समावेश नियमितपणे आहारामध्ये देखील करण्यात येत आहे.
केंद्र शासनाने देखील योनजेंतर्गत शाळांमधून परसबाग निर्माण करण्यात येऊन परसबागामधून उत्पादित भाजीपाला व इतर भाजीपाला व इतर पदार्थाचा समावेश पोषण आहार अंतर्गत करण्याचे निर्देश दिलेले आहे.Courtyard to be developed in Nashik Municipal Corporation school
Nation Family Survey २०१९-२० मधील अहवालामध्ये देखील परसबाग व पोषणमुल्ये यावर अधिकाधिक भर देणेबाबत अधोरेखित करण्यात आलेले आहे. शालेय परिसरात परसबाग विकसित केल्यामुळे जिथे मुलांना त्यांच्या स्वतःच्या भाज्या आणि फळे वाढविण्याची संधी मिळते,मुले शाळेत त्याच्या जेवणाचा भाग म्हणून त्यांनी उगवलेली ताजी फळे आणि भाज्या खाण्यास उत्साही होतील व अधिक आनंदाने आहाराचे सेवन करतील.
त्यामुळे त्यांना लहान वयातच चांगला व पोषणयुक्त आहार घेण्याची सवय लागेल जी आयुष्यभर राहील.Courtyard to be developed in Nashik Municipal Corporation school
जिल्हयामध्ये नुकताच पाऊस सुरु झालेला आहे. पावसाळयामुळे वातावरणातील ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने सध्याचा कालावधी परसबागांची उभारणी करण्याचा उत्तम कालवधी आहे. पावसाळाच्या कालावधी दरम्यान परसबाग उभारण्यासाठी कृती आराखडा विकसित करण्यासाठी प्रत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती,कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञ व इतर तज्ञ लोकांच्या विशेष सभा घेण्यात येऊन त्यामध्ये कृती कार्यक्रम ठरवून घेण्यात येऊन त्याप्रमाणे परसबागांची उभारणी करण्यात यावी असे परिपत्रकात नमूद आहे.Courtyard to be developed in Nashik Municipal Corporation school
कृषी विभाग, कृषी विद्यापीठे तसेच कृषी विद्यान केंद्र व इतर एन.जी.ओ. यांचे मदतीने मनपा कार्यक्षेताल किमान ५०% शाळांमधून परसबागांची उभारणी होण्याच्या दृष्टीने स्वतः मुख्याध्यापक यांनी पुढाकार घेऊन उचित कार्यवाही करावी असे सांगण्यात आले आहे ,
जेणेकरुन मनपा नाशिक कार्यक्षेत्रातील शाळांमधून उत्कृष्ट परसबाग ही संकल्पना एक चळवळ म्हणून राबविण्यात येईल. राज्यस्तरावरुन गतवर्षी प्रमाणे देखील माहे सप्टेंबर-ऑक्टोबर २०२३ या महिन्यामध्ये उत्कृष्ट परसबागांची उभारणी करणान्या शाळांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत असे परिपत्रकात नमूद आहे.
त्याअनुषंगाने आपल्या मनपा कार्यक्षेत्रातील शाळांनी परसबाग उपक्रमामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त ठिकाणी परसबाग विकसित होतील याबाबत कार्यवाही करावी असे मा.प्रशासनाधिकारी बी.टी. पाटील यांनी परिपत्रकात म्हटले आहे.
Writer,Activenama