ऑनलाईन वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रियेला मुदत वाढ

 ऑनलाईन वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रियेला मुदत वाढ देण्यात आली आहे.Extension of deadline for online senior and selection training enrollment process

ऑनलाईन वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाकडे सोपविण्यात आलेली आहे. यानुसार मागील शैक्षणिक वर्षामध्ये दिनांक १ जुन २०२२ रोजी राज्यातील ९४,५४२ शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष सन २०२३ – २०२४ मध्ये संदर्भ क्रमांक २ अन्वयेच्या पत्रानुसार दिनांक २९ मे २०२३ ते १२ जून २०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन प्रशिक्षणासाठी ऑनलाईन स्वरूपामध्ये नावनोंदणी करणेसाठी मुदत देण्यात आली होती.

तथापि संदर्भ क्रमांक ३ अन्वये राज्यातील विविध प्राथमिक शिक्षक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना यांचेमार्फत प्रशिक्षण नावनोंदणी साठी मुदतवाढ देणेबाबतची निवेदने या कार्यालयास सादर केलेली आहेत. सदरच्या सर्व प्राप्त निवेदनांचा विचार करता प्रशिक्षण नावनोंदणीसाठी सद्यस्थितीमध्ये दिनांक

याचे परिपत्रक सुद्धा देण्यात आलेले आहे इथे क्लिक करा.

१३ जून २०२३ ते २० जून २०२३ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये

प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी.

तरी उपरोक्तप्रमाणे प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रियेच्या मुदतवाढीबाबतच्या सूचना आपल्या कार्यक्षेत्रामधील चारही गटातील शिक्षक संवर्गामधील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्याव्यात व सदर प्रशिक्षणासाठी पात्र उर्वरित शिक्षकांना नावनोंदणी करण्यास आदेशित करण्यात यावे.

Leave a Comment