माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल,जी परीक्षा मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेली होती, त्या परीक्षेचा निकाल आज २ जून 2023 रोजी मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे. इयत्ता दहावीचे विद्यार्थी आणि पालक या परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. शेवटी मंडळाने इयत्ता दहावीच्या निकालाचा दिवस जाहीर केलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर,औरंगाबाद,मुंबई,कोल्हापूर,अमरावती,नाशिक,लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक २/०६/२०२३ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
इयत्ता दहावीचा निकाल कोणकोणत्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार ?
- www.mahresult.nic.in
- http: //SSC result.mkcl.org
- https://ssc.mahresults.org.in
- https://www.indiatoday.in/education-today/maharashtara-board-class-10th-result-2023
- https:hindi.news18.com/news/career//board-results-maharashtra-board
http://mh10.abpmajha.com
वरील अधिकृत संकेतस्थळावर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र( इयत्ता दहावी) मार्च 2023 परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपलब्ध संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680