आपल्या मुलाचा किंवा मुलीचा जवाहर नवोदय विद्यालय मध्ये प्रवेश घ्यायचा आहे का ? मुदतीच्या आतच हे करा.मुदत किती आहे वाचा.

 इयत्ता ६ वी प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा २०२४ चे आवेदन पत्र / online form संकेतस्थळावर उपलब्ध असून ज्या पालकांना किंवा शिक्षकांना मुलांना परीक्षेसाठी बसवायचे आहे त्यांनी स्वतः ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण करावी किंवा संबंधित शाळांना विद्यार्थ्याला बसवण्याबाबत अवगत करावे.javahar Navodaya Vidyalaya online form

हे ही वाचा

Disaster Alert होता पण, भल्या भल्यांचे धाबे दणाणले होते.

 इ ६ वी च्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२४ वे आवेदन पत्र online पद्धतीने भरावयास सुरुवात झाली आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी मागील विद्यार्थी / विद्यार्थ्यांनी २०२३-२०२४ या शैक्षणिक सत्रामध्ये इ ५ वी मध्ये शिकत आहे. javahar Navodaya Vidyalaya online form

ज्यांची जन्मतारीख ०१ मे २०१२ ते ३१ जुलै २०१४ च्या दरम्यान आहे व ते नियमित इ ३ री व ४ थी इयत्ता उत्तीर्ण झालेले आहे. तसेच त्यांचे पालक नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे, असे विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी आवेदन पत्र भरण्यासाठी पात्र आहे. javahar Navodaya Vidyalaya online form

हे ही वाचा

रिलीज झाले Gadar-2 चे गाणे khairiyat : गाणे कसे आहे याबाबत माहिती.

online आवेदन विनामुल्य भरण्यासाठी संपूर्ण माहिती नवोदय विद्यालय समिती नवी दिल्ली च्या www.navodaya.gov.in नवोदय विद्यालय समिती क्षेत्रीय कार्यालय पुणे च्या http://navodaya.gov.in/nvs/ro/Pune/en/home/index.html व जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव विद्यालयाच्या www.navodaya.gov.in/invs/nv-school/Nashik/en/home या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. javahar Navodaya Vidyalaya online form

YouTube वरील व्हिडिओ पहा

आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना | MSRTC Bus

आवडेल तेथे कोठे ही प्रवास योजना

तसेच जवाहर नवोदय विद्यालय online आवेदन पत्र भरण्याची अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२३ आहे. मनपा क्षेत्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी / विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेस बसविणे बाबत मुख्याध्यापक यांनी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी असे नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी.टी.पाटील यांनी सर्व मुख्याध्यापक मनपा शाळा व व मनपा क्षेत्रातील खाजगी शाळा यांना परिपत्रकाद्वारे आदेशित केलेले आहे.

Leave a Comment