सामान्य जनतेची नाळ एस.टी.महामंडळाच्या बसशी जोडली गेलेली आहे. एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून अलीकडे एस.टी.महामंडळ सवलतींची खैरात करत असल्याने स्त्रिया आणि सामान्य लोकांसाठी एस.टी.ही जिव्हाळ्याची बनली आहे. खाजगी वाहतुकीतील बसेस आणि एसटी महामंडळ यामध्ये काही वर्षांपूर्वी स्पर्धा होती, पण खाजगी सेवेत शयनयान श्रेणी (sleeper Coach) बसेस आल्याने एस.टी.काहीशी स्पर्धेत मागे पडलेली दिसली. MSRTC will start a new service for the public : Will the private bus be affected?
परंतु अलीकडे सरकारने महिलांना 50 टक्के तिकीट सवलत आणि 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना बसमध्ये मोफत प्रवासाचा लाभ दिल्याने, त्यातच एस.टी.महामंडळात शयनयान (sleeper Coach service) श्रेणी च्या बसेस दाखल होणार असल्याने सामान्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात शयनयान श्रेणीच्या बसेस दाखल होणार असल्याने प्रवाशांना झोपून आरामात प्रवास करता येणार आहे. या निर्णयामुळे सामान्य जनतेला याचा फायदा होईलच पण खाजगी सेवा पुरवणाऱ्या बसेसना मात्र फटका बसणार असे दिसते.
कारण खाजगी बसेसचे एक निश्चित असे भाडे नसते त्यांच्यावर नियंत्रणही ठेवणे आवाक्याच्या बाहेरचे असते. सरकारच्या विविध योजनांमुळे महामंडळाच्या एस.टी. मध्ये अलीकडे गर्दी होत असल्याचे चित्र आहे. त्याचाच फायदा या नवीन सेवेमुळे एसटी महामंडळाला होणार असे दिसते. शासनाच्या या सवलतीमुळे शासन महामंडळास प्रतिकृतीची रक्कम ही देत आहे; हा सुद्धा फायदा महामंडळाला होताना दिसत आहे. त्यातच एसटी महामंडळाने आपली स्वतःची शयनयान (स्लीपर कोच सेवा) नव्याने चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे सामान्य प्रवाशांना योग्य दरात आरामदायी सेवा मिळणार आहे.या सेवेमुळे खाजगी सेवेला मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण होऊन खाजगी वाहतुकीच्या बसेस सुद्धा योग्य दर आकारण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच सामान्यांचा फायदा मात्र स्पर्धेमुळे निर्माण होईल असे वाटते.MSRTC will start a new service for the public : Will the private bus be affected?
महामंडळाच्या बसेस निर्मितीचा कारखाना दापोडी येथे आहे. तेथे 50 शयनयान श्रेणी (स्लीपर कोच )च्या बसेसची निर्मिती सुरू आहे. काही दिवसापूर्वी एसटी महामंडळाने प्रायोगिक तत्त्वावर खूपच कमी स्लीपर कोच बस चालवलेल्या होत्या.आता मोठ्या प्रमाणावर शयनयान श्रेणी (स्लीपर कोच बस ) ची निर्मिती केली जाणार आहे. या मध्ये प्रवासी क्षमता 30 ची असणार आहे आणि त्या बसेस या बारा मीटरच्या असणार आहेत. या बसेस मुळे खाजगी बसेस चा बेलगाम उधळलेला वारूनियंत्रणात येण्याची शक्यता आहे अशी सूत्राची माहिती आहे.
पूर्वी एसटी महामंडळाच्या ताब्यात 18000 बसेस होत्या परंतु काही वर्षे बस खरेदीची प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली असल्याने एसटी महामंडळाकडे आता 14000 सुस्थितीतील बसेस उपलब्ध आहेत. बदलत्या किफायतशीर तंत्रज्ञानाचा फायदा सुद्धा एसटी महामंडळ घेणार असून महामंडळ 5000 इलेक्ट्रिक बस आणि १००० सीएनजी इंधनावरील बस यांची खरेदी करणार असल्याचे समजते. त्याचबरोबर एल एन जी इंधनाच्या बसेसच्या खरेदीसाठी सुद्धा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. एसटी महामंडळाला एकूण 22 हजार बसेसची गरज आहे अशी माहिती कार्यालयाकडून मिळते.
एसटी महामंडळ जर असेच नवीन बदलांना सामोरे जाऊन स्वतःमध्ये बदल करत असेल तर सामान्य जनतेला एक चांगली सेवा आणि खाजगी लुटी पासून सुटका मिळणार यात शंका नाही. अलीकडची महागाईतून जाणारी सामान्य जनतेला एसटी महामंडळ आज काही अंशी आपले वाटत असल्याचे चित्र दिसत आहे.MSRTC will start a new service for the public : Will the private bus be affected?
काळानुसार बदल हा खूप महत्त्वाचा आहे. बदल स्वीकारून त्याप्रमाणे आपले अस्तित्व दाखवले तरच आपले अस्तित्व टिकणार आहे. एसटी महामंडळाला हे उशिरा का होईना कळले यात शंका नाही.
Writer,Activenama