अक्टिव्हनामा वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील शिंगणापूर,तालुका-जत,जिल्हा-सांगली येथे सालाबादाप्रमाणे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. तत्पूर्वी अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन उत्सव समितीद्वारे करण्यात आले होते. त्यामध्ये दिनांक 31 मे 2023 रोजी ग्रामपंचायत शिंगणापूर येथे अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार घालून शासकीय पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.Organizing various activities on the occasion of Ahilya Devi Holkar Jayanti at Shingnapur in border area.
या कार्यक्रमास शिंगणापूरचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी महिलांच्या हळदीकुंकू कार्यक्रमानंतर रांगोळी स्पर्धा,लिंबू-चमचा स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे आयोजन राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती व ग्रामपंचायत शिंगणापूर, महिला बचत गट शिंगणापूर यांनी केले. या कार्यक्रमानंतर 6 जून 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाची भव्य मिरवणूक निघणार आहे.
संध्याकाळी सहा ते आठ या कालावधीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. रात्री ठीक 8 वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी या संधीचा लाभ शिंगणापूरचे ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ बंधू भगिनींनी घ्यावा असे आवाहन राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती शिंगणापूर यांच्याकडून करण्यात आलेले आहे.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती उत्सवासाठी गावातील सर्व दानशूर व्यक्ती अर्थात आर्मी,नेव्ही सैनिक, गावातील शासकीय,निमशासकीय सेवेत असलेले कर्मचारी, औद्योगिक क्षेत्रात काम करत असलेले गावातील ग्रामस्थ या सर्वांचे आर्थिक सहाय्य लाभत आहे आणि जयंती उत्सव समितीच्या सदस्यांचे संपूर्ण कार्यक्रम पार पडेपर्यंत सहकार्य लाभणार आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाला गावातील ज्येष्ठ, कनिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे..

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680