नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हवा प्रदूषण जनजागृती कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन शाळा स्तरावर करण्यात आले होते. मनपा शिक्षण विभागाचा हा आदेश सर्व मनपा शाळा, सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू होता. त्यानुसार मनपा क्षेत्रातील शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.
दिनांक 11/7/ 2023 रोजी शालेय परिसरात हवा प्रदूषण नियंत्रण जनजागृती बाबत दिंडी काढण्यात आली होती.
दिनांक 12/07/ 2023 रोजी इयत्ता पहिली ते दहावी या विद्यार्थ्यांसाठी हवा प्रदूषणाचे दुष्परिणाम व उपाय आणि प्रदूषण मुक्त हवा आणि आरोग्य या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
दिनांक 13/7/2023 रोजी हवा प्रदूषणाचे दुष्परिणाम व उपाय त्याचबरोबर प्रदूषण मुक्त हवा आणि आरोग्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होत्या.
दिनांक 14/7/ 2023 रोजी इयत्ता दुसरी ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
त्यानुसार नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर येथे ही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
शाळास्तरावर निवड करण्यात आलेले स्पर्धकांची केंद्रस्तरावर दि. १७ ते २१ जुलै २००२३ या कालावधीत स्पर्धा घेण्यात येणार आहे. केंद्र स्तरावरील स्पर्धकांमधून प्रत्येक केंद्रातून विद्यार्थी व शिक्षक यांचे गटनिहाय फक्त प्रथम व व्दितीय क्रमांक काढून केंद्रनिहाय निवड करण्यात आलेल्या स्पर्धकांची माहिती दि. २४ जुलै २०२३ पर्यंत समग्र शिक्षा अभियान कार्यालय-१, पोलीस मुख्यालय, नाशिक येथे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर मनपास्तर स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेचा दिनांक, वेळ व स्थळ शाळांना कळविण्यात येणार आहे.
नाशिक महानगरपालिका आणि शिक्षण विभाग पर्यावरणात संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अशा विविध उपक्रमांचे आयोजन हे नेहमी करत असते. त्यानुसार विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये जनजागृती ही घडत असते.
Writer,Activenama