शाळा पूर्व तयारी अभियानांतर्गत शाळा स्तरावरील दुसरा मेळावा आज सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी महानगरपालिका शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मनपा शाळा क्रमांक 22 ध्रुवनगर मध्ये आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, Pre-School Preparatory Gathering No. 2 at Dhruvnagar Municipal School concluded in a cheerful and playful atmosphere.
पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियानाची” अंमलबजावणी करण्यात येत असते. मनपा शिक्षण विभागाला आलेल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पत्रानुसार महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये नागरी साधन केंद्र क्रमांक 1 व नागरी साधन केंद्र क्रमांक 2 या अंतर्गत 26 जून आणि 27 जून 2023 या दोन तारखा निश्चित केलेल्या होत्या. त्यानुसार मनपा शाळा क्रमांक 22 धृवनगर मध्ये शाळा पूर्वतयारी अभियानांतर्गत शाळा स्तरावरील दुसरा मेळावा आज आयोजित करण्यात आलेला होता.

महानगरपालिका शाळा क्रमांक 22 मध्ये या दुसऱ्या मेळाव्याचे उद्घाटन शिक्षणतज्ञ उषाताई दिपके यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डोकफोडे हेही उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुद्धा उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक सोनजी गवळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. परिसरात असणाऱ्या दाखल पात्र विद्यार्थ्याविषयी शाळेत दाखल करण्याविषयी मार्गदर्शन केले. उषाताई दिपके यांनी पालकांचे उद्बोधन केले. इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षिका कल्पना पवार, तसेच लता सोनवणे, दिपाली काळे इत्यादी उपशिक्षिकांनी इयत्ता पहिलीच्या मुलांचे औक्षण केले.
मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला प्रवेशित/दाखल सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी झाले होते, याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी दोन दिवस मेळाव्याबाबत शालेय परिसरात जागृती करण्यात आलेली होती.
उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले गेले होते. सर्व स्टॉल्सवर बालकाच्या कृतींच्या नोंदी विकास पत्रावर दुसन्या मेळाव्याच्या रकान्यात करण्यात आल्या. सदर ७ स्टॉल्स पुढीलप्रमाणे होते :
१) नोंदणी (रजिस्ट्रेशन),
२) शारीरिक विकास (सूक्ष्म व स्थूल स्नायू विकास),
३) बौद्धिक विकास,
४) सामाजिक आणि भावनात्मक विकास,
५) भाषा विकास,
६) गणनपूर्व तयारी,
७) पालकांना मार्गदर्शन.
मनपा शाळेचे सर्व शिक्षक व मुख्याध्यापक या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक ईश्वर चौरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपशिक्षक संतोष महाले यांच्यासह सर्वांनी सहकार्य केले.

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680