शिवाजीनगरच्या माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी  रागिनी नान्हे आणि कावेरी भदाणे यांची प्रश्नमंजुषा परीक्षेसाठी राज्यस्तरावर निवड : जिल्हा स्तरावर पटकावला प्रथम क्रमांक. 

  नाशिक:- शालेय मुलांसाठी आर्थिक प्रश्नावर अखिल भारतीय प्रश्नमंजुषा आयोजित परीक्षा शुक्रवार दिनांक ३० जून २०२३ रोजी गट स्तरावर सकाळी 10:00 ते 2:00 या कालावधीत आयोजित करण्यात आला होती . Ragini Nanhe and Kaveri Bhadane, students of Madhyamik Vidyalaya, Shivajinagar, State Level Selection for Quiz Examination : First rank secured at District Level.

ही परीक्षा अटल बिहारी वाजपेयी मनपा शाळा क्रमांक 46 काटे गल्ली,द्वारका नाशिक  येथे आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत शिवाजीनगरच्या मनपा  माध्यमिक विद्यालयाच्या कु.रागिनी प्रकाश नान्हे व कु.कावेरी दत्तात्रय भदाणे या विद्यार्थिनींनी सुरवातीला गट स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यावेळी त्यांची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली होती.या स्पर्धेत नाशिक मधील जवळ जवळ 57 शाळांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेसाठी प्रत्येक शाळेतून दोन विद्यार्थी निवडून पाठवण्यात आलेले होते आणि एक शिक्षक त्यांच्याबरोबर पाठवण्यात आलेला होता.Ragini Nanhe and Kaveri Bhadane, students of Madhyamik Vidyalaya, Shivajinagar, State Level Selection for Quiz Examination : First rank secured at District Level.

त्यानंतर ४ जुलै 2023 रोजी जिल्हा पातळीवर परीक्षा होऊन त्यामध्ये सुद्धा या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.आता त्यांची निवड राज्य पातळीवर मुंबई येथे करण्यात आली आहे.

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागासाठी ही एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की, म.न.पा शाळेमध्ये सामान्य घरातील विद्यार्थी जरी शिकत असले तरी,त्यांची बुद्धिमत्ता मात्र असामान्य आहे हे या यशावरून दिसून येते आणि या असामान्य बुद्धिमत्तेच्या पलीकडे लपलेले असतात त्यांचे शिक्षकवृंद अर्थात यांना मार्गदर्शन करणारे,सपकाळे सरांसारखे परिश्रम घेणारे शिक्षक.सपकाळे सरांचे मोलाचे मार्गदर्शन या दोन्ही विद्यार्थिनीना लाभलेले आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही.या शाळेतील सर्व गुरुजनवर्गांच्या पाठीमागे मार्गदर्शन असते. Ragini Nanhe and Kaveri Bhadane, students of Madhyamik Vidyalaya, Shivajinagar, State Level Selection for Quiz Examination : First rank secured at District Level.

नगरसेवक मा.दिनकर आण्णा पाटील, मा.अमोल भाऊ पाटील आणि म.न.पा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी  मा. बी.टी पाटील यांचे. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थीनी व त्यांना मार्गदर्शन करणारे श्री सपकाळे सर यांचे  शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र सोनार सर यांनी अभिनंदन केले.Ragini Nanhe and Kaveri Bhadane, students of Madhyamik Vidyalaya, Shivajinagar, State Level Selection for Quiz Examination : First rank secured at District Level.

.त्याचबरोबर मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी मा.बी.टी.पाटील आणि शिवाजीनगर भागातील सर्व शिक्षकांनी या यशस्वी टीम चे अभिनंदन केले.या यशाबद्दल शाळेचे व सर्व शिक्षकांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.               

Leave a Comment