नाशिक शहर मनसे शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुरेश खांडबहाले यांच्या मातोश्री,महिरावणी गावच्या उपसरपंच कै. झुणकाबाई डुमाजी खांडबहाले यांचा प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध कार्यक्रम आज दिनांक 30 जुलै 2023 रोजी हॉटेल संस्कृती जवळ असलेल्या त्र्यंबक रोड वरील शिवगंगा लॉन्स येथे पार पडला.Nashik City MNS Teacher Sena President Suresh Khandbahale’s mother Shri Kai Jhunkabai Dumaji Khandbahale’s first Punyasmaran Varshrad program concluded at Mahiravani.
कै. झुणकाबाई डुमाजी खांडबहाले या खांडबहाले परिवारातून जाऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे, त्यांची आठवण जपण्यासाठी, जतन करण्यासाठी, त्यांच्या प्रेमापोटी, त्यांच्या परिवाराने हा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ह. भ. प. भागवताचार्य दिगंबर महाराज किरकाडे ( पुरणगाव,येवला) यांचे बहुमोल किर्तन हे होते. ह.भ.प. भागवताचार्य दिगंबर महाराज किरकाडे यांच्या किर्तनाने जमलेल्या जनसमूहावर त्यांच्या बहुमोल वाणीचा प्रचंड परिणाम दिसून आला. सकाळी ठीक दहा ते दुपारी साडेबारा असे त्यांचा भजन व किर्तनाचा कार्यक्रम होता. याचा लाभ जमलेल्या सगळ्या उपस्थितांनी घेतला. त्यांनी आपल्या किर्तनात आई-वडील या नात्याविषयी बहुमोल असे उपदेश दिले. Nashik City MNS Teacher Sena President Suresh Khandbahale’s mother Shri Kai Jhunkabai Dumaji Khandbahale’s first Punyasmaran Varshrad program concluded at Mahiravani.ह. भ. प. भागवताचार्य दिगंबर महाराज किरकाडे ( पुरणगाव,येवला) यांच्या सोबत जनार्दन स्वामी वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता.अतिशय तल्लीन होऊन हे विद्यार्थी महाराजांची साथ देत होते.टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर ही मुले भगवंताच्या भक्तीत तल्लीन झाली होती.या मुलांचे जेवढे कौतुक करावे तितके कमीच होते.जनार्दन स्वामी वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर येथील विद्यार्थ्यांना खांडबहाले परिवाराकडून शैक्षणिक साहित्य यावेळी वाटप करण्यात आले.तसेच खांडबहाले परिवाराकडून कै.झुणकाबाई डुमाजी खांडबहाले यांच्या स्मरणार्थ महिरावणी गावाला प्रवेशद्वार कमान बांधून देण्याचा संकल्प करण्यात आला.
जगात दोनच नाती आहेत,जे कोणताही स्वार्थ ठेवत नाहीत ते म्हणजे आई आणि वडील.आपण ती नाती जपली पाहिजे. प्रत्येकाची वेळ येत असते आणि जात ही असते. या काळात वाणी आणि पाणी आपण जपून वापरले पाहिजे. कोरोना काळात कोणाची मावशी, कुणाचे काका कुणाचे भाऊ कुणाचे अजूनही नातेवाईक आपल्यातून निघून गेले. आपणास भगवंतांनी जिवंत ठेवलं त्या अर्थी भगवंताला आपल्या हातून काहीतरी चांगलं काम करून घ्यायच आहे.
असे ह. भ. प. भागवताचार्य दिगंबर महाराज किरकाडे ( पुरणगाव,येवला) बोलत होते. कैलासवासी झुणकाबाई डुमाजी खांडबहाले यांचा हयात परिवार खूप मोठा आहे. श्री डुमाजी चंदू खांडबहाले (पती), श्री सुरेश डुमाजी खांडबहाले (मुलगा), श्री गोरख डुमाजी खांडबहाले (मुलगा), सौ.अलका गंगाराम गोवर्धने(मुलगी), सौ.मनीषा सुरेश खांडबहाले (सून), सौ सुनीता गोरख खांडबहाले (सून), समृद्धी सुरेश खांडबहाले (नात), कृष्णा गोरख खांडबहाले (नातू) आणि ईश्वरी गोरख खांडबहाले (नात) इत्यादी सदस्यांचा त्यांच्या परिवारात समावेश आहे.Nashik City MNS Teacher Sena President Suresh Khandbahale’s mother Shri Kai Jhunkabai Dumaji Khandbahale’s first Punyasmaran Varshrad program concluded at Mahiravani
भजन आणि किर्तन कार्यक्रम पार पडल्यानंतर खांडबहाले परिवाराने उपस्थित सर्व लोकांसाठी प्रसादाची उत्तम व्यवस्था ही केली होती.
या कार्यक्रमाला नाशिक शहर, महिरावणी आणि महिरावणी च्या आजूबाजू च्या खेड्यातील अर्थात पंचक्रोशीतील बहुसंख्य नातेवाईक व लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते..
त्याचबरोबर या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर ही उपस्थित होते. त्यामध्ये राजकारण,अध्यात्म,शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवराचा समावेश होता.अध्यात्मिक क्षेत्रातील,नाशिक वारकरी महामंडळ शहर अध्यक्ष श्री धनंजय महाराज रहाणे, गायनाचार्य श्री दीपक महाराज कुयटे, ह.भ.प. श्री दीपक महाराज एखंडे, ह.भ.प. शिवाजी माऊली खांडबहाले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती माजी महापौर दशरथ आप्पा पाटील यांची.त्याचबरोबर मा. नगरसेवक शशिकांत जाधव,नगरसेवक सलीममामा शेख,नगरसेवक भागवत भाऊ आरोटे,मा.मुरलीधर आण्णा पाटील,मा.अशोकभाऊ पारखे,मा.बाळासाहेब जाधव आणि नाशिक शहरातील व महिरावणी गावातील तसेच पंचक्रोशीतील विविध मान्यवर उपस्थित होते.
नाशिक मनपा शिक्षण विभागातील अनेक शिक्षकांचाही या कार्यक्रमाला उपस्थिती दिसून येत होती.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680