आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांनी प्रस्ताव सादर करावेत : शिक्षण विभाग.

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाकडून गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यासाठी सन “2022-23” करीता प्रस्ताव सादर करण्याचे परिपत्रकाद्वारे मा. प्रशासनाधिकारी बी.टी पाटील यांच्याद्वारे अवगत करण्यात आले आहे. Teachers should submit proposals for Adarsh Teacher Award: Nashik Municipal Education Department.

नाशिक महानगरपालिका, शिक्षण विभागामार्फत 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांना “आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात येतो, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात देखील 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांना “आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. त्याकरीता निवड करावयाची असल्याने मनपा शिक्षण विभागातर्गत मनपा प्राथमिक, माध्यमिक व खाजगी प्राथमिक शाळांत कार्यरत असलेल्या शिक्षकांकडून “आदर्श शिक्षक पुरस्कार करीता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

तसेच यापुर्वी ज्यांना मनपा आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्य/राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला असेल अशा शिक्षकांनी पुन्हा प्रस्ताव सादर करु नये. असे परिपत्रकात नमूद आहे. परिपत्रकात नमूद केलेले निकष व मुद्यांची माहिती अचुक व वस्तूनिष्ठ स्थितीला अनुसरुन व योग्य त्या तदअनुषंगीक कागदपत्रे व पुराव्यासह प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे.Ideal Teacher Award:

मुख्याध्यापक/ उपशिक्षकांचे प्रस्ताव संगणकीय 4 प्रतीत लिगल साईज पेजवर नाशिक महानगरपालिका, शिक्षण विभाग कार्यालयात दिनांक 09/08/2023 पावेतो सादर करणेत यावे. मुदतीनंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी.

पुरस्कारासाठी पात्रतेचे निकष 

1) मुख्याध्यापकांची एकूण सेवा किमान 20 वर्ष असावी

2) उपशिक्षकांची एकूण सेवा किमान 15 वर्ष असावी

 3) शैक्षणिक व व्यावसयिक पात्रता

4) मुख्याध्यापकांचे प्रस्ताव त्या केंद्राचे केंद्रप्रमुख व उपशिक्षकांचे प्रस्ताव त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी पडताळणी करून इकडील कार्यालयास सादर करावेत.

5) प्रस्ताव सादर करणा-या शिक्षकांवर कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित अथवा झाली नसल्याचे प्रमाणपत्र असावे.

 6) फौजदारी गुन्हा प्रलंबित नसल्याचे पोलिस ठाण्याचे प्रमाणपत्र असावे.

7) मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल (साक्षांकित) असावेत. 

8) स्थानिक सहभागगातून उपक्रम/सामाजिक कार्य पुरावे

9) वैशिष्टपूर्ण उपक्रम 

10) गुणवत्ता विकासात संबंधित वर्गाचे कामकाज, चाचणीचे निकाल सादर करावेत

11) गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न वर्ग पातळीवरील उपक्रम, नवोपक्रम, कृति संशोधन) पुरावे सादर करावेत. 

12) शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परिक्षा, विज्ञान प्रदर्शन व सहभाग पुरावे जोडावेत.

13) विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेले प्रयत्न पुरावे जोडावेत.

(14) राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग पुरावे जोडावेत.

15) कोविड 19 काळातील उपक्रम ,विद्यार्थी- शिक्षक ऑन लाईन शिक्षण पुरावे जोडावेत,

16) विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केलेले प्रयत्न पुरावे जोडणे आवश्यक

17) स्वतःची कार्यक्षमता टिकवून ठेवणे करिता केलेले प्रयत्न, उपक्रम व घेतलेले प्रशिक्षण यांचे पुरावे जोडावेत.

 (18) लोकसहभागातून मिळविलेले साहित्य मुख्याध्यापकांच्या सहीने प्रमाणित सादर करावेत.

19) प्रकाशित लेख, पुस्तके, शोधनिबंध, प्रबंध, हस्तलिखिते यांची यादी जोडावी.

कागदपत्रे व प्रमाणपत्रे खालीलप्रमाणे जोडणे आवश्यक आहे

1) पासपोर्ट आकाराचे 5 फोटो

2) प्रस्तावासोबत केंद्र प्रमुख मुख्याध्यापक त्यांचे शालेय कामकाजाबाबत शिफारस पत्र

3) तसेच पुरस्कारासाठी पात्रतेचे निकषामध्ये नमूद केलेली सर्व प्रमाणपत्रे व कागदपत्रे जोडणे व सर्व अभिलेखांवर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी, शिक्का असणे आवश्यक आहे. वरील प्रमाणे प्रस्ताव सोबत कागदपत्रे/ प्रमाणपत्रे जोडून परिपुर्ण प्रस्ताव दिनांक 09/08/2023 पर्यंत या कार्यालयास सादर करावेत असे परिपत्रकात नमूद आहे.

Leave a Comment