लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित  समूहगीत स्पर्धा   २०२३-२४  (वर्ष २ रे) : इच्छुक शाळांनी आत्ताच गुगल फॉर्म भरा लिंक दिली आहे.

नाशिक मध्ये विविध सामाजिक संस्था विविध समाजउपयोगी उपक्रम व स्पर्धा आयोजित करीत असतात.लोकांना व इतर घटकांना त्याचा नेहमी फायदाच होत असतो.अलीकडेच

लोकहितवादी मंडळ, नाशिक तर्फे दि.१२ किंवा १३ ऑगस्ट २०२३ रोजी महानगरस्तरीय शालेय व संगीत क्लासेस यांच्यासाठी समूहगीत स्पर्धा आयोजीत केलेली आहे.

या स्पर्धेत खालीलपैकी कुठल्याही एका विषयावर समुहगीत सादर करावयाचे आहे.

Lokhitwadi Mandal, Nashik Organized Ensemble Song Competition 2023-24 (Year 2): Interested schools have just given the link to fill the google form.

       देशभक्तीपर गीत

     स्री-क्रांतिकारक गीत                                      

     छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील गीत

     स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कवितांवर

     पद्मभूषण वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या कवितांवर

Lokhitwadi Mandal, Nashik Organized Ensemble Song Competition 2023-24 (Year 2): Interested schools have just given the link to fill the google form.

नाशिक महानगरस्तरीय शाळांसाठीच हि स्पर्धा मर्यादीत आहे. आपल्या शाळांनी संघातील कलाकार (वादक, मार्गदर्शक) यांच्या यादीसह

दि. ५ ऑगस्ट पर्यंत प्रवेशासाठी गुगल लिंक वर संपर्क साधावा.

थेट संपर्क :-  श्री. सुभाष पाटील -९८२२८३०४६४  /  श्री.किरण समेळ –९४२२२५६०४१

आपण गुगल  फॉर्मच्या  सहाय्यानेच फॉर्म भरु शकतात.

लिंक- https://forms.gle/DeTVHoWn2ZdKuK7a7

समूहगीत स्पर्धेचे नियम:-

 ♦️संघानी वरील विषयांवरच समूहगीत सादर करावे.

♦️समूहगीत हिन्दी किंवा मराठी भाषेतून सादर करता येईल.

♦️ चित्रपटातील वरील विषयांवरील  समुहगीतास परवानगी दिली जाणार नाही.

♦️ शाळा अथवा संस्थेने त्यांना   लागणारे साहित्य व त्यांना लागणारे वादक सोबत आणावे.

♦️ कमीत कमी ४ व जास्तीत जास्त १० गायक स्पर्धकांचा एका संघात समावेश असेल.  (१ली  ते १० वी मधील कुठलेही विद्यार्थी  संघात सहभागी होऊ शकतात.)

♦️संघ मुलांचा, मुलींचा किंवा मुले-मुलींचा एकत्रितही असू शकेल.

♦️ संघाबरोबर वादक, साथीदारांची संख्या जास्तीत जास्त तीन असावी,  परंतु गायकांना गाता गाता वाजवण्यास परवानगी असेल.

♦️ समूहगीतांसाठी मिळून किमान ८ व कमाल १० मिनीटांचा वेळ  दिला  जाईल.जास्तीत जास्त ३० सेकंद अधिकचा वेळ मान्य करण्यात येईल. त्यापेक्षा अधिक वेळ झाल्यास संघ स्पर्धेतून बाद करण्यात येईल. (रंगमंचावर येणे, संगीत साहित्य लावणे, हे सर्व मिळुन १० मिनिटांचा वेळ दिला आहे.)

♦️समुह गीताचे परीक्षण केवळ गायनाच्या गुणवत्तेच्या आधारेच केले जाईल.  रंगभूषा, वेशभूषा करण्यास परवानगी असेल परंतु संघातील व्यक्तींनी केलेल्या हावभावांच्या आधारे परीक्षण  केले जाणार नाही

♦️ परीक्षणासाठी गीताची निवड, स्वररचनेचे नाविन्य, ताल, गती, सांघिक एकता व सादरीकरण हे निकष वापरले जातील.

♦️ एका शाळेतून एक अथवा संगीत क्लास मधून एका पेक्षा जास्त (कितीही) संघाना भाग घेता येईल.

♦️ आयोजकांचा व परीक्षकांचा निर्णय अंतीम असेल.

♦️सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

♦️विजेत्या पाच संघाना आकर्षक मोठे स्मृतीचिन्ह व रोख  पारितोषिक देण्यात येईल.

प्रथम क्रमांक :- २५००/- रु रोख व  स्मृतिचिन्ह

द्वितीय क्रमांक :- २०००/- रु रोख व स्मृतिचिन्ह

तृतीय क्रमांक :- १५००/- रु रोख व स्मृतिचिन्ह

चौथा क्रमांक :- १०००/-रु रोख व स्मृतिचिन्ह

पाचवा क्रमांक :-  ५००/-रु रोख व स्मृतिचिन्ह

Leave a Comment