नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सातपूर विभागातील मनपा शाळा क्रमांक 24 विश्वासनगर,जी केंद्र क्रमांक 21 ची केंद्र शाळा आहे, त्या शाळेला उज्वल यशाची परंपरा कायम लाभली आहे. सदर शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देणारीच शाळा नसून प्रत्यक्षात शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, गुणवत्तेत उत्तीर्ण विद्यार्थी घडवणारी शाळा आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे यांच्यामार्फत आयोजित केली जाते. त्या प्रत्येक परीक्षेत या शाळेचे विद्यार्थी पासच होत नसून गुणवत्ता यादीत भरघोस गुण मिळवून स्थान प्राप्त करत असतात. अशा विद्यार्थ्यांचे,त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकाचे कौतुक करणे क्रमप्राप्त ठरते.
हे ही वाचा
आता आपली आवडती स्प्लेंडर इलेक्ट्रिक अवतारात ; इतकी असणार किंमत.
महानगरपालिका शाळा क्रमांक 24 विश्वासनगर सातपूर येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून इयत्ता पाचवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे मा.शिक्षणाधिकारी बी. टी.पाटील,प्रभागाचे मा.ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत जाधव, मा.ज्येष्ठ नगरसेविका इंदुताई नागरे, मा.नगरसेविका पल्लवीताई पाटील, मा.नगरसेविका माधुरीताई बोलकर, यांच्या उपस्थित व शुभ हस्ते संपन्न झाला.
हे ही वाचा
कार्तिक दत्तू खुरपडे हा विद्यार्थी संपूर्ण सातपूर विभागातून नाशिक महानगरपालिकेचा एकमेव विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या गुणवत्ता यादीत आला आहे. त्याचबरोबर शाळेचे नऊ विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवी मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत.
गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेले व उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत.
कार्तिक दत्तू खुरपडे
कार्तिकी कांतीलाल बागुल
सत्यम राजेंद्र अहिरे
रितेश प्रवीण कोळी
कृष्णा विश्वनाथ सूर्यवंशी
प्रथमेश हरी देवरे
श्रद्धा केतन शिंदे
खुशी सिद्धोधन ठोके
मिसबा फिरोज पिंजारी
हे ही वाचा
सनी देओलचा गदर-2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणणार ! चित्रपटाचा रिव्ह्यू वाचा.
या सर्व विद्यार्थ्यांना नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील क्रियाशील,आदर्श शिक्षक शिवाजीराव शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक तथा केंद्रसमन्वयक प्रकाश शेवाळे,रमेश भोये, मोहन चौधरी, नितीन पालवी, श्रीम.उज्वला एखंडे, ज्योती गर्दे, अनिता शिराळे, स्वाती फटांगरे, संध्या मोरे, संगीता देवरे,वर्षा भालेराव व प्रकाश गायकवाड आदींचे सहकार्य लाभलेआहे.महानगरपालिका शाळा क्रमांक 24 विश्वासनगर येथील स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Writer,Activenama