EVM Machine वर उमेदवाराचा क्रमांक असा ठरतो |

EVM Machine वर उमेदवाराचा क्रमांक असा ठरतो | या विषयी सविस्तर माहिती

महाराष्ट्र मध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे तीन टप्पे पार पडलेले दिसून येते. यामध्ये 13 लोकसभा मतदार संघात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता महाराष्ट्रातील पुढील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे. मतदान केले आहे किंवा केले नाही असे  दोघांनाही एक प्रश्न पडलेला असेल तो म्हणजे आपण जेव्हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात जातो तेव्हा EVM Machine वर किंवा बॅलेट युनिट वर जी उमेदवारांची यादी असते त्यावर कोणत्या पक्षाचा किंवा उमेदवाराचा क्रमांक काय असेल?  हे कोण ठरवतो. निवडणूक आयोग सरकारच्या किंवा विरोधकांच्या सोयीनुसार ही यादी तयार करत असेल का? तसं नसेल तर यासाठी कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात?  या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात जाणून घेऊया.

हे ही वाचा: गणेश लोहार यांनी केली तब्बल सात वेळा नर्मदा परिक्रमा.

एखादा मतदार संघातील उमेदवार कोणत्या क्रमांकावर असेल हे ठरवले जाते ते प्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार.  अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख संपल्यानंतर संबंधित मतदार संघातील निवडणूक अधिकारी EVM Machine वर छापण्यासाठी अंतिम यादी तयार करतात आता ही यादी कोणत्या आधारावर तयार केली जाते. प्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 38 नुसार उमेदवाराचा क्रमांक ठरवताना त्यांना तीन  प्रकारात विभागले जाते.

पहिला प्रकार

 नोंदणीकृत राष्ट्रीय किंवा राज्य पक्ष

दुसरा प्रकार

 नोंदणीकृत पंजा पक्षाला राष्ट्रीय किंवा राज्य पक्ष म्हणून मान्यता नाही असे पक्ष

तिसरा प्रकार

अपक्ष उमेदवार

या उमेदवारांची प्रतिनिधित्व कायद्यानुसार विभागणी केली तर बहुजन समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिंदेंची शिवसेना हे पक्ष पहिल्या प्रकारात म्हणजेच राष्ट्रीय आणि राज्यपक्ष प्रकारात येतात. नोंदणीकृत आणि राष्ट्रीय  मान्यताप्राप्त, राज्य पक्ष यांच्यानंतर येतात पण मान्यता प्राप्त नसलेले पक्ष अनेकांना वाटत असेल की वंचित बहुजन आघाडी हा तर शिवसेना,राष्ट्रवादी यासारखाच राज्यव्यापी पक्ष आहे मग त्यांचा उमेदवार सातवा क्रमांक कसा काय?  तर वंचित बहुजन आघाडी राज्यव्यापी पक्ष असला तरी या पक्षाला राज्यव्यापी पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी अपेक्षित मतांची टक्केवारी  मिळलेली नाही. म्हणून अनेक ठिकाणी वंचित उमेदवार EVM Machine वर खालच्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा: पुरुषांचे वजन वयानुसार किती असावे ? महत्त्वाची माहिती

नोंदणीकृत आणि मान्यता नसलेल्या पक्षानंतर अपक्ष उमेदवाराचा नंबर लागतो. त्यामुळे अपक्ष उमेदवार सर्वच मतदार संघात EVM मशीन वर अगदी खालच्या क्रमांकावर असतात. अनेकांना प्रश्न पडले असतील की पक्षाचा दर्जा हा निकष लावला तर आमच्या मतदारसंघात या निकषानुसार EVM वर उमेदवाराचा क्रमांक नव्हता. किंवा दुसरे पक्ष असाही असू शकतो की राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्ष यांच्यात कोणत्या पक्षाला आधी प्राधान्य दिले जाते.

तर यासाठी निकष लावला जातो तो म्हणजे  alphabet किंवा मुळाक्षरांचा Conduct of election rules 1961 च्या कलम 10 नुसार EVM  मशीनवर क्रमांक देताना पक्षाच्या दर्जा बरोबर उमेदवाराच्या नावाचा देखील विचार केला जातो.  आता उमेदवारांचा विचार करताना भाषा कोणती ठरवली जाते तर महाराष्ट्रात निवडणूक असल्यामुळे मराठी मुळाक्षरानुसार उमेदवाराचा क्रमांक ठरवला जातो. 

हे ही वाचा: निर्मल ग्राम निर्माण केंद्रामध्ये बिलिफ कडून लहान मुलांसाठी समर कॅम्प

Conduct of election rules 1961 कलम 10 हे निवडणूक आयोगाला संबंधित राज्यात कोणत्या भाषेच्या आधारावर उमेदवाराचा क्रमांक ठरवला जावा याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देते. त्यानुसार आयोगाने महाराष्ट्रात मराठी मुळाक्षरानुसार क्रमांक दिला आहे.

मुळाक्षरांचा संदर्भ होऊन ज्याला पक्षाच्या दर्जाची जोड देऊन उमेदवार हा क्रमांक कोणता असेल हे ठरवतो.. सत्ताधारी पक्ष म्हणून पहिला क्रमांक किंवा विरुद्धक आहे म्हणून शेवटी टाकू असा भेदभाव निवडणूक आयोग करत नाही. प्रतिनिधित्व कायदा 1961 च्या कलम 38 नुसार आणि Conduct of election rules 1961च्या कलम 10 नुसार उमेदवारांचे क्रमांक ठरवले जातात.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उमेदवाराचा क्रमांक ठरवताना नावाचा विचार केला जातो की आडनावाचा?  आता हा निर्णय उमेदवाराचा असतो. तर त्यावर त्या नावाचा विचार केला जातो. दिले असेल तर अशा वेळेस आडनावाचा विचार केला जातो. उमेदवारांना EVM  मशीन वर नाव काय असायला हवं हे आधी विचारले जाते. उमेदवार स्वतःच्या नावापुढे डॉ. , एडवोकेट, यांसारख्या डिग्री लावतात. काही जण आपल्या नावापुढे Mr. ,Mrs., कुमार, कुमारी असे उल्लेख जोडतात. 

हे ही वाचा: सुवर्णसंधी : नवोदय विद्यालय समितीकडून 1377 पदांची भरती

अशा वेळी निवडणूक आयोग उमेदवारी क्रमांक देताना अशा पदांचा किंवा पदव्यांचा विचार करत नाही. उमेदवाराच  नाव किंवा आडनाव  यांचा विचार केला जातो. दोन सारख्या नावाचे उमेदवार असतील तर त्यांचा व्यवसाय किंवा घराचा पत्ता किंवा आयुक्त ठरवेल. कोणत्याही  गोष्टीसाठी नाव याची खात्री व काळजी घेतली जाते. मतदान करताना मतदारांचा कमीत कमी गोंधळ उडेल. यामुळे मतदान सुरळीत पार पडेल. 

Leave a Comment