प्रवासात उलट्या होण्याचे कारण आणि उपाय

प्रवासात उलट्या होण्याचे कारण आणि उपाय याविषयी सविस्तर माहिती

अनेक जण असे असतात ज्यांना प्रवासात उलट्या होतात, तुम्हालाही हा त्रास होत असेल पण तुम्ही कधी असा विचार केला नाही की हा त्रास तुम्हाला का होतो. तर त्या मागचं कारण असं आहे की जेव्हा आपण प्रवास करत असतो, तेव्हा आपल्या शरीराला एक गती प्राप्त होते.

हे ही वाचा: संकलित मूल्यमापन 2 : शिक्षक मार्गदर्शिका इयत्ता 3 ते 8 गणित विषय

यामुळे आपल्या शरीरातील पाच प्रमुख केंद्र यांपैकी दोन इंद्रिये म्हणजे डोळे व कान यांचे ते समन्वय बिघडते. ते कसे तर प्रवासाच्या वेळेस गाडी पुढे जाते पण आपण एकाच ठिकाणी स्थिर असतो. त्यामुळे डोळ्यांनी जर आपण बाहेर बघितले तर आपल्याला वाटते की आपणही चालतो आहे. पुढे जात आहे आणि आपले कान याच्यात गोंधळून जातात. यामुळे आपल्या मेंदूपर्यंत चुकीचे आवेग पोहोचतात याच्या प्रेरणेमुळे आपल्या पोटात मळमळया उठू लागतात आणि आपल्याला उलट्या होतात. या समस्येवर उपाय म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे हे आज तुम्हाला पाहणार आहोत.

तुम्ही प्रवास करत असताना कोणत्याही बंद वाहनातून प्रवास करू नये, जसे की एसी बस किंवा इतर वाहने. जरी तुम्ही एसी बस मधून प्रवास करीत असाल तर अशा वेळेस तुम्ही डोळे बंद करून झोपून जावे किंवा अशा वस्तूकडे तुमचे लक्ष केंद्रित करावे जे पूर्णपणे स्थिर अवस्थेत आहे.

हे ही वाचा: SIP मध्ये अधिक फायदा होण्यासाठी या बाबी लक्षात ठेवा

त्यामुळे तुमचे कान व डोळे यांच्यातील समन्वय बिघडणार नाही. दुसरा उपाय म्हणजे तुम्ही प्रवास करत असताना असे पदार्थ खावे जे खायला कुरकुरीत असेल,जसे की कुरमुरे. काही वेळेस काही जणांना प्रवासात काही खाल्ल्यानंतरही उलटी येते तर अशा वेळेस तुम्ही अशा एखाद्या वस्तूचा वास घ्यावा तिचा वास खूप उग्र असेल, जसे की कापूर.यामुळे तुम्हाला मळमळ सुटणार नाही आणि उलटी होणार नाही.

तसेच हा त्रास थांबवण्यासाठी तुम्ही “लघु सूतशेखर” या नावाची एक गोळी असते ती घ्यावी. ही गोळी घेतल्याने तुम्हाला प्रवासात होणाऱ्या मळमळीचा त्रास कमी होईल. ही गोळी प्रवासाच्या दोन दिवस आधी सुरू करावी आणि प्रवासाच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत सुरू ठेवावी. यामुळे तुम्हाला प्रवासात उलट्या होतात त्या कमी होतील.

Leave a Comment