ChatGPT 4 च्या सहाय्याने संपुर्ण फोटो Analyse करता येणार. चांगले कि वाईट ?

ChatGPT 4 च्या सहाय्याने फोटोचे संपुर्ण analyse करता येणार ? फायदा ? तोटा ? संपुर्ण माहिती.

पूर्वीच्या काळी फोटो काढणे खूप कमी प्रमाणात होते, पण बदलत्या काळानुसार त्याचे संपूर्ण चक्र बदलले आहे. पूर्वी लोक कधीतरी एखादा फोटो छोट्या कॅमेरा द्वारे काढायचे.पण तो काळसर कलर मध्ये असायचा जसजशी प्रगती होत गेली तस तसा या गोष्टींमध्ये खूप काही बदल होत गेला .With the help of ChatGPT 4, a complete analysis of the photo can be done. Good or bad

80% डिस्काउंट मिळवा ! अमेझॉन वर !!
आपल्या घरात दररोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंवर 80% डिस्काउंट ! आजच या लिंक वर क्लिक करा आणि मिळावा.
लिंक :
https://amzn.to/3rwMc7b

हे ही वाचा

पदोन्नती नंतर एक वेतनश्रेणी : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांतील पदवीधर शिक्षकांना,मुख्याध्यापकांना,केंद्रप्रमुखांना !

सध्या फोटो काढण्यासाठी मोठ्या कॅमे-याची गरज राहिली नाही. मोबाईल मध्ये आपण आपल्याला हवा तसा फोटो काढू शकतो.शिवाय रंगीबेरंगी पार्श्वभूमी सुद्धा करता येते.सध्या लोक सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपले फोटो इंस्टाग्राम ,फेसबुक ,व्हाट्सअप, यावर टाकतात. त्यामुळे आता यापुढे सोशल मिडीयावर टाकावा कि नाही यावर सुद्धा विचार करण्याची वेळ येईल असे वाटू लागले आहे.

आपले फोटो इंस्टाग्राम ,फेसबुक ,व्हाट्सअप, यावर टाकत असताना त्यामध्ये आपली ठराविक माहिती सुद्धा आपण टाकत असतो.त्यामुळे व्यक्ती व व्यक्तीबाबत माहिती ओळखणे सोपे झाले आहे. आज कालच्या तंत्रज्ञानाच्या युगात खूप काही प्रगती झाली आहे.ChatGPT 4 ने जीवनाला खूप सोपे बनवले आहे.तर याउलट त्याने काहींच्या नोकऱ्या सुद्धा खल्लास केल्या आहेत.


Chat GPt 4 ची वैशिष्ट्ये:

यामध्ये कोणत्याही फोटोचे विश्लेषण करता येते.Chat GPT 4 बाबत सांगायचे झाले तर ,एखादा फोटो Chat GPt 4 ला दाखवल्यानंतर त्या फोटोमध्ये व्यक्ती काय विचार करत आहे ,त्याची मनस्थिती काय आहे ,काय करणार आहे, काय बोलणार आहे ,सगळ्या गोष्टी बाहेर येतात. Chat GPt 4 चा वापर हा एखाद्या व्यक्तीची गाडी रस्त्यामध्ये बंद पडली असेल, तर कोणता पार्ट खराब झाला आहे, तो दुरुस्त करण्यासाठी त्या भागाचा फोटो काढून पाठवल्यानंतर त्याचे विश्लेषण करता येणार आहे.परंतु Chat GPt 4 हे खूप धोकादायक सुद्धा आहे. काही वेळेस त्याचा अयोग्य ठिकाणी सुद्धा वापर होऊ शकतो.

हे ही वाचा

दप्तरमुक्त शनिवार : मी क्वीन…! अनोखा उपक्रम मनपा शाळा क्र.86 (मुली) पाथर्डीगांव येथे संपन्न !

Chat GPt 4 मुळे हा खूप मोठा धोका सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे,कारण फोटो बघून खूप काही अंदाज लावू शकतो.काय होत आहे, काय होणार आहे ,हेही कळते.माणसांमधील खूप काही धोकादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या फोटोचे विश्लेषण करताना, त्याच्या वैयक्तिक गोष्टी सुद्धा समजण्याची शक्यता असते.त्यामुळे वैयक्तिक जीवन ही धोक्यात येऊ शकते.

तो काय म्हणत आहे, हे कळल्यास मशीनद्वारे विश्लेषण झाल्यास ,त्यातील सुंदरता खराब होईल आणि धोका देखील निर्माण होऊ शकतो.Chat GPt 4 द्वारे फोटोचे विश्लेषण होईल आणि फोटो बोलू लागेल तसेच कोणताही फोटो गुप्त राहू शकणार नाही.

Chat GPt 4 मुळे काही गोष्टी खूप सोप्या होतात, पण काही ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो.Chat GPt 4 हा नवीन पिढीसाठी खूप धोकादायक ठरणार आहे.Chat GPt 4 ची योग्यता वापरण्यावरून ठरणार आहे. जर का त्याचा वापर आपण चांगल्या ठिकाणी केला तर तो योग्य ठरेल अन्यथा तो शाप ठरू शकते.

Leave a Comment