ऑनलाईन पद्धतीने फसवणूक झाली ? तर इथे तक्रार करा या विषयी सविस्तर माहिती वाचा
Table of Contents
तंत्रज्ञान आता अधिक विकसित झाले आहे. सध्याचे युग हे इंटरनेट आणि डिजिटायझेशनचे युग असल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर हा अधिक प्रमाणात होऊ लागला असून अनेक प्रकारचे कठीण व अवघड कामे लवकरात लवकर अगदी घरात बसून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होत असतात.
तंत्रज्ञानाच्या साह्याने तुम्हाला पैशांच्या संदर्भात व्यवहार करता येतो, जसे की वीज बिल, बँकेचे कोणतेही काम असो व तुम्ही एका क्षणात मोबाईलच्या साह्याने यूपीआय प्लॅटफॉर्मच्या मदतीने एखाद्याला पैसे पाठवण्यासाठी, कोणतेही बिल पेमेंट करण्यासाठी, मोबाईल रिचार्ज करण्यासाठी, व कर्ज घेतले असेल तर त्याचे हप्ते भरण्यासाठी देखील वापर करू शकतो.
हे ही वाचा: उष्णतेची लाट विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत
तुम्हाला माहीतच असेल की प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात तसेच तंत्रज्ञानाला देखील चांगली तशीच वाईट बाजू देखील आहे. कारण तंत्रज्ञानाच्या मदतीने सध्याच्या युगात मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारी घडत असल्याचे दिसून येते. अनेक प्रकारे सायबर गुन्हेगारी होत आहे. त्यात काही भामटे गुन्हेगार लोकांचे बँकेतील पैसे खात्यातून रिकामे करतात. असेच अनेक मार्गाने सायबर गुन्हेगार फ्रॉड करू शकतात.
सायबर क्राईम ची प्रकरणे ही दिवसेंदिवस वाढत जात असलेली दिसून येत आहेत. असे काही घडले तर तक्रार कुठे करायला हवी ? व कशी करायला हवी ? हे अजून काही लोकांना माहित नाही.
अशा प्रकारची कोणतीही घटना झाली व पैशाच्या संबंधित फसवणूक झाल्यास कुठे व कशी तक्रार करायला हवी याविषयी सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेऊया.
हे ही वाचा: संकलित मूल्यमापन 2 : शिक्षक मार्गदर्शिका इयत्ता 3 ते 8 गणित विषय
कुठे व कशी तक्रार कराल ?
- https://cybercrime.gov.in या वेबसाईटवर भेट द्या.
- खुल्या झालेल्या मुखपृष्ठावरील तक्रार दाखल करा या पर्यायावर क्लिक करा.
- शर्ती व अटी वाचा व मी स्वीकारतो या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर रिपोर्ट सायबर क्राईम या ऑप्शन वर क्लिक करा.
- त्यानंतर नवीन वापरकर्त्यांसाठी येथे क्लिक करा. हे केल्यानंतर तुमचे राज्य, नाव, ई-मेल, फोन नंबर आणि इतर आवश्यक माहिती नमूद करा.
- त्यानंतर तुमच्या रजिस्टर फोन नंबर वर जो ओटीपी येईल तो टाका आणि कॅपचा कोड भरा.
- त्यानंतर फॉर्ममध्ये तुम्हाला ज्या सायबर क्राईम बद्दल तक्रार करायचे आहे त्याचे संपूर्ण तपशील भरा. हा फॉर्म चार भागांमध्ये विभागलेला असून यामध्ये सामान्य माहिती, सायबर गुन्हेगारीची माहिती आणि पूर्वावलोकन इत्यादी भागांचा समावेश होतो.
- त्यानंतर सर्व संबंधित तपशील आणि गुन्हा घडला आहे यासाठी पुरावे म्हणून स्क्रीनशॉट किंवा फाईल समाविष्ट केल्याचे सुनिश्चित करा.
- तुम्ही माहितीचे पुनरावलोकन आणि पुष्टी केल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.
- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फसवणूक झाल्यानंतरचा एक तास महत्त्वाचा असतो व फसवणूक झाली आहे असे लक्षात आल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. त्यामुळे पैसे ज्या खात्यामध्ये गेले असतील ते खाते गोठवणे शक्य होऊ शकते किंवा गेलेले पैसे परत मिळू शकता.
- याशिवाय तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देखील भेट देऊन तक्रार नोंदवू शकता
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680