सावधान ! तुमच्या व्हाट्सअप वर आंतरराष्ट्रीय कॉल येऊ शकतो !!

नवीन युग तंत्रज्ञानाचे आहे हे आपण सर्वजण जाणतो. तंत्रज्ञानाचा जसा वापर वाढला त्याबरोबर त्याचे तोटेही वाढत आहेत. आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेले व्हाट्सअप वर काही सायबर गुन्हेगारांची नजर पडलेली आहे. मागील काही दिवसापासून व्हाट्सअप वर आंतरराष्ट्रीय ऑडिओ,व्हिडिओ कॉल येण्याच्या प्रमाणात खूप मोठी वाढ झालेली आहे. त्याचबरोबर मेसेज सुद्धा येत आहे. आणि यामुळे आर्थिक गुन्हेगारी व पिळवणूक वाढलेली आहे. अनेक जण स्पॅम कॉल च्या तक्रारीही करत असल्याने सरकारनेही याकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे.व्हाट्सअप ही त्यांची यंत्रणा अधिक सक्षम बनवत असल्याचे समजते.Beware of international call of WhatsApp.

जर आपणास आंतरराष्ट्रीय कॉल आला तर….

जर आपणास आंतरराष्ट्रीय कॉल आला किंवा मेसेज आला तर अजिबात घाबरून जाऊ नका. त्याला अजिबात प्रतिसाद देऊ नका. अगदी मिस्ड कॉल ला सुद्धा प्रतिसाद देऊ नका. सायबर गुन्हेगार आपणास जाळ्यात अडकविण्यासाठी विविध युक्त्या वापरत असतात. अपरिचित क्रमांकावरून कॉल किंवा मिस्ड कॉल आला तर त्याला ब्लॉक करा,त्याचबरोबर तुम्ही रिपोर्टही करू शकता. व्हाट्सअप मध्ये याचा पर्याय उपलब्ध असतो.

स्टेटस, लास्ट सीन ,प्रोफाइल, इथे त्यांच्या सेटिंग मध्ये बदल करून तुमची काही माहिती संपर्कातील व्यक्तीलाच दिसतील अशा प्रकारच्या सेटिंग करा. तुमच्या व्हाट्सअप अकाउंट साठी टू स्टेप व्हेरिफिकेशन सेटअप करून घ्यावे. जर तुम्ही असे केले तर लॉगिन करताना व्हेरिफिकेशन कोड आवश्यक असतो. त्यामुळे बरीचशी सुरक्षितता वाढते.

अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कोणत्याही मेसेजच्या लिंक वर तुम्ही अजिबात क्लिक करू नका. त्या लिंक मध्ये एखादा मालवेअर सुद्धा असू शकतो. ज्या द्वारे तुमचे बँक अकाउंट ची माहिती सायबर गुन्हेगारापर्यंत पोहचू शकते किंवा लिक होऊ शकते.

घोटाळा कसा होऊ शकतो ?

तुम्हाला माहित असावे किंवा नसावे,आपल्या मोबाईलवर अनेकदा लॉटरी जिंकल्याचे मेसेज आपण पाहिलेले असतात. नोकरीच्या संधीचा एसएमएस सुद्धा येऊ शकतो. त्यातून हे लोक गंडा घालतात. अर्थात आपण त्यास कारणीभूत असतो आपले अज्ञान त्यासाठी कारणीभूत असते. त्याचबरोबर न्यूड फोटो मिळवून व्हिडिओ ब्लॅकमेलिंग ही करू शकतात.

या क्रमांकावरून कॉल येऊ शकतात..

केनिया (+254), मलेशिया (+60), इथिओपिया(+251), व्हिएतनाम (+84), आणि इंडोनेशिया (+62) वरील नंबर शिवाय इतरही नंबरवरून कॉल येऊ शकतात.

सर्वांनी सतर्क रहा, सज्ज रहा,काळजी घ्या.

Leave a Comment