आधुनिक काळ Digital काळ म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोरोना आला आणि माणसांच्या व्यवहार करण्याच्या पद्धती पूर्णपणे… नाही म्हटले तरी बऱ्याच अंशी व्यवहाराचे स्वरूप बदलून गेले आहे. आज मुंबईसारख्या मायानगरीमध्ये 90% च्या आसपास लोक डिजिटल व्यवहार करत असलेले दिसून येतात. छोट्या छोट्या व्यवहारापासून ते मोठ मोठ्या व्यवहारापर्यंत आज Phonepe,Pytm,Google pay सारख्या ॲप्स चा वापर केला जात आहे. Beware! This is happening to many women in Mumbai; Has this ever happened to you? Scam | fraud
हे ही वाचा
त्याचाच फायदा घेणारे cyber Criminals आज तयार तर होत आहेतच तरी समोरासमोर फसवणाऱ्यांचेही प्रमाणही वाढतच आहे. मुंबई सारख्या शहरात भाजी बाजार व इतर बाजारात लोकांची गर्दी भयंकर असते. या गर्दीचाच फायदा विक्रेते घेत असतात. या संदर्भात घडलेली घटना आज मी आपणासोबत शेअर करत आहे. ज्याच्याबरोबर घडली त्या महिलेने स्वतः सोशल मीडियावर फेसबुक व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती आपल्या सर्वांबरोबर शेअर केली आहे.Beware! This is happening to many women in Mumbai; Has this ever happened to you? Scam | fraud
हे ही वाचा
आता वीज मीटरला ही मोबाईल सारखे रिचार्ज करावे लागणार ?
ते आज आपण पाहूया.
एकदा एक महिला मुंबईमधील भाजी बाजारात केली, तिने भाजी बाजारात भाजी घेतली. भाजी घेऊन झाल्यावर त्या भाजी विक्रेत्याला तिने पैसे देण्यासाठी QR Code मागितला. त्याने QR Code नसल्याचे सांगितले.यावर पर्याय म्हणून त्याने शेजारी असलेल्या भाजी विक्रेत्याच्या QR Code वर पैसे पाठवायला सांगितले. तिने QR Code मागितला आणि त्याने तो दिला. तिच्या Google pay account वरून तिने पैसे त्या QR Code वर पाठवले. पण त्याच्या मोबाईलवर पैसे मिळाल्याचा Message येईना.
तिने याबाबत त्या भाजीविक्रेत्याला सांगितले की माझ्या अकाउंट मधून पैसे कपात झालेले आहेत आणि ते मिळतील. त्या भाजीविक्रेत्याने जोपर्यंत Message येत नाही तोपर्यंत तिथेच थांबायला सांगितले. ती महिला तिथे दहा मिनिटे थांबली पण पैसे मिळाल्याचा Message आला नाही. तिला वाटले या पहिल्या भाजीवाल्याचे नुकसान होण्यापेक्षा त्याचे पैसे देण्यासाठी तिने पाचशे रुपये ची नोट काढून पैसे दिले व उरलेले पैसे घेऊन ती घरी निघून गेली.
हे ही वाचा
घरी जाताना तिने तिच्या मुलाला झालेल्या घटनेबद्दल सांगितले. त्याने सांगितले की मी सध्या ऑफिसमध्ये किंवा बाहेर कुठेतरी आहे असे सांगितले’ मी घरी आल्यावर बघतो असे त्याने सांगितले.
मुलगा घरी आल्यावर ते दोघे त्या भाजीवाल्याकडे गेले. ते दोघे भाजीवाले तिथेच होते.जिथे पैसे QR Code द्वारे पाठवले होते, तिथे त्या महिलेच्या मुलाने विचारना केली. त्याने तो QR Code मागितला. पण त्या ठिकाणी दुसरा QR Code असल्याचे आढळले. तो मान्य करत नव्हता. महिला अगोदरचा क्यूआर कोड वेगळा होता असे सांगत होती.
बऱ्याच बाचाबाची नंतर महिलेचा मुलगा उद्धटपणे जेव्हा बोलायला लागला तेव्हा, त्याने काय केले ते सांगितले. तो प्रकार असा होता. त्या दोघा भाजी विक्रेत्यातच लागेबांधे असावेत असे लक्षात आले. भाजीवाल्याने Business Account QR Code न देता त्याच्या पर्सनल नंबर चा QR Code सुरुवातीला दिला होता. खूपच उद्धटपणा केल्यावर मग तो सरळ झाला होता. आत्ताचा Business Account QR Code होता. अशाप्रकारे या महिलेची फसवणूक त्या भाजीवाल्याने केली होती. भाजीवाला मराठी माणूस नसून उत्तर भारतीय होता.
हे ही वाचा
सनी देओलचा गदर-2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणणार ! चित्रपटाचा रिव्ह्यू वाचा.
मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी लोकांना वेळ तर नसतोच पण एक महिला एकाच ठिकाणी किती वेळ बसून राहू शकणार आहे याची जाणीव लबाड लोकांना असते. त्यामुळे त्यांचे असे फावते. जास्तीत जास्त महिला सोबतच हा प्रकार घडत असल्याचे कळते.
म्हणून QR Code बाबत प्रत्येकाने सावधान राहण्याची गरज आहे. QR Code Scan केल्यावर दुकानदाराचे नाव प्रथम विचारले गेले पाहिजे. अशा घोटाळ्यापासून सावध रहा, सतर्क रहा. दररोज या भामट्यांना एका व्यक्ती कडून पन्नास- शंभर असे जरी पैसे मिळाले ,गर्दीतील आठ दहा लोकांना जरी गंडा घातला, तरी त्यांची वर कमाई होऊन जाते अशा लबाड लोकांपासून सावधान !
Writer,Activenama