Dunki film “डंकी चित्रपट” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती.
Table of Contents
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या ‘जवान ‘या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याचे अनेक बिग बजेट सिनेमे सध्या लाईमलाईन मध्ये आहेत. त्याचा’ डंकी ‘हा सिनेमा लवकर प्रदर्शित होणार असून आता या सिनेमा संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. किंग खान आर्मी ऑफिसर च्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले असल्याने लोकांची उत्सुकता आणखीन वाढली आहे . Dunki film “Dunki” movie is coming soon.
हे ही वाचा
पुस्तक पेढी योजना : प्राथमिक शाळेतील व माध्यमिक शाळेतील !
डंकी कधी रिलीज होणार ?
जिओ स्टुडिओ ने नुकती १०० सिनेमांची घोषणा केली आहे .यात शाहरुखच्या’ डंकी’ सिनेमाचा सुद्धा समावेश आहे .या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार हिराणी यांनी सांभाळली आहे. हा सिनेमा डिसेंबर 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .या सिनेमात शाहरुख सोबत तापसी पन्नू देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेता शाहरुख खान जेव्हा एखाद्या सिनेमाची घोषणा करतो ,तेव्हा फॅन्स उत्सुक असतात. त्यांना वाटतं असतं की ,आता काहीतरी वेगळं बघायला मिळणार .’ जवान ‘ मुळे आधीच चर्चेत असलेला शाहरुख खान ने आता त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. पहिल्यांदाच हे दोन दिग्गज एकत्र काम करत आहेत . त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.
डंकी आहे तरी काय ?
हा सिनेमा ‘डंकी फ्लाईट ‘नावाने चर्चित विषयावर आधारित असू शकतो .यात होतं असं की, जेव्हा एखाद्या व्यक्ती कायदेशीर पद्धतीने दुसऱ्या देशात जाऊ शकत नाही तेव्हा ते बेकायदेशीर मार्गाचा वापर करतात .जेणेकरून ते त्यांच्या आवडत्या देशात जाऊ शकतील. हा प्रकार भारतात चांगलाच पॉप्युलर आहे . अनेक तरुण याद्वारे कॅनडा आणि युएस माय ग्रेट करतात. शाहरुख खान या सिनेमाच्या घोषणेनंतर फारच आनंदी आहे.
80% डिस्काउंट मिळवा ! अमेझॉन वर !!
आपल्या घरात दररोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंवर 80% डिस्काउंट ! आजच या लिंक वर क्लिक करा आणि मिळावा.
लिंक : https://amzn.to/3rwMc7b
हे ही वाचा
पाणीपुरी मशीन : मराठी उद्योजकाने बनवले, छोट्या उद्योगातून जास्त नफा !
या चित्रपटात कॉमेडी आणि ड्रामा.
शाहरुख खान ने हॉलीवुड वेबसाईट डेडलाईनशी या चित्रपटाच्या रिलीज बाबत चर्चा केली. तो म्हणाला होता की ,’डंकी’ हा एक मोठा प्रवास चित्रपट असेल .ज्यांना परदेशातून आपल्या मायदेशी आणि देशात परतायचे आहे.अशा लोकांच्या कथेतून हे प्रेरित असेल .या चित्रपटात तुम्हाला कॉमेडी आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे .या चित्रपटातून शाहरुख खान पहिल्यांदाच दिग्दर्शक राजकुमार हिराणी सोबत काम करणार आहे. संजू ,पि.के., थ्री इडीयट्स आणि मुन्नाभाई यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी हिराणी ओळखले जातात.
हा चित्रपट परदेशातून मायदेशी परतणार्या लोकांच्या कथेवर आधारित
चित्रपटाचे इंग्रजीत नाव डंकी आहे. आपल्या देशात विशेषता पंजाबी याला’ डंकी ‘ म्हणतात. आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक राजकुमार हिराणी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटाचे लेखक अभिजीत जोशी आहेत. ही एक अशी कथा आहे ज्यामध्ये खूप इमोशन असतील.
हे त्या लोकांवर आधारित आहे ज्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी साध्य केल्यावर आता घरी परतावे असे वाटते. या काळात त्यांच्या जीवनात कोणते बदल घडतील आणि त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल हे बघायला मिळेल.
हे ही वाचा
शाहरुख खानचा “जवान” चित्रपट दाखवतो आरसा आणि आसमान एकाच वेळी !
बॉलीवूडचा बादशाह दिसणार आर्मी ऑफिसर च्या भूमिकेत
रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शाहरुख खान स्वतः म्हणाला होता की, डंकी या सिनेमाचं कथानक अशा लोकांवर आधारित आहे ,ज्यांना घरी येण्याची इच्छा आहे. मीडिया रिपोर्टनुसार ,शाहरुख खान या सिनेमात आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे .या भूमिकेसाठी तो खूपच उत्सुक आहे. याआधी शाहरुख खान ‘फौजी’, ‘मै हु ना ‘ ‘ जब तक हे जान’ या सिनेमात आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसून आला होता.
वर्षभरात हा 3 रा चित्रपट प्रदर्शित होईल.
शाहरुख खान ने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले असून, त्यांच्यासाठी 2023 हे वर्ष खूपच खास आहे असे दिसते.या वर्षात त्याचे अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होत आहेत.’पठान ‘नंतर त्यांचा ‘जवान ‘हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे .दक्षिणात्य दिग्दर्शक एटलीकुमार ने या सिनेमाचा दिग्दर्शन केलं असून त्या सिनेमात शाहरुखसह दक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे . त्यांचा ‘डंकी’सिनेमा देखील लवकरच प्रदर्शित होऊन चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करेल असे वाटते.यात तापसी पन्नू आणि विकी कौशल्य यांच्या ही भूमिका आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा चित्रपट चित्रपटग्रहात प्रदर्शित होत आहे. 2004 नंतर शाहरुखने एका वर्षात तीन चित्रपट येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Writer,Activenama