अविनाश नारकर यांच्या चाहत्यांसाठी “ती” पोस्ट कशाबद्दल आहे जाणून घ्या.

 अविनाश नारकर Avinash Narakar हे चित्रपट film,मालिका Serial व नाटक Drama या क्षेत्रामध्ये खूप वर्षांपासून काम करत असताना दिसून येतात. ब्लॅक अँड व्हाईट च्या काळापासून ते आत्ताच्या रंगीत चित्राच्या काळापर्यंत त्यांचा अभिनय प्रवास सुरूच आहे. त्यांनी या काळामध्ये खूप चित्रपट केले. त्यातील नावे म्हणजे ‘राजा शिवछत्रपती’, घर होतं मेणाचं, स्पंदन, बस स्टॉप, मी पण सचिन, बालक पालक, सूर राहू दे इत्यादी चित्रपटात त्यांनी काम केले. अविनाश नारकर यांचा अभिनय कालावधी सुरवात 1994 पासूननचा आहे.

त्यांच्या अभिनयाचा प्रवास रंगभूमीपासून झाला होता . त्यांनी नंदी, हँड्स अप,ती फुलराणी, सोबत सोबत,आणि त्यांच्या अलीकडच्या काळातील सोयरी सकाळ ही नाटकं खूप गाजली व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते प्रसिद्ध वॉईसआर्टिस्ट ही आहेत. त्यांनी प्रभू शिवाजी राजा या कार्टून सिरीज ला आपला आवाज ही दिला आहे.

              ऐश्वर्या आणि अभिनेता अविनाश नारकर यांच्या फिटनेस विषयी सर्व त्यांचे चाहते चर्चा करत असतात. ऐश्वर्या आणि अभिनेता अविनाश नारकर यांनी लोकप्रिय सिनेमात काम केले आहे व त्यांनी अनेक नाटके ही केली आहेत. आता सध्या ते दोघे छोट्या पडद्याच्या माध्यमातून काम करत आहेत.

              अभिनेता अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर हे प्रेक्षकांचे आवडते कपल मानले जातात. अभिनेता अविनाश नारकर यांनी सध्या पन्नाशी पार केली असून त्यांची फिटनेस आजही तशीच आहे. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे दोघे सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असतात. त्या दोघांची खूप उत्साही वृत्ती आहे. अविनाश नारकर यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टची सध्या खूप चर्चा सुरू आहेत. ती पोस्ट आणि दुसरी चिंताजनक घटना चाहत्यांना काळजीत टाकणारी आहे. अविनाश नारकर यांची शस्त्रक्रिया करणारे डॉ.तात्याराव लहाने यांचा फोटो पोस्ट करत त्यांनी एक पोस्ट टाकली आहे.

पोस्ट टाकण्यामागचे कारण काय ?

 अविनाश नारकर यांच्या डोळ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याविषयी अविनाश नारकर यांनी पोस्ट शेअर केली आहे. ज्यांनीअविनाश नारकर यांची डोळ्यांची शस्त्रक्रिया केली ते म्हणजे जेष्ठ नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने हे आहेत .अविनाश नारकर यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया आषाढी एकादशी दिवशी करण्यात आली. अविनाश नारकर यांनी याविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. त्या फोटोमध्ये अविनाश नारकर यांच्यासोबत त्यांच्या पत्नी म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि नेत्रतज्ञ डॉ.तात्याराव लहाने देखील होते. या पोस्टच्या माध्यमातून अविनाश नारकर यांनी सांगितले की “आषाढी एकादशीच्या दिवशी या पांडुरंगाच्या हस्त स्पर्शाने माझ्या दृष्टीची स्पष्टता वाढली……!

“विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”अविनाश नारकर यांनी पोस्ट टाकल्यानंतर लगेचच त्यांच्या प्रेक्षकांनी व चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर रिप्लाय दिला आहे .चाहत्यांनी त्यांची विचारपूस केली आणि पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला देखील दिला.

त्यांचे लोकप्रिय रील्स

              अविनाश नारकर हे सध्या मालिकेत काम करत आहेत. त्या मालिकेचे नाव म्हणजे “कन्यादान”. ही मालिका सन मराठी वर चालू आहे .या मालिकेमध्ये चार मुलींच्या वडिलांची भूमिका ते साकारत आहेत. त्यांच्या सहकलाकारांसोबत ते नेहमी रील्स करत असताना दिसतात. या रिल्समधील डान्सचे स्टेप कितीही कठीण असली तरी त्यांची शिकण्याची तयारी कायम असते.

Leave a Comment