डोळ्यात अश्रू आणणारे Gaddar-2 चे गाणे khairiyat कालच रिलीज झाले. या गाण्यांमध्ये सनी देवल आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पाकिस्तानला जात असल्याचे दृश्य आहे.Gadar-2 song khairiyat released
बहुप्रतिक्षित Bollywood चित्रपट गदर-2 चे दुसरे गाणे कालच मंगळवारी रिलीज झाले. यापूर्वी गदर: एक प्रेम कथा हा चित्रपट सन 2001 साली रिलीज झालेला होता. या चित्रपटाने लोकांच्या मनावर राज्य गाजवले होते. तेच कलाकार घेऊन गदर-2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यातच चित्रपटाचे काही चित्रीकरण महाराष्ट्रातील अहमदनगर येथे झाल्याने लोकांची उत्सुकता या चित्रपटाबाबत कायम आहे. Gadar-2 song khairiyat released
गदर : एक प्रेम कथा चाच सिक्वल गदर 2 आहे असे बोलले जाते. गदर-2 चे गाणे khairiyat आताच रिलीज झाले असून तीन मिनिट दहा सेकंदाचे हे गाणे सनी देओल अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. हे गाणे प्रत्येकाला भावनिक बनवेल असे वाटते. या गाण्यांमध्ये ओसाड भागातून एक मिनी बस जात असलेली दिसते. बाजूला रूक्ष असा प्रदेश दिसतो. ड्रोन कॅमेरा तुन हे दृश्य चित्रित केले असल्याचे वाटते. मिनी बसवर टपावर भरपूर लोक बसलेले आहेत. यामध्ये सनी देवल दिसून येत आहे. स्क्रिप्टनुसार सनी देओल पाकिस्तानला आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जात आहे असे समजते.Gadar-2 song khairiyat released
हेल्थ इन्शुरन्स काढताय का ? काळजी घ्या.अन्यथा काय अडचण येऊ शकते …या बद्दल वाचा
सनी देवल च्या हातात पत्र आहे आणि तो पत्र तो वाचत आहे. पत्र वाचत असताना त्याला त्याच्या मुलाची आठवण येत असल्याचे दिसते. अमिषा पटेल देवाकडे मुलासाठी दुवा मागत असल्याचे दृश्य आहे. हे दृश्य आणि हे परमेश्वराकडे मागणे लोकांना भावनिक बनवेल यात शंका नाही. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 ला संपूर्ण भारतामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका सनी देओल अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या आहेत.
या चित्रपटाची लोक बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. काही काळापूर्वी “उड जा काले कौवा हे गाणे रिलीज झाले होते. या गाण्याला सुद्धा लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. काल जे गाणे रिलीज झाले khairiyat हे दुसरे गाणे आहे. या गाण्याचे गायक आहेत अरिजीत सिंह आणि कंपोस्ट मिथुन ने केलेले आहे. या गाण्याचे शब्द आहेत सईद कादरी यांचे.
यापूर्वीचा गदर: एक प्रेम कथा हा सिनेमा जवळजवळ एकोणवीस करोड मध्ये बांधला होता आणि या चित्रपटाने 78 करोड रुपये कमावले होते. याचा सिक्वल गदर 2 सुद्धा असाच यशस्वी होईल असे वाटते. सनी देवल अमिषा पटेल ची जोडी आहे ती लोकांनी खूप पसंत केलेली जोडी आहे. वाट पाहू चित्रपट प्रदर्शनाची. घोडे आणि मैदान जवळच आहे.
Writer,Activenama