आपणास माहीत असेल किंवा नसेल भाऊराव क-हाडे दिग्दर्शित TDM या त्यांच्या नव्या चित्रपटास महाराष्ट्रात थिएटर मिळत नसल्याच्या बातम्या आपण सोशल मीडियात ऐकले असेल. फेसबुक लाईव्ह करत त्यांनी स्वतः या विषयाला वाचा फोडली होती. त्यांनी असेही म्हटले होते की यापुढे माझी वैयक्तिक मराठी चित्रपट करण्याची इच्छा राहिली नाही.
आता तर त्यांनी असा निर्णय घेतला आहे की TDM चे प्रदर्शन थांबवण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. हे होण्याची काय कारणे आहेत आपण जाणून घेणार आहोत.
तर मित्रांनो मराठी चित्रपट चालत नाहीत असे अजिबात नाही. भाऊरावांच्या ग्रामीण शैलीतील चित्रपटाने आज पर्यंत महाराष्ट्राला भुरळ नक्कीच पाडलेली आहे.
भाऊराव क-हाडे सारख्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शकाचे चित्रपट चालतातच, पण मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाही हे वास्तव आहे. एक मे रोजी महाराष्ट्र दिनी भाऊराव क-हाडे यांनी एका थेटरला भेट दिली असता थिएटर 90% भरलेले होते.
तिथल्या प्रेक्षकांशी सुद्धा त्यांनी संवाद साधला असता चित्रपट उत्तम असल्याच्या प्रतिक्रिया त्यांना मिळाल्या. त्यांनी थिएटरच्या व्यवस्थापकाशी संवाद साधला असता त्यांना असे कळाले की, उद्या त्यांच्या चित्रपटांना शो नाही. याचे कारण त्यांनी विचारले असता त्यांना याबाबत वरून असे सांगण्यात आले आहे असे कळाले.
मग त्यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून त्याच ठिकाणाहून आपल्या भावना मांडल्या, त्यांनी आपल्या व्यथा, दुःख व्यक्त केले. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून सोशल मीडियातून यावर प्रचंड चर्चा सुरू झाली. त्यांचे म्हणणे हे आहे की आमचा सिनेमा थिएटर मध्ये चालत असेल तरच चालवा. उगाच थेटर मध्ये लावून ठेवू नका. चित्रपट चांगला चालत असताना चित्रपटांना थिएटर न मिळणे ही मराठीची गळचेपी आहे,असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की मी फेसबुक माध्यमातून मी माझ्या भावना व्यक्त केल्या मी कोणतीही स्टंटबाजी केलेली नाही. त्यांच्या फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून हे लक्षात येते की सिनेमा उद्योगातील गटबाजी,राजकारण याचा अंदाज येतो.
सिनेमा क्षेत्रात ही राजकारण असावे असे वाटते. काही राजकारणी दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांना पाठिंबा देत असल्याचे चित्र दिसते. त्यांच्या मते महाराष्ट्रात काही वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे,त्यामुळे ज्यावेळी योग्य परिस्थिती निर्माण होईल,थिएटर मिळतील त्यावेळी TDM पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे असे त्यांच्याकडून समजते.
यासाठी विविध संघटना,पक्ष यांचा सपोर्ट मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची त्यांची शक्यता आहे. असो पण टीडीएम प्रदर्शनाआधी लोकांमध्ये उत्सुकता आहे की तो कधी प्रदर्शित होतो याची.
सध्या तरी दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवुन ते योग्य वेळी आपल्या सर्वांसमोर चित्रपट आणणार आहेत याची त्यांनी घोषणा केलेली आहे.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680