अनेक पुरस्कार विजेता लघुपट “लेस” ची पटकथा नक्की वाचा.

लेस नावाचा “लघुपट” मी बनवलेल्या कलाकृतीतील एक चांगली कलाकृती मी स्वत: मानतो. त्यामुळे मला नेहमी वाटायचे कि, याची पटकथा लोकांना वाचायला मिळावी म्हणून मी या लघुपटाची पटकथा या ठिकाणी मांडत आहे. ही पटकथा आणि प्रत्यक्ष लघुपट यात काहीसा बदल केलेला आहे. ऐन वेळेला काही बदल सुचले ते करण्यात आले आहेत. सर्वांनी वाचन करावे आणि आनंद घ्यावा.

SCENE-1

सूर्य उगवत आहे. रो हाऊस दिसत आहेत. रो हाऊस समोर गेट आहे. गेटच्या समोर दोन रस्ते एकत्र मिळाले आहेत. रो हाऊस इंग्रजी अक्षर “T” च्या बरोबर टोकाला आहे.Be sure to read the screenplay for the multiple award winning short film “Lace”.

INT. Morning. 6. AM

SCENE-2

मोबाईल वाजतो. टेबलावर मोबाईल वर अलार्म स्क्रीन दिसत आहे . एक मुलगा घरात झोपलेला आहे. बेडवर मच्छरदानी बांधलेली आहे. तो त्या मच्छरदानीत झोपलेला आहे.Be sure to read the screenplay for the multiple award winning short film “Lace”.

साधारण १५ वर्षाचा मुलगा आहे. रंगाने गोरा उंच आहे, दिसायला अशक्त आहे, अचानक तो पायावर एक हाताचा फटका मारतो. त्याला एखादया डासाने चावलेले असावे कदाचित. वर मच्छरदाणी ही आहे तरीही मच्छर चावतो हे पाहून मच्छर ने आत प्रवेश अगोदरच केला असावा असे त्याला वाटते . त्याला एका जागेतून मच्छरदाणी खालून निसटलेली दिसते. मग तो मच्छर bat घेतो व फिरवू लागतो. चटचट असा आवाज येतो. तो उठतो आणि बाहेर जाण्यासाठी निघतो. जाताना hall मधील गुडनाईट ही बंद करतो.Be sure to read the screenplay for the multiple award winning short film “Lace”.

EXT, Morning

SCENE-3

तो दरवाजा उघडून बाहेर पायरीवर येतो. पायरीवर जांभळ्या देत बसतो. बाहेर चप्पल व बूट व्यवस्थित पडलेले असतात. तो बूट घेतो व पायात घालू लागतो. लेस बांधतो आणि गेटच्या बाहेर येतो. पाहतो तर शेजाऱ्यांनी गेटच्या बाहेर अंगण व रस्त्यावर पालापाचोळा,कचरा व थुंकलेले त्याच्या अंगणाच्या बाजूला सारून लावलेले तो पाहतो.आत अंगणात येऊन झाडू घेऊन बाहेर येतो आणि झाडू मारून ते गोळा करू लागतो व ते कचरा कुंडीत टाकून जाळू लागतो.Be sure to read the screenplay for the multiple award winning short film “Lace”.

EXT. Morning.

SCENE -4

तो रस्त्यावर चालू लागतो. रस्यावर लोकांची गर्दी आहे. आजूबाजूला कचरा ही पडलेला दिसत आहे. लोकांची पावले झपाझप पडत आहेत. हळू हळू त्या मुलाची बुटाची लेस सैल होत आहे, सध्या पक्का रोड आहे. त्याच्या सामोर एक व्यक्ती जात आहे. त्याच्या खिशात मोबाईल आहे आणि त्यावर प्रेरणागीत चालू आहे “हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब. त्याच्या तोंडावर मास्क आहे. तो खिशातून तंबाखूची पुडी काढतो. पुडीचे तोंड उघडून तळहातावर तंबाखू ओतू लागतो आणि चुना काढून त्यात तो मिक्स करून तंबाखू चोळू लागतो. थोड्या वेळाने तंबाखूची चिमट तोंडात ठेवतो . थोडा वेळ झाल्यावर तो वारंवार थुंकत आहे व चालत आहे. वारंवार मास्क काढून मनसोक्त तो थुंकत आहे. हे सर्व मागे  मुलगा पाहत आहे.चेहऱ्यावर किळसपण आणणारे भाव येत आहेत, तितक्यात एक छोटी मुलगी वय १२ वर्षे मागून धावत येते आणि मुलाला म्हणते.

“मुलगी”

तुझ्या बुटाची लेस सुटली बघ, दादा

“मुलगा”

मुलगा चमकून तिच्याकडे बघतो आणि खाली वाकतो पण त्या बुटाची लेस बांधायला गेलेले हात आपोआप थांबतात आणि तो उभा राहतो. परत चालू लागतो.

“मुलगी”

तुझ्या बुटाची लेस सुटली बघ, दादा

पुढे गेलेल्या मुलीकडे पाहून मुलगा म्हणतो.

“मुलगा”

तुला माझ्या बुटाची लेसच सुटलेली दिसते फक्त, जरा त्या पिचिक पिचिक पिचकाऱ्या मारणाऱ्या काकाकडे हि बघ.

“मुलगी”

(रागाने) (हम्म) मला काय गरज पडलीय जा तिकडे ?

असे म्हणून ती पळू लागली. त्या थुंकणाऱ्या काकाजवळ येते.

ती मुलगी त्या माणसाच्या समांतर चालू लागते. ती त्या माणसाच्या तोंडाकडे बघते तो त्याच्याच विचारात मग्न असतो. तो ज्यावेळी तिच्याकडे बघतो तेव्हा ती सरळ बघते. (थोडे घाबरत.अडखळत)

“मुलगी”

(त्या माणसाकडे पाहून ) काका.. तुमच्या मुलांना तुम्ही शाळेत घातलय का ? (गंभीर पणे)

“माणूस”

घातलंय ना.. म्हणजे ? (आश्चर्याने )

मुलगी

मग तुमची मुले तुम्हाला शिकवत असतील ना ?

“माणूस”

म्हणजे ?

मुलगी

म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, उंटाची मान, कुत्र्याचे कान,उदराची शेपुट !

“माणूस”

……. ये…..एवढी एवढी हायस बोलतेस काय ?

“मुलगी”

काय ? (मोठ्याने) हत्तीचे पाय

तुम्हाला कशाचे भानच न्हाय ॥

“माणूस”

(रागाने) ये पोरे थांब तिथेचं ! तुझं थोबाडच फोडतो आता बघ तू

(मुलगी जोरात पळतच जाते. थांबतच नाही दिसेनाशी होते.)

माणूस

( स्वतःशी पुटपुटतो) साली आत्ताची पोराना मोठ्या माणसांना काय बोलावे, कसे बोलावे याचे भानचं नाही. यांना शाळेत काय शिकवतात काय माहित ? शाळा बंद हायत म्हणून लोकांच्या छाताडावर लागली बसायला का ?

असे म्हणतो आणि थुंकतो.

EXT. Morning. Hill

Scene : 5

मुलगा टेकडी चढत आहे. विविध दृश्ये टेकडीवरील दिसत आहेत. तो माणूस टेकडी चढत आहे. मधुन मधून थुंकण्याचा कार्यक्रम चालू आहे.

EXT. Morning Hill

Scene 6

खूप उंच टेकडी आहे. टेकडीवरून शहराचे दर्शन दिसते. खाली जाणारा रस्ता व लोक दिसत आहेत, तो मुलगा वरून खाली जात आहे. तो सुरवातीला हळूहळू खाली टेकडी उतरत आहे. बुटाची लेस एका पायाची सुटलेलीच आहे. अचानक उतार लागल्यावर त्याचे नियंत्रण सुटते. तो पळू लागतो. पळताना त्याचा उजवा बूट डाव्या बुटाच्या सुटलेल्या लेसवर पडतो. आणि त्याचा तोल जातो व तो तिथेच खाली पालथा पडतो. आणि मागून ती मुलगी त्या माणसाला मागे टाकून पुढे येते. तो माणूस म्हणतो.

“माणूस”

scene 7

ए… ए… चिंगळे थांब तुला सगळ्याच प्रश्नांची उत्तरे देतो. ती न ऐकता तशीच खाली पळत येते व त्या पडलेल्या मुलाजवळ येऊन थांबते.

दमलेली असते. श्वास जोरात घेत असते

        “मुलगी” म्हणते : 

       सांगत होते मी लेस बांध,

(तो मुलगा अलगत उठण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या गुडघ्याला जखम झालेली असते, वेदना त्याचा चेहन्यावर दिसत असतात. लेसला हात न लावता तो उठण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात तो माणूस घाई घाईने तेथे येतो.)

    “माणूस”

ए चिंगळे लई माजतीस का ? कुठ येत तुझे आई वडील हा ? (असे म्हणून त्या मुलीच्या अंगावर तो धावून जातो) आणि बसलेला मुलगा त्या माणसाच्या आणि मुलीच्या पुढे येतो –

मुलगा

थांबा माझी बहिण आहे ती .

माणूस

अरे काहीतरी शिकव हिला. मला म्हणते भान नाही तुम्हाला

  “मुलगा”

(मुलगा खाली मान घालून पुटपुटतो)

मग आहे कुठे भान तुम्हाला .

आमचे आई वडील खाली येतील आता.

    रस्त्यावर सुटलेली बुटाची लेस सुद्धा बांधायला वाकायची घाण वाटते तुमच्यामुळे

बघा तुमच्या समोरच काय झाले बघा (असे म्हणून तो मुलगा झालेली जखम दाखवू लागतो तसा तो माणूस एकटक पाहू लागतो )

        “मुलगा”

 ये ये काय हाय ? हे काय माझ्यामुळे झालंय ?

            “मुलगा”

हो तुमच्यामुळेच आणि तुमच्यासारख्या इतर लोकामुळेच.

( थुंकलेला एक क्षण त्याला आठवतो )

“माणूस”

(आवंढा गिळत. नजर दुसरीकडे वळवत.) काय तमाशा हाय नुसता (आणि पुढे चालू लागतो )

“मुलगा”

तुम्हाला या मुलीच्या आई वडिलांना भेटायचं हाय ना. थांबा ना मग

“माणूस”

(मागे न पाहता पुढेच बघत त्याच्या शारीरिक भाषेवरून त्याची चूक त्याच्या लक्षात आली असावी असे दिसत आहे )

“माणूस”

काय गरज नाही

तो मुलगा आणि ती मुलगी त्याच्या पाठमोरया आकृतीकडे ते पाहत राहतात ( ब-याच वेळ ते दोघे बघतच राहतात.)

“मुलगा”

ये कोण तू ? आणि इकडे कशाला आली होतीस ?( मुलीकडे वळून )

वैदिका

    मुलगी:

मी वेदिका . काल संध्याकाळी मी आणि माझे बाबा टेकडीवर आली होती फिरायला, त्यावेळी त्यांच्या चष्म्याचा पाउच इथे विसरला होता,ते घ्यायाला आले होते.

मुलगा

वाचलीस तु आज माझ्यामुळे.

बाबाबरोबर आणि आई वडील कुठे असतात तुझे (आश्चर्याने )

मुलगी

वारले ते दोघे कोरोनात (खाली बघत गंभीर मुद्रेने ) मामा मामी ने आणली मलाइकडे.मामीला मी आवडत नाही. सारखा राग राग करती माझ्झा… (खाली बघत ) ( मुलगा तिच्याकडे एकटक बघता बघता नंतर खाली बाजूला बघू लागतो)

मुलगा

अशी एकटी येत जाऊ नको या डोंगरात मामी ने सांगितले तरी,

             माणूस

(त्या मुलाच्या डोळ्या समोर ती TV वरील बातमी दिसू लागते. जिल्हाधिकार्याचे जाहीर आवाहन… कोरोनात ज्या मुलां मुलींचे चे मातृपितृ छत्र हरवले आहे त्यांच्यासाठी Child helpline १०९८ ला फोन करा आणि माहिती दया किंवा जवळची शासकीय कार्यालय मध्ये माहिती दयावी अशी बातमी त्याच्या डोळ्यासमोर उभी राहते. (मुलगा भूतकाळाच्या तंद्रीतून बाहेर येतो.) समौर ती मुलगी शांतपणे चालत असते ती थोडी पुढे गेलेली असते आणि..

मुलगा

ये दीदी । ये..दीदी !( मोठ्या आवाजात हाक ) ( तशी ती मागे वळून पाहते )

तुझ्या मामाच नाव काय ? आणि पत्ता काय तुझा ?

मुलगी

(उंच आवाजात)

तू येऊ नको …माझी मामी मारील तुला

मुलगा

अग न्हाय बाई दुस-या कामासाठी पाहिजेय मला नाव आणि पता.

मुलगी

संतोष धुपारे, विठ्ठल मंदिरासमोर सरवटे चाळ, घर न.९ बळवत नगर

(असे म्हणून ती चालू लागली. वाट उतरणीची होती. ती धावतच खाली जात होती. मुलगा तिच्या पाठमोरया आकृतीकडे पाहत च उभा होता. त्याचे मनाला खूप दुख झाले होते या मुलीचे दुख ऐकून तो एका दगडावर खाली मान घालून बसून राहतो.

moming.Road.

scene 8

तो थुंकणारा माणूस रसत्याने परत आपल्या घरी जात आहे (मोबाईल च्या गाण्यावर ओठ हलवत आहे. )

माणुस

सालं लहान पोर ही माझी इज्जत काढायला लागली. (स्वत: शीच बोलत )

Scene.9

उताराला तो व्यक्ती खाली येत आहे. खिशात गाणे वाजत आहे (हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे) अचानक त्याचे डोळे स्थिर होतात. नजर सरल, स्थिर उभा राहतो आणि हात खिशाकडे जातो. मागे पहातो, उजवा हात डोक्यामागच्या बाजूला जातो.त्याला आठवत कि आपण तंबाखू खाऊन थुंकत होतो त्यामुळे ती मुलगी आपल्याला बोलत होती .त्याची चूक पूर्ण लक्षात त्याला आली होती. खजील होऊन तो डोंगर खाली उतरत होता .

आमच्या पूर्वीच्या पोस्ट देखील पहा.

Leave a Comment