असा रंगला सोहळा | (“डुब-या”) लघुपट ठरला सर्वोकृष्ट लघुपट

रिल्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल (RIFF) चा स्क्रीनिंग आणि पारितोषिक वितरण समारंभ काल रविवार दिनांक 26 मार्च 2023 रोजी मराठवाड्यातील संभाजीनगर येथे पार पडला
या रिल्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जगभरातून 1350 हून अधिक चित्रपट,लघुचित्रपट यांचे प्रवेश झालेले होते. त्यामधून निवडक अशा चित्रपट,लघुचित्रपटांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये नाशिक मधील मनपा शाळा क्रमांक 22 धृवनगर या शाळेचा उपक्रम असलेला “डुबऱ्या” या लघु चित्रपटाला “सर्वोत्कृष्ट लघुपट (BEST SHORT) चे नॉमिनेशन मिळाले. Reels internatinal film festival
त्याचबरोबर नाशिक मधील मनपा शाळेच्या या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये काही निवडक लघुपटा बरोबर स्क्रीनिंगची सुद्धा संधी मिळाली. देशभरातून आलेल्या दिग्दर्शकांच्या तसेच कलाकारांच्या समोर मिळालेली ही संधी म्हणजे नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागासाठी बहुमानाची गोष्ट आहे. 23 लघुपटांचे स्क्रीनिंग करण्यात आले. त्यामध्ये “डुबऱ्या” लघुपटाचाही समावेश होता. Reels internatinal film festival
आज पर्यंत डुबऱ्या या लघुपटास तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि हा चौथा पुरस्कार आहे.
या चित्रपट महोत्सवाला बॉलीवूड चित्रपट आणि मालिका कलाकार ही उपस्थित होते. Reels internatinal film festival
डुबऱ्या या लघुपटाची निर्मिती मनपा शाळा क्रमांक 22 धृव नगर नाशिक चे उपशिक्षक नामदेव जानकर यांनी केलेली असून लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा हे त्यांनीच सांभाळले आहे. त्याचबरोबर लघुपटामध्ये इयत्ता पाचवीचा विद्यार्थी दया कांबळे यांने भूमिका साकारलेली आहे. त्याचबरोबर ज्योती अंभोरे व दीपक अंभोरे या पालकांनी भूमिका साकारलेल्या आहेत.

रिल्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल च्या चित्रपटांचे परीक्षण जगभरातील विविध जुरीज कडून करण्यात येत असते. या फेस्टिवलच्या आयोजनात संभाजीनगर मधील मा.तुषार थोरात व मा. सौ लक्ष्मी थोरात या विशेष परिश्रम घेत असतात.
डुबऱ्या लघुपट उपक्रमास शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य व मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक मा.श्री रंगनाथ चव्हाण व आजचे मुख्याध्यापक मा. सोनजी गवळी यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका लता सोनवणे, कल्पना पवार, दिपाली काळे, संतोष महाले, ईश्वर चौरे आणि सुरक्षारक्षक उमेश कांत निकम यांचे सहकार्य लाभले.

Leave a Comment