घरबसल्या मिळवा आरटीओ च्या सेवा.. कार्यालयात जाण्याची गरज नाही..

            

 

कार्यालयात न जाता परिवहन विभागाच्या फेसलेस सुविधेचा faceless facility लाभ आता घेता येणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कोणत्याही RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. कोणत्याही RTO कार्यालयात अर्ज पाठवून या सेवांचा लाभ घेता येऊ शकत होता . तो अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवून देऊन घरबसल्या सेवेचा लाभ घेता येऊ शकेल.

फेसलेस सेवा faceless facility

            ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांका ची माहिती मिळवण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागत होते. कार्यालयात मन्युअल पद्धतीने काम चालू असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असते. नागरिकांचा उभे राहून वेळ वाया जाऊ नये म्हणून आरटीओने फेसलेस सुविधा सुरू केली आहे. या आधी नागरिकांना नोंदणीकरण,लायसन्स काढण्यापासून ते अधिकाऱ्यांच्या परवानगीची दुय्यम नक्कल मिळवणे, नावात बदल करणे, पत्ता बदल करणे ही माहिती प्राप्त करावी लागत होती.परंतु आता फेसलेस सुविधेमुळे सर्व काही सोपे झाले आहे.

 संपूर्ण फेसलेस faceless facility सुविधा अंतर्गत

  1. दुचाकी,चार चाकी वाहन संदर्भातील दुय्यम प्रमाणपत्र काढणे.
  1. वाहन हस्तांतरण.
  1. वाहनावरील कर्ज बोजा चढवणे किंवा उतरवणे.
  1. पत्त्यात बदल करणे.
  1. नावात बदल करणे.
  1. ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे.

    आता faceless service in Marathi मुळे नागरिकांना कोणत्याच RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. वाहनांच्या कामकाजाबाबत वाहनाची संपूर्ण माहिती आपल्याला ऑनलाईन मिळत आहे. त्यामुळे आपल्याला आरटीओ कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही.

             सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे आता परिवहन विभागात फेसलेस सेवा या आधार कार्ड क्रमांकाशी जोडण्यात आलेल्या आहेत. या फेसलेस सेवेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आधार कार्ड क्रमांक मोबाइल क्रमांका शी जोडलेले म्हणजेच तुमचा आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर ला लिंक करणे आवश्यक आहे.

           नमूद असलेल्या सेवांचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात माहिती transport.Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मिळेल. सर्व लायसन्स, दुचाकी व चार चाकी वाहनांसंबंधी सर्व सेवा आधार कार्ड क्रमांकावर आधारित पद्धतीने फेसलेस यंत्रणेद्वारे सुरू करण्यात आलेली आहे.

          फेसलेस सेवासाठी परिवहन विभागाचे संकेतस्थळ https://parivahan.gov.in वर संपर्क करावा. जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा. अधिक माहिती मिळवण्यासाठी या नंबर वर संपर्क करावा 022-24036221 व ई-मेल आयडी rto.03-mh@gov.in यावर संपर्क साधून अधिक माहिती मिळवा व या सेवेचा लाभ घ्यावा.

           परिवहन विभाग नागरिकांसाठी कायम मदतीसाठी तत्पर असते. आता परिवहन विभागात नागरिकांसाठी online सुविधा असल्याने नागरिकांचा वेळ वाचत आहे . RTO विभाग दिवसें दिवस प्रगती करत असताना दिसून येत आहे. परिवहन विभागाचे ड्रायव्हिंग लायसन्स व इतर 8 कामे घरबसल्या होणार आहेत.

Leave a Comment