मेडिक्लेमध्ये बदल झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.आता या नियमात बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.या विषयी सविस्तर माहिती.
Mediclaim चा खूप फायदा होत असतो. एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला असेल व त्याच्याकडे दवाखान्यातील खर्च झेपणारा नसेल यावेळी Mediclaim insurance दवाखान्याचा संपूर्ण खर्च ही विमा कंपनी करत असते.
विमा कंपन्यांकडून आपण मेडिक्लेम खरेदी करतो त्यानंतर माणूस हा हॉस्पिटलच्या खर्चापासून निश्चित असतो. अनेकदा असे होती की आपण मेडिक्लेम काढून घेतो परंतु विमा कंपन्यांच्या नियमामुळे तो खर्च मिळत नाही. या सर्व कारणांमुळे ग्राहकांकडून नियमात बदल करण्याची मागणी केली जात आहे.
हे हि वाचा : नवीन SBI Debit card Activate या प्रकारे करता येऊ शकते.
Mediclaim मध्ये बदल झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. Mediclaim साठी विमाधारक रुग्णांना कमीत कमी 24 तास रुग्णालयात दाखल असणे आवश्यक आहे. असा नियम होता परंतु आता या नियमात बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
आता विमाधारक रुग्णालयामध्ये 24 तासांपेक्षा जास्त वेळ शस्त्रक्रियेसाठी किंवा उपचारासाठी दाखल केल्यावर विमा कंपनी या मेडिक्लेम देतात. परंतु हा सध्या असलेला नियम बदलण्याची शक्यता आहे. सरकारने या विषयी विमा क्षेत्र नियामक IRDAI ( insurance regulatory and development authority of India ) यांच्याशी चर्चा सुरू केली आहे.
अलीकडेच मेडिक्लेमचा लाभ घेण्यासाठी 24 तास हॉस्पिटललायझेशनच्या नियमाचा पुनर्विचार करण्यास राष्ट्रीय ग्राहक विवाद आयोगाचे NCDRC ( National consumer disputes Redressal commission ) अध्यक्ष अमरेश्वर प्रसाप शाही यांनी भर दिला आहे.
आजच्या बदलत्या काळात वैद्यकीय उपचार इतके जास्त प्रगत झाले आहे की एखादी शस्त्रक्रिया करण्यासाठी काहीसा वेळ लागतो. रुग्णालयात विमाधारक रुग्ण हा 24 तासांपेक्षा कमी काळ हॉस्पिटलायझेशन असल्यास दावे स्वीकारले जात नाहीत. आजच्या बदलत्या काळामध्ये असेही काही उपचार आहेत की ते 24 तासांच्या आधीच पूर्ण केले जाऊ शकतात. या सर्व बाबी लक्षात घेता आरोग्य विमा कंपन्यांना या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील असेही त्यांनी नमूद केलेले आहे.
ग्राहक संरक्षण खात्याचे सचिव रोहित कुमार सिंग यांनीही म्हटले आहे की, ग्राहकांचे हित लक्षात घेऊन IRDAI आणि वित्तीय सेवा विभागाला यावर तोडगा काढण्यास सांगितले जाईल. अलीकडेच, पंजाब आणि केरळच्या जिल्हा ग्राहक समित्यांनी वैद्यकीय विमा दाव्यांबाबत ऐतिहासिक आदेश पारित केला आहे. पंजाबमधील फिरोजपूरच्या जिल्हा ग्राहक आयोगाने हेल्थ इन्शुरन्स कंपनीला चुकीच्या पद्धतीने प्रवेश 24 तासांसाठी असल्याचे सांगून वैद्यकीय दावे नाकारल्याबद्दल जबाबदार धरले आहे.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680