Grass Cutter शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार ! किंमत किती जाणून घ्या.

Grass Cutter शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार या विषयी संपुर्ण माहिती आपण आता पाहणार आहोत.

विज्ञानाच्या या विश्वामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने खूप मोठी प्रगती केली आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूबरोबरच आता शेतीच्या कामासाठी लागणारी अवजारे यांची निर्मिती विज्ञान करू लागले आहे. त्यामुळे आज कालच्या सर्वच शेतकऱ्यांचा कल हा आधुनिक शेतीकडे वाढला आहे. पारंपारिक शेती नाहीशी होत चालली आहे.

जास्तीत जास्त शेतामध्ये तंत्रांचा आणि यंत्रांचा वापर केला जाऊ लागला आहे. मनुष्याला शेतामध्ये जास्त कष्ट करण्याची गरज राहिली नाही,कारण शेतातील सर्वच कामांसाठी यंत्र-तंत्र निर्माण करण्यात आलेआहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप दिलासा मिळाला आहे. कोणत्याही पिकाचे उत्पन्न चांगल्या प्रकारे यावे यासाठी प्रथम शेत स्वच्छ व तणमुक्त असणे गरजेचे आहे तरच त्यामध्ये चांगले पीक घेता येते. शेतामध्ये जास्त गवत असल्यास त्या पिकाची वाढ ही जास्त होत नाही.

हेही वाचा : वाचन प्रेरणा दिन धृवनगर च्या मनपा शाळा क्र. 22 मध्ये मोठ्या उत्साहात साजरा.

त्या पिकाचे पूर्णपणे नुकसानच होते.त्यामुळे गवत वेळोवेळी काढणे गरजेचे आहे. तरच त्या शेतामध्ये चांगले पीक घेतले जाऊ शकते .पिकांमधील गवत काढण्यासाठी जास्त मनुष्यबळ लागते त्यासाठी जास्त खर्चही होतो म्हणूनच पिकांमधील गवत काढण्यासाठी ग्रास कटर हे यंत्र बनवण्यात आले आहे. ग्रास कटर हे यंत्र वापरण्यायोग्य आणि परवडणारे आहे .अगदी सामान्य शेतकऱ्याला सुद्धा.

वैशिष्ट्ये

त्या मशीन चा वेग 14000RMP आहे ही मशीन चालवणे ही खूप सोपे आहे. यामध्ये आपल्या शेतातील परिसर ,शाळेच्या बाजूचा परिसर, कॉलनी भोवतालचा परिसर ,त्यामधील गवत ह्या मशीन ने कापू शकतो. ही मशीन 12amp किंवा 16amp ने चालते. ग्रास कटरने गवत खूप वेगळ्या मार्गाने कापले जाते.ही मशीन ऑनलाईन ही खरेदी करू शकतो आणि ही खूप मजबूत देखील आहे.

हेही वाचा : Light Bill चिंता मिटणार ! छोटी पवनचक्की ठरणार सामान्य माणसासाठी पर्याय

ग्रास कटर ची किंमत सामान्य माणसाला परवडणारी आहे याची किंमत 1750 रुपये इतकी आहे. तसेच 1750 मध्ये घरापर्यंत डिलिव्हरी केली जाते. हे यंत्र आकाराने लहान असून परवडण्यायोग्य आहे. यामध्ये सुरक्षिततेसाठी एक गार्ड दिला आहे. तो इतका मजबूत आहे की चुकून त्याचे ब्लेड निघाले तर ते पायावर येणार नाही तर तो त्या गार्ड वर पडेल याची काळजी घेतली आहे. असे हे ग्रास कटर वेगळ्या पद्धतीने बनवले आहे.

हेही वाचा : Smart School प्रकल्पांतर्गत नाशिक महानगरपालिका शिक्षकांना अत्याधुनिक अध्यापन साधने,तंत्रज्ञान वापराचे धडे.

सध्याचे शेतकरी पिकावर औषध फवारणी करतात. त्यामुळे मनुष्याचे आजार हे दिवसेंदिवस वाढतच आहेत. औषध फवारणीचा परिणाम हा जमिनीच्या सुपीकतेवर होऊ शकतो. शेतकरी पशुपालन करतात त्यामुळे त्या पशूंना चारा घालण्यासाठी ग्रास कटर चा उपयोग केला जाऊ शकतो.तसेच ह्या मशीनमुळे पैशाची आणि वेळेचीही बचत होते. ग्रास कटर अशा यंत्राचा वापर करणे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ग्रास कटर हे यंत्र बहुउपयोगी यंत्र आहे. हे यंत्र शेतकऱ्याला शेतीच्या कामासाठी खूप मोठा हातभार लावू शकते.

Leave a Comment