मित्रांनो आपण आपल्या कुटुंबाचा नेहमी विचार करतो. आपल्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये असे आपल्या प्रत्येकाला वाटते. त्या दृष्टीने आपण नियोजन करत असतो. आपल्या कुटुंबातील सदस्य आजारी पडतील आणि त्यांच्या दवाखान्यासाठी आपल्याकडे पैसे असू शकतील किंवा नसू शकतील याचा विचार करून आपण हेल्थ इन्शुरन्स health insurance काढत असतो. त्याचबरोबर अलीकडच्या काळात महागाईचा उच्चांक झाला आहे. त्यामुळे कुटुंबातील आरोग्याची काळजी घेत असताना अधिक खर्च येऊ नये म्हणून आपण हेल्थ इन्शुरन्स काढत असतो.Do you take health insurance? Be careful, otherwise there may be trouble

अलीकडचे दैनंदिन जीवन खूपच धकाधकीचे झाले आहे. कधी कोणाला काय होईल याचा पत्ता नसतो. अनेकदा अपघात घडत असतो. त्यावेळी पैसे नसतात. जर आपला हेल्थ इन्शुरन्स असेल तर मात्र आर्थिक त्रास आपल्याला होत नाही. त्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत नाही.Do you take health insurance? Be careful, otherwise there may be trouble
काही लोकांचे अज्ञान म्हणा किंवा माहिती नसणे म्हणा त्यांना वाटते की,आरोग्य विमा असून सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होणार नाही असे नेहमी वाटत राहते. काही वेळा आरोग्य विम्याचा फायदा घेताही येत नाही. आरोग्य विम्याची कव्हरेज हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. त्यामुळे विमा घेताना खूप काळजी घेणे महत्त्वाचे असते.Do you take health insurance? Be careful, otherwise there may be trouble
- आपण आरोग्य विमा का घेतो ?
भारतामध्ये आरोग्य विभाग नेहमी सर्व्हे करत असतो.त्यावेळी सर्व्हे मध्ये एक गोष्ट लक्षात आली आहे की, जवळजवळ 80 टक्के वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पैशाच्या अडचणीमुळे परिस्थिती बिघडते. कोणतेही अपघाताच्या परिस्थितीत उपचारावर अधिक खर्च होतो. अशावेळी एक मानसिक आर्थिक पाठिंबा मिळतो तो हेल्थ इन्शुरन्स चा.म्हणून हेल्थ इन्शुरन्स काढणे महत्वाचे आहे.
2. आपणास आरोग्य विमा घ्यायचा असेल तर काय काळजी घ्याल ?
विविध कंपन्यांचे आरोग्य विमा आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील सर्वात चांगला कोणता याची निवड आपल्याला करावी लागते. सर्वात प्रथम आपणास कंपनी निवडी बरोबर आरोग्य विम्याच्या कव्हरेजची काळजी घेतली पाहिजे. वर्षाला ठराविक प्रीमियम भरल्यानंतर आपणास पाच ते दहा लाख रुपयांचे आरोग्य कवच सर्वसाधारणपणे मिळते का ? याकडे लक्ष दिले पाहिजे. आपला प्रीमियम आणि आपणास आरोग्य विम्याचा मिळणारा नफा याचा ताळमेळ लावता आला पाहिजे.

आरोग्य विमा घेण्या अगोदर आपण विविध कंपन्यांचा अभ्यास करायला हवा. ज्या कंपनीचा विमा घेणार आहोत त्या कंपनीच्या अटी समजून घेऊनच पुढे विचार करा.
आरोग्य विमा जितक्या लवकर म्हणजे कमी वयाचे असताना घ्याल तेवढी जास्त मदत आपणास मिळते. आरोग्य विम्याबाबत असेही बोलले जाते की,आपण जेवढा अगोदर कव्हर घेऊ तेवढा कमी प्रीमियम लागेल. आपण जर 40 वर्षाच्या अगोदर प्रीमियम घेतला तर अधिक फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर ते दरवर्षी रिन्यू केल्यावर नो क्लेम बोनस चा लाभ ही मिळत असतो. चाळीस वर्षाच्या अगोदर आपली तब्येत जास्तीत जास्त बिघडत नसते . त्यामुळे रिन्यू केल्यानंतर नो क्लेम बोनस चा लाभ हा मिळतच असतो.
आरोग्य विमा घेत असताना प्रत्येक व्यक्तीने वैद्यकीय नोंदीची योग्य माहिती कंपनीला दिली पाहिजे. जर आरोग्य विमाधारकाने चुकीची माहिती दिली तर विमा कंपनी विमाधारकास विम्याचा लाभ देणार नाही त्याचबरोबर असे झाले तर मात्र नेमके उपचारा दरम्यानच मोठा गोंधळ होऊ शकतो. याची जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.
काही योजनांमध्ये काही गोष्टींचा समावेश होत नाही. प्रत्येक कंपनी ही स्वतःचे वेगवेगळे नियम तयार करत असते. त्या नियमानुसार ते धोरण तयार करत असतात, त्यानुसार प्रत्येकाने विचार करणे आवश्यक असते.

3. अगोदरच आरोग्य विमा घेतला आहे तर काय काळजी घ्याल ?
ज्यावेळी आपण आरोग्य विमा घेतो त्यावेळी आरोग्याच्या विविध सेवा आपल्याला मिळतात. त्यामध्ये हॉस्पिटललायझेशन, औषधे, विविध ऑपरेशन्स, इत्यादींचा समावेश होत असतो.काही हेल्थ इन्शुरन्स तर प्रति वर्ष फ्री हेल्थ चेकअप सुविधा उपलब्ध करून देत असते. या फ्री हेल्थ चेकअपचा आपण फायदा घेतला पाहिजे,हे सांगण्याचे कारण म्हणजे,लोक फ्री हेल्थ चेकअप चा फायदा घेण्याचे नकळत टाळत असतात. विविध कंपन्यांचे विविध आरोग्य विमे बाजारात उपलब्ध असतात. त्यांचा तुलनात्मक अभ्यास करूनच विमा घ्या. आरोग्य विमा घेताना नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे.तर मित्रांनो इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपण आरोग्य विमा घेताना आपली फसगत होणार नाही. आणि आपण योग्य तो विमा कंपनीचा आरोग्य विमा घेऊ शकाल हे आम्ही तुम्हास खात्रीशीर सांगू शकतो.

Writer,Activenama