तुळस ह्या वनस्पतीचा सर्वप्रथम परिचय होतो तो तिच्या धार्मिक वापरामुळेच.जन्मघराच्या समोर तुळशीवृंदावन प्रथम दिसते.तेव्हा पासून मानवाचा तुळस या वनस्पतीशी परिचय असल्यासारखा असतो.
लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत तुळशी चा पहिला परिचय असतो तो एक पवित्र वनस्पती म्हणुनच, जी तुळसवृंदावन या शब्दांमध्ये बांधलेली असते. जिच्याकडे सर्वजण पवित्र नजरेतून पाहतात. ही एक बाजू असली तरी दुसरी बाजू तुळस ही वनस्पती मानवी आरोग्यासाठी एक वरदान आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तुळशीवृंदावनकडे पाहिले की मन प्रसन्न होतेच पण सकारात्मक ऊर्जा मनामध्ये निर्माण होते. तुळस या वनस्पतीविषयी आपण आज अधिक माहिती जाणून घेऊया.
हे ही वाचा
आता वीज मीटरला ही मोबाईल सारखे रिचार्ज करावे लागणार ?
सर्वसाधारणपणे तुळस प्रत्येकाच्या घरासमोर लावलेली असते. जर एखाद्याच्या घरासमोर तुळशीचे रोप लावलेले नसेल तर लोकांचे म्हणणे असे असते की, घरात आनंद,सुख,समाधान,सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी तुळस ही दारात पाहिजेच,त्या घरी सल्ले देण्यात येतात की, घरासमोर तुळस लावावी. त्यामुळे का होईना तुळस लावली जातेच.
तुळस या वनस्पतीचा आपल्या दैनंदिन जीवनात काय महत्त्व आहे हे पाहूया.
तुळस या वनस्पतीचे वारकरी संप्रदायात खूपच महत्वाचे स्थान आहे. तुळशीचे लग्न यासारख्या समारंभावरून आपल्याला वारकरी संप्रदाय आणि तुळस यांचे नाते किती दृढ आहे ते समजते. जर दारात तुळस असेल तर, त्या घरावर कमी संकटे येतात किंवा घराच्या उंबरठ्यातून संकट आत प्रवेश करत नाही असे म्हटले जाते.अनेक आयुर्वेद तज्ञांनी तुळशीचे शरीराला व आरोग्याला काय फायदे होतात हे सांगितले आहे.
हे ही वाचा
तुळशीच्या पानांचा सुगंध तीव्र असल्याने तुळशीची पाने खाल्ल्याने, एखाद्याच्या तोंडाचा वास कमी होऊ शकतो. उग्र वासामुळे तो दुर्गंध दाबला जातो, म्हणून प्रत्येकाने किंवा ज्यांना तोंडाचा दुर्गंध आहे. त्यांनी सकाळी एक व संध्याकाळी एक अशी पाने खाल्ली पाहिजेत किंवा चघळली पाहिजेत. तुळस या वनस्पतीचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
काही लोकांना खूप भूक लागते आणि जर, त्यांनी जास्त खाल्ले तर वजन वाढत असते. अशावेळी तुळशी चे पाने खाल्ल्यास वजन कमी होते.
आपण जर घरासमोरील ताजेतवाने तुळशीची पाने नित्यनियमाने खाल्ली तर रोगप्रतिबंधक शक्ती वाढण्यास मदत होते. तुळशीचे पाने फुफ्फुसांचा संसर्ग आणि बोक्रोयटीस सारख्या आजारांपासून व्यक्तीला दूर ठेवण्यास मदत करतात. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीस खोकला,सर्दी,ताप किंवा कफ झाला असेल तर,तुळस ही अत्यंत गुणकारी औषधी वनस्पती ठरते.
हे ही वाचा
आता आपली आवडती स्प्लेंडर इलेक्ट्रिक अवतारात ; इतकी असणार किंमत.
महिलांच्या आरोग्याच्या समस्यांवर ही तुळस गुणकारी आहे. आजचे जीवन हे धावपळीचे असल्याने नैराश्याचा त्रास बहुतेकांना आहे. शांत राहण्यासाठी तुळशीची पाने खूप महत्त्वाचे काम करतात. लहानपणापासून दररोज दोन ते चार पाने खायची सवय लावली तर स्मरणशक्ती सुधारण्यास ही मदत होते.
एखाद्याला जखम झाली असेल तर,तुळशीची पाने तुरटी मध्ये घालून जखमेवर लावली तर जखम बरी होते.
जिरे आणि तुळशीची पाने एकत्र वाटून घेऊन ती जर चाटली आणि वरून पाणी पिले तर पोटाचा त्रास कमी होतो. तुळशीच्या पाण्यामुळे शरीरात ऊर्जा व्यवस्थित ठेवण्यास मदत होते.
हे ही वाचा
बहुसंख्य लोकांना डोकेदुखीचा त्रास असतो.यावर उपाय म्हणजे तुळशीचे पाने चहात टाकून चहा पिल्याने डोकेदुखी नाहीशी होते.आयुर्वेदामध्ये तुळशीच्या चहाला खूप महत्त्व आहे. यावरून एक गोष्ट आपणास स्पष्ट जाणवते की, तुळशी या वनस्पतीचे धार्मिक दृष्टिकोनापेक्षा आरोग्याच्या दृष्टीने खूप मोठे महत्त्व आहे. तुळस या वनस्पतीचा आरोग्यासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे.
Writer,Activenama