महाराष्ट्रातील अतिवृष्टी होत असलेल्या विभागातील शाळांना सुट्टी जाहीर.

महाराष्ट्रातील अतिवृष्टी होत असलेल्या विभागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे,यामध्ये कोणकोणते विभाग आहेत त्यांची नावे खाली देण्यात आली आहेत. Holidays announced for schools in Maharashtra’s heavy rains.

महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टी होत असून त्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून आणखी आपत्तीत भर पडू नये म्हणून शासन स्तरावरून अतिवृष्टी भागातील शाळांना सुट्ट्या देण्याचे आदेश शासकीय पातळीवरून देण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की,Holidays announced for schools in Maharashtra’s heavy rains.

कोकण विभागात मागील दोन दिवसांपासुन सतत पाऊस पडुन पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच येणा-या तीन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.Holidays announced for schools in Maharashtra’s heavy rains.

हे ही वाचा

महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ मंदिर हे आहे याठिकाणी सहली काढा

त्याअर्थी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कोकणातील दि. २० जुलै, २०२३ रोजी अनुक्रमे ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. संबंधित जिल्हाधिकारी यांनी यास अनुसरून त्यांच्या स्तरावर काल रात्री दहाच्या आत आदेश काढून सर्व संबंधित शालेय आस्थापनेस कळवावे असे नमूद असून जेणेकरून शाळा,मुलांना व पालकांना वेळेमध्ये याची कल्पना होईल व त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा. उपरोक्त बाबीशी संबंधित सर्व सुचना सर्व प्रसारमाध्यमांवर प्रसारीत करण्यात याव्यात असा शासनाचा आदेश आहे. वरील सूचना महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन यांच्या परिपत्रकात देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर शिक्षण आयुक्तालय यांच्यामार्फत सुद्धा परिपत्रक काढण्यात आलेले आहे. पत्राचा विषय खालील आहे. Holidays announced for schools in Maharashtra’s heavy rains.

हवामान विभागाच्या राज्यात अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने शाळांना सुट्टी जाहीर करणेबाबत

हे ही वाचा

रिलीज झाले gadar-2 चे गाणे Khairiyat !

 राज्यामधील काही जिल्हयामध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रातील इ. १ ली ते १२ वी च्या सर्व माध्यमाच्या / मंडळाच्या शाळांतील शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाळांना आवश्यकतेप्रमाणे सुट्टी घोषित करण्याबाबत यथोचित निर्णय घेण्यात यावा.Holidays announced for schools in Maharashtra’s heavy rains.

अतिवृष्टी विभागातील आपत्तीत आणखी भर पडू नये, शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्याची गैरसोय होऊ नये म्हणून शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शासनाचा हा निर्णय असल्याचे समजते.

Leave a Comment