Table of Contents
Home Loan वर मिळणार सबसिडी : याचा फायदा मिळणार 25 लाख लोकांना.
देशाच्या शहरी भागातील नागरिकांसाठी खास योजना आली आहे.आपले स्वतःचे एक छान छानसे घर असावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र, शहरी भागातील घरांच्या किमती जस-जशा वाढत आहेत. तस -तसे सर्वसामान्यांचे घर खरेदी स्वप्न ही स्वप्नच राहत आहे.
येणाऱ्या या योजनेत जवळपास 25 लाख लोकांना हक्काचा निवारा मिळणार आहे असे मिडिया रिपोर्ट नुसार कळते.गृह कर्ज तर मिळेलच, पण त्यावर सबसिडी पण मिळेल अशी ही योजना आहे. या योजनेमुळे देशातील नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होईल.
गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. 77 व्या स्वातंत्र दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ते म्हणाले होते की, सरकार ग्रह कर्जावरील व्याजात सवलत देण्यासाठी एक योजना आणत आहे .व्याज अनुदान योजना लवकरच जाहीर होऊ शकते. त्यामुळे झोपडपट्टी वासियांचे आणि शहरांमध्ये भाड्याने राहणाऱ्या नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याचा फायदा आता या लोकांना होईल जे पीएम आवास योजनेच्या लाभ घेऊ शकले नाहीत.
25 लाख लोकांना फायदा
आता छोट्या शहरात असो,की मुंबईसारख्या मोठ्या शहरात असो घर घेणे स्वप्न पूर्ण होणार आहे.आता केंद्र सरकार छोट्या कुटुंबासाठी होम लोन सबसिडी योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे .त्यामुळे आता सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 25 लाख लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे .ही योजना पूर्णपणे घरांच्या मागणीवर अवलंबून असेल.
हेही वाचा : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS EXAM) : संपुर्ण माहिती आणि मार्गदर्शन.
सर्वांसाठी घरे 2024
हे शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तवास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन 2024 पर्यंत स्वतःच्या हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे .त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघर यांना घरकुल करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत.
पंतप्रधान आवास योजना
1 जून 2015 रोजी सुरू करण्यात आलेले ‘पंतप्रधान आवास योजना सरकारच्या सर्वांसाठी घर या मिशन अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून भारतातील घरांची कमतरता दूर करण्याचे लक्ष्य ठेवते.
राज्यात ग्रामीण भागात वास्तवास असणारे, इतर मागास प्रवर्गातील आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी, आवास प्लस प्रणाली वर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीम द्वारे रद्द झालेले पात्र लाभार्थी जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थींना यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
फायदा होईल कसा
पीएम आवास योजनेसाठी 60000 कोटींचे अनुदान देण्याची योजना आहे .योजनेअंतर्गत नऊ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येईल. कर्जाच्या व्याजावर सबसिडी देण्यात येईल. वाढती महागाई ,पैशांचा अभाव यामुळे घर खरेदी करताना घर कर्जा शिवाय आपल्याकडे कोणता ही पर्याय नसतो.अशाच घर खरेदी करणाऱ्यांचे लवकर स्वप्न पूर्ण होणार आहे. केंद्र सरकार लवकरच साठ हजार कोटी रुपयांची गृह कर्ज अनुदान योजना आणणार आहे.विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना येत्या काही महिन्यात सुरू होऊ शकते.
3 ते 6.5 टक्के वार्षिक व्याजदर
या योजनेच्या सबसिडी अंतर्गत 9 लाख रुपयांपर्यंत 3 ते 6.5 पाच टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज पुरवठा केला जाईल.म्हणजेच सध्याच्या सरासरी 9% व्याजदरात किमान 3 ते 5 टक्के सूट मिळणार आहे .सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 20 वर्षाच्या कालावधीसाठी घेतलेले पाच लाखाहून कमी कर्जही प्रस्तावित योजनेसाठी पात्र असेल.हा व्याजदर व्याजावरील सूट ही लाभार्थ्यांच्या गृह कर्ज खात्यात थेट जमा केली जाईल. सन 2028 पर्यंत सुरू ठेवली जाणारी ही प्रस्तावित योजना अंतिम स्वरूपात आहे अशी सूत्राची माहिती आहे.