जमीन किंवा शेत जमीन खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक असते या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
Land purchase :- जमीन किंवा शेत जमीन खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक असते. शेतकऱ्यांची शेत जमीन खरेदी करताना मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता असते. यामुळे शेतकऱ्यांनी पूर्णपणे काळजी घेणे आवश्यक असते. शेतजमीन विक्रीला काढताना त्या शेतकऱ्याच्या नावावर ती शेतजमीन असणे आवश्यक असते.
हे ही वाचा: मेडिक्लेमच्या या नियमात सरकार बदल करणार | ग्राहकांना दिलासा
शेतकऱ्याच्या नावावर सातबारा, फेरफार उतारा, भोगवटादार वर्ग, संबंधित जमिनीचा नकाशा, त्या जमिनीला शेत रस्ता आहे की नाही या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक तपासून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाहीतर या कारणांमुळे शेतकऱ्याची फसवणूक देखील होऊ शकते.
अनेकदा असे होते की, शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असते परंतु तिचा ताबा हा दुसऱ्याच शेतकऱ्याकडे असतो. अशावेळी खरेदी खत होते परंतु सातबारा उताऱ्यावर नाव लागत नाही. या मागचे कारण म्हणजे मूळ जमिन ज्या मालकाची आहे.तो जर विरोधात गेला तर ज्याने जमीन खरेदी केली आहे, त्यांना याचा त्रास सहन करावा लागू शकतो.
खरेदी खत
खरेदी खत हे जमीनीसाठी अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र असते. हे कागदपत्र करणे खूप आवश्यक असते. खरेदी खत काढण्यासाठी तालुक्यातील निबंधक कार्यालयात आवश्यक असलेले सर्व कागदपत्रांची पूर्तता करून व आवश्यक असलेली शुल्क भरून खरेदीखत करावे लागते. त्यामध्ये मूळ मालकाचे नाव, गट नंबर, चतु:सीमा, हे तपासून घेणे आवश्यक असते.
हे ही वाचा: नवीन SBI Debit card Activate या प्रकारे करता येऊ शकते.
शेत रस्ता आहे की नाही?
तुम्ही जी जमीन खरेदी करणार आहे त्या जमिनीला शेत रस्ता आहे की नाही ? हे तपासून घेणे अत्यंत आवश्यक असते. ज्यावेळी आपण शेतामध्ये पिकांची लागवड करू लागतो किंवा आपल्याला शेती विकण्याची वेळ येते त्यावेळी समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यावेळी जमिनीमध्ये कोणतेही पीक लागवड केले जात नाही त्यावेळी त्या जमिनीच्या नकाशामध्ये रस्त्याची खूण दाखवलेली असते. जमीन खरेदी करताना त्या जमिनीमधला रस्ता हा खाजगी असल्यास रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व त्या जमिनीच्या मालकाची हरकत नसल्याची खात्री करावी.
हे ही वाचा: थ्री फेज स्टार्टर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ! ॲपच्या माध्यमातून नियंत्रण.
तपासून घ्या भूधारणा पद्धत
तुम्ही जी जमीन खरेदी केली आहे त्या जमिनीचा सातबारा पाहताना त्यावर ‘भोगवटादार वर्ग-1’ किंवा ‘भोगवटादार वर्ग-2’यांपैकी एक काहीतरी नोंदणी केलेली असते. अशावेळी तुम्ही जी जमीन खरेदी केलेली असाल त्या जमिनीच्या उता-यावर ‘भोगवटादार वर्ग -2’ अशी नोंद असेल तर ती जमीन खरेदी करू नये. अशा प्रकारच्या जमिनी खरेदी करण्यासाठी सरकारने बंधने लागू केलेली आहेत. ‘भोगवटादार वर्ग-1 ’अशी नोंदणी संबंधित जमिनीची केलेली असेल तर ती जमीन खरेदी करावी. यावर खरेदी-विक्री करण्यासाठी सरकारचे कोणती ही बंधने नसतात.
‘भोगवटदार वर्ग-2’ असलेल्या जमिनी खरेदी विक्री करताना सरकारची परवानगी घेतल्याशिवाय ती जमीन विकता येत नाही. त्या प्रकारच्या जमिनी देवस्थान, इनामी जमीन, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या असतात.
हे ही वाचा: Grass Cutter शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार ! किंमत किती जाणून घ्या.
जमिनीच्या गटाचा नकाशा पाहणे
तुम्हाला जर जमीन खरेदी करायची असेल तर जमिनीचा नकाशा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. जमिनीचा नकाशा हा तलाठ्याकडून मिळू शकतो किंवा तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयात आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. जमिनी खरेदी करताना नकाशा तपासून पाहणे खूप महत्त्वाचे असते. तुम्ही जी जमीन खरेदी करत आहात, त्या जमिनीच्या चतु:सीमा त्यामुळे कळतात. जमिनीचे क्षेत्र हे प्रत्यक्षात वेगळे व नकाशात वेगळे असू शकते. नकाशामुळे जी जमीन खरेदी करत आहात त्याच्या आजूबाजूचे गट नंबर तुम्हाला समजू शकतो,ज्यामुळे तुम्हाला शेतकऱ्यांकडून जमिनी विषयी संपूर्ण चौकशी करता येऊ शकते.
जमिनीचा सातबारा व फेरफार उतारा
तुम्ही जी जमीन खरेदी करत आहात त्या खरेदीसाठी सातबारा व फेरफार उतारा खूप महत्त्वाचा असतो. हे दोन्ही उतारे तुम्हाला तलाठ्याकडून काढून मिळू शकतात. तलाठ्याकडून त्या जमिनीच्या क्षेत्राचा ८ अ उतारा देखील काढावा. त्या उताऱ्यावरील संपूर्ण माहिती पाहून ती जमीन खरेदीचा विचार करावा. जमिनीवर एखाद्या बँकेचे कर्ज देखील असू शकते किंवा त्या जमिनीवरून वाद देखील सुरू असू शकतो. अशी जमीन खरेदी केल्याने तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. तुम्ही त्या जमिनीवर कोणतेही कर्ज नसणे व त्यावर कोणतेही वाद नसेल अशाच जमीनी खरेदी करण्याचा विचार करावा. त्या जमिनीवर कोणताही नियोजित महामार्ग आहे की नाही ? हे देखील तपासून घेणे आवश्यक असते.
हे ही वाचा: YouTube वर फोटो अपलोड करून ही कमाई होणार.येणार नवीन अपडेट.
अशा प्रकारे तुम्ही वरील सर्व बाबी लक्षात घेऊन जमीन खरेदी केली तर शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.व तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो.

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680