सायबर गुन्ह्याबाबत महत्वाची माहिती

सायबर गुन्ह्याबाबत सविस्तर महत्वाची माहिती जाणून घ्या

सध्याच्या काळात सायबर गुन्हे वाढले आहेत आणि या दृष्टीने सायबर गुन्ह्यांविषयी माहीत असणे गरजेचे आहे. हा गुन्हा अशा प्रकारचा गुन्हा आहे जो मुख्य तो इंटरनेट द्वारे केला जातो.

या गुन्ह्यामध्ये नेटवर्कचा आणि संगणकाचा समावेश असतो. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना सायबर गुन्हे असे संबोधतात. सध्या आपल्या अवतीभवतीच्या परिसरात अनेक प्रकारचे सायबर गुन्हे घडून आलेले दिसून येतात जसे की स्पेम, फिशिंग, डेटा चोरी, हॅकिंग इत्यादी.

हे ही वाचा: TRAI DND 3.0 (Do Not Disturb) install करा आणि अनोळखी कॉल किंवा मेसेज पासून सुटका मिळवा |

या गुन्ह्यांमध्ये एखादा व्यक्ती तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या वैयक्तिक किंवा संवेदनशील माहितीत प्रवेश करतो आणि इंटरनेटच्या माध्यमातून तुमचा वैयक्तिक डेटा चोरी करतो या प्रक्रियेला हॅकिंग म्हणतात.

जो व्यक्ती ही प्रक्रिया चालवत असतो त्याला हॅकर्स असे संबोधतात. जर तुम्हाला हॅकिंग ही प्रक्रिया कळाली असेल तर हेही कळाले असेल की हॅकिंग मुळे आपल्यासाठी कशा पद्धतीने तांत्रिक धोका निर्माण होऊ शकते . हॅकिंग चे मुख्यत दोन प्रकार असतात पहिला प्रकार म्हणजे एथिकल हॅकिंग आणि दुसरा प्रकार म्हणजे द्वेषयुक्त हॅकिंग.

हे ही वाचा: तुमच्या Aadhar Card चा वापर दुसरे कोणी करत नसेल ना ? मोबाईलमध्ये असे तपासा

एथिकल हॅकिंग

एथिकल हॅकिंग हा असा हॅकिंग प्रकार आहे जो चांगल्या वा योग्य उद्देशाने केलेला असतो. या हॅकिंग प्रकाराला वाईट हेट हॅकिंग असेही म्हणतात. या हॅकिंग प्रकारात तुमचा कोणताही डेटा चोरी केलेला नसून नष्टही केला जात नाही. हा हॅकिंग प्रकार पूर्णपणे कायदेशीर असतो.

द्वेषयुक्त हॅकिंग

हॅकिंग चा दुसरा प्रकार म्हणजे द्वेषयुक्त हॅकिंग. या हॅकिंग प्रकारात हॅकर्स तुमचा वैयक्तिक डेटा चोरी करतात आणि तो डेटा नष्टही करतात. हॅकिंग प्रकार कायदेशीर नसून यामुळे धोकाही निर्माण होऊ शकतो. हा हॅकिंग प्रकार एथिकल हॅकिंगच्या पूर्ण पणे विरुद्ध आहे, आणि या हॅकिंग प्रकाराला ब्लॅकहेड हॅकिंग असेही म्हणतात.

Leave a Comment