पदोन्नती नंतर एक वेतनश्रेणी : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांतील पदवीधर शिक्षकांना,मुख्याध्यापकांना,केंद्रप्रमुखांना !

पदोन्नती नंतर एक वेतनश्रेणी : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांतील पदवीधर शिक्षकांना,पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करत असताना.

पार्श्वभूमी

80% डिस्काउंट मिळवा ! अमेझॉन वर !!
आपल्या घरात दररोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तूंवर 80% डिस्काउंट ! आजच या लिंक वर क्लिक करा आणि मिळावा.
लिंक :
https://amzn.to/3rwMc7b

अलीकडे शिक्षण आणि शिक्षकाबाबत शासनाचे निर्णय काहीसे नकारात्मक निघत असतानाच पदवीधर वेतनश्रेणीतील पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदावरुन पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळल्यानंतर वेतनाबाबत काही त्रुटी होत्या त्या शासनाने दूर करण्यासाठी एक योग्य पाऊल उचलले आहे. शासनाने एक अध्यादेश काढला आहे तो काय आहे आता आपण पाहणार आहोत.

हे ही वाचा

दप्तरमुक्त शनिवार : मी क्वीन…! अनोखा उपक्रम मनपा शाळा क्र.86 (मुली) पाथर्डीगांव येथे संपन्न !

पदवीधर वेतनश्रेणीतील पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदावरुन पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती मिळल्यानंतर, काही जिल्हा परिषदा वेतन निश्चिती करताना महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१, नियम ११ (१) (अ) नुसार पदोन्नतीची एक काल्पनिक वेतनवाढ देत नसल्याचे, महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ व काही माननीय विधानसभा/विधान परिषद यांच्या पत्रान्वये शासनाच्या निदर्शनास आल्याने याबाबत सर्व समावेशक सुचना देण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता.

पदवीधर प्राथमिक शिक्षक संवर्गातून सेवाज्येष्ठता / गुणवत्ता व सामाजिक आरक्षण या निकषांवर पदोन्नती झालेल्या मुख्याध्यापकांना ग्राम विकास विभागाच्या दिनांक १८ नोव्हेंबर, १९८८ च्या शासन निर्णयानुसार पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक हे पदनाम निश्चित करण्यात आले आहे.

हे ही वाचा

Dunki film “डंकी” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक १४ नोव्हेंबर, १९९४ अन्वये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी केंद्रप्रमुख पदाची निर्मिती करण्यात आली आहे.
पदवीधर प्राथमिक शिक्षक हा त्यास संबंधित शाळेत नेमून दिलेल्या विषयाच्या अध्यापनापुरता मर्यादित असतो.

तो इयत्ता ६ ते ८ मधील विशिष्ट विषयांचे अध्यापनाचे कामापुरता मर्यादित असतो. परंतु पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक हा शाळेचे संपूर्ण व्यवस्थापनासाठी जबाबदार असून त्यांना दरआठवडयात किमान १८ तास अध्यापन करणे बंधनकारक आहे व उवरित कालावधी त्याला संबंधित शाळेचे प्रशासन व संनियंत्रण हाताळावे लागते.

तसेच केंद्रप्रमुखास जिल्हा परिषदेच्या दहा शाळांचे पर्यवेक्षण व साप्ताहीक सहा तासांचे किमान अध्यापन करणे बंधनकारक आहे. अशाप्रकारे पदवीधर पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापकांचे व केंद्रप्रमुखाचे उपरोक्त कामकाज लक्षात घेता, पदवीधर प्राथमिक शिक्षकास केंद्रप्रमुख अथवा पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्याच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये निश्चितपणे वाढः होते. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम ११ (१) खालीलप्रमाणे तरतूदीस •अनुसरुन पुढीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहे.

हे ही वाचा

दप्तरमुक्त शनिवार : शिक्षणाधिका-यांनी घेतला हातात झाडू मनपा शाळा क्र.53 चेहडी यांच्या स्वच्छ्ता मोहिमेत !

शासन निर्णय :-

१. महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम ११ (१) खालीलप्रमाणे तरतूद आहे.

” नियम११ (१ ) नवीन पदावरील नियुक्तीमुळे जुन्या पदाच्या कर्तव्यापेक्षा किंवा जबाबदाऱ्यांपेक्षा अधिक महत्वाची कर्तव्ये किंवा जबाबदाऱ्या येत असतील आणि (ए) वर्ग दोनच्या पदापेक्षा वरच्या दर्जाचे नसलेले पद तो धारण करीत असेल तर, त्याचे वरच्या पदाच्या समयश्रेणीतील प्रारंभिक वेतन हे खालच्या पदाच्या ज्या टप्प्याला त्याचे वेतन असेल त्या टप्प्याला एक वेतनवाढ मिळवल्यानंतर, आणि वेतनमानातील कमाल वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत मागील वेतनवाढीइतकी रक्कम मिळाल्यावर, जे मानीव वेतन येईल त्याच्या पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात येईल. “

२. पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक पदाचे व केंद्रप्रमुख पदाचे उपरोक्त नमूद कामकाज लक्षात घेता, पदवीधर प्राथमिक शिक्षकास, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्याच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये निश्चितपणे वाढ होते.

त्यामुळे पदवीधर प्राथमिक शिक्षकास, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर, पदोन्नती स्विकारल्यानंतरचे वेतन निश्चित करताना, महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम ११ (१) तरतुदीनुसार एक वेतनवाढ देवून त्याची वेतन निश्चिती करण्यात यावी.

शासनाने एक चांगला निर्णय घेतला असल्याचे निश्चितच वाटते.

शासन निर्णय या ठिकाणी पहा आणि Download करा.

Leave a Comment