नवभारत साक्षरता अभियान मूल्यांकन बाबत महत्त्वाची या विषयी सविस्तर माहिती
नवभारत साक्षरता अभियानात असाक्षर व्यक्तीचे बाह्य संस्थेकडून मूल्यमापन करण्यात येणार आहे.या असाक्षर व्यक्तीला काय काय कौशल्ये प्राप्त होणे व कोण कोणती अध्ययन निष्पत्ती प्राप्त झाली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती या लेखात पहायला मिळेल .Evaluation of Navbharat Literacy Mission
Table of Contents
भाषा – साक्षरतेच्या अध्ययन निष्पत्ती
अध्ययनार्थी –
• अक्षरांच्या चिन्हांना त्यांच्या ध्वनी सोबत जोडतात.
• दिलेल्या शब्दातील विशिष्ट अक्षर ओळखतात, तसेच दिलेले अक्षर स्वतंत्रपणे ओळखतात.
• पाठ्य घटकांमध्ये वारंवार येणारे शब्द ओळखतात. उदाहरणार्थ आहे, आणि, यात, त्यात, त्याला, इत्यादी…
• अक्षरांना जोडून (डीकोड करून) शब्दांचे वाचन करतात.
• पूर्ण शब्द ओळखून त्याचे वाचन करतात.
• चित्र किंवा संदर्भ यांचे आधारे अंदाज लावून वाचन करतात.
हे ही वाचा: तुमच्या Aadhar Card चा वापर दुसरे कोणी करत नसेल ना ? मोबाईलमध्ये असे तपासा
• स्वर आणि त्यांच्या मात्रा ओळखतात.
• एकापेक्षा अधिक पद्धतींचा वापर करून वाचन करतात. डीकोडिंग, पूर्ण शब्द ओळखणे, चित्र किंवा संदर्भ यांच्या आधारावर अंदाज लावणे इत्यादी…
• आपल्या परिसरात सामान्यपणे उपलब्ध होणाऱ्या पाठ्यघटकांचे वाचन करतात आणि त्यांना आपल्या जीवनातील अनुभव व परिस्थितीशी जोडतात.
• विशेष अध्ययन मुद्द्यांची माहिती प्राप्त करण्यासाठी विषय किंवा पाठ्यघटकांशी संबंधित चर्चेत सहभागी होतात.
आपली गरज व आवड लक्षात घेऊन स्वतंत्रपणे वाचन व लेखन करतात.
• पाठ्यघटकाच्या आधारे प्रश्नांची उत्तरे/आपल्या प्रतिक्रिया/आपले विचार, मौखिक किंवा लिखित स्वरुपात मांडतात.
• दैनंदिन व्यवहारात वाचन व लेखनाचा उपयोग करतात.
• अक्षर, शब्द, पूर्ण वाक्य स्पष्टपणे वाचतात व लिहितात.
• वाचताना, लिहिताना, आणि बोलताना गरजेनुसार प्रवेशिकेतील भाषा आणि स्वतःच्या भाषेचा उपयोग करतात.
हे ही वाचा: Vitamin D मिळवण्याचे 8 स्त्रोत्त आणि महत्त्वाचे Useful फायदे
गणित अध्ययन निष्पती (गणन, स्थानिक किंमत आणि संख्येवरील क्रिया इ.)
अध्ययनार्थी –
• 1 ते 100000 पर्यंतच्या संख्या वाचतात, लिहितात आणि दैनंदिन व्यवहारात त्याचा उपयोग करतात.
• 1 ते 999 पर्यतच्या संख्यांचे एकक, दशक आणि शतक ओळखतात.
• बरोबर, ”, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, ‘x’ आणि भागाकार’ या चिन्हांना ओळखतात.
• दैनंदिन जीवनात बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकर या क्रियांचा वापर करतात. 1, 2, 5, 10, 20, 50, 100, 200, 500, आणि 2000 च्या नोटा/नाणी ओळखतात आणि देण्या घेण्याचे व्यवहार करतात.
• दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या संदर्भाने वस्तू, स्थान इत्यादींना समान भागात वाटतात. समान भागांच्या आधारावर अर्धा, एक चतुर्थांश, तीन चतुर्थांश भाग ओळखतात.
• अर्धा, एक चतुर्थांश, तीन चतुर्थांश भाग यांना वेगवेगळ्या संख्यांच्या रुपात लिहितात.
• द्विमितीय आकार, जसे त्रिकोण, चौकोन, वर्तुळ तसेच त्रिमितीय आकार, जसे वृत्ताकार (गोल), दंडगोल, शंकू, घन, इष्टिकाचिती इत्यादींच्या वैशिष्ट्यांसह चर्चा करतात; तसेच त्यांचा दैनंदिन जीवनात उपयोग करतात.
हे ही वाचा: 60 सेकंदात समजेल तुमच्या नावावर किती सिमकार्ड
• आकृत्या तसेच संख्यांमधील आकृतीबंध (पॅटर्न) ओळखतात; विस्तार करतात तसेच आकृतीबंध तयार करतात.
• लांबी, वजन व धारकता/आकारमान यांचे प्रमाणित आणि अप्रमणित एककाद्वारे मापन करतात; तसेच संबंधित एककांमधील आंतरसंबंध सांगतात.
• दैनंदिन जीवनात वस्तूंच्या किमती व त्यांच्या मात्रेनुसार (प्रमाणानुसार) हिशेब व देण्याघेण्याचे व्यवहार करतात.
• घड्याळातील (अनालॉग आणि डिजिटल घड्याळ) तास, मिनिटे आणि सेकंदा नुसार वेळ सांगतात; तसेच सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र या संदर्भाने वेळ सांगतात.
• तास, मिनिटे आणि सेकंदाच्या संदर्भात चर्चा करतात व त्यांच्यातील संबंध सांगतात.
• 24 तासाच्या घड्याळातील वेळेस, बारा तासाच्या घड्याळातील वेळेनुसार बदलतात.
• आपल्या परिसरात उपलब्ध दिनदर्शिके (कॅलेंडर) मध्ये आठवड्याचे दिवस, तिथी विशेष आणि वर्षातील महिन्यांची नावे ओळखतात.
हे ही वाचा: व्हाट्सअँप हॅकरने हँक केले तर काय कराल?
नवसाक्षरांसाठी ची मूल्यांकन योजना
नवसाक्षरांचे मूल्यांकन
मूल्यांकन प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
• प्रश्नपत्रिकेचे एकूण गुण – 150
• भाग ‘क’: वाचन एकूण गुण- 50
• भाग ‘ख’: लेखन एकूण गुण- 50
भाग ‘ग’: गणित (संख्याज्ञान) एकूण गुण- 50
या कौशल्यासाठी एकूण सहा प्रश्नांचा समावेश असेल.
वाचन कौशल्य
- अक्षर आणि मात्रांचे वाचन
- शब्द वाचन (शब्द चित्रांच्या जोड्या)
- वाक्याचे समज पूर्वक वाचन (चूक, बरोबर)
- दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे वाचन (चित्र, शब्द, वस्तू यांच्या जोड्या जुळवणे)
- समज पूर्वक वाक्य वाचन (वाक्यांशाच्या जोड्या) परिच्छेदाचे समज पूर्वक वाचन करणे.
हे ही वाचा: (PMJJBY) 2 लाखांचा विमा फक्त 20 रुपयांत सरकारची अनोखी योजना !
भाग ‘ख’: लेखन- एकूण गुण 50
या कौशल्यासाठी एकूण सहा प्रश्नांचा समावेश असेल.
- लेखन कौशल्यासाठी दोन-तीन प्रश्न चित्रांवर आधारित असू शकतील. एकाच प्रश्नात वेगवेगळ्या चित्रांना ओळखून उत्तर लिहिता येणे.
- हे प्रश्न जीवन कौशल्य आणि चिंतनावर आधारित असतील.
- अध्यायनार्थी प्रश्नाचे उत्तर जर आपल्या बोली भाषेत किंवा क्षेत्रीय भाषेत देत असेल आणि उत्तर बरोबर असेल तर त्याला पूर्ण गुण देण्यात येतील.
- मात्रांमध्ये झालेल्या चुकांसाठी (स्पेलिंग मिस्टेक) गुण कापण्यात येणार नाहीत.
आग ‘ग’: गणित – एकूण गुण 50
(संबोध स्पष्टता, अध्ययन निष्पती आणि गुणभारांश) प्रश्नांचे स्वरूप संख्येची समज, गणन, स्थानिक किंमत यावर आधारित.
- संख्येवरील क्रिया (बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार) आणि त्यांचा दैनंदिन जीवनातील उपयोग यावर आधारित.
- अपूर्णांकाची समज (अपूर्णांकाची ओळख) यावर आधारित.
- द्विमितीय आणि त्रिमितीय आकारांची संबोध स्पष्टता यावर आधारित.
हे ही वाचा: मेडिक्लेमच्या या नियमात सरकार बदल करणार | ग्राहकांना दिलासा
- आकृतीबंध (पॅटर्न) या विषयीची समज व स्पष्टता यावर आधारित मापन व (मापन साधने) मापनाचे एकक, त्यांच्यातील अंतर संबंध यांची समज यावर आधारित.
- भारतीय चलन (नाणी नोटा) ओळखणे आणि त्याचा दैनंदिन जीवनात वापर करणे यावर आधारित.
- संख्यांचे व्यवस्थापन याची समज यावर आधारित.
- वेळ- घड्याळ आणि दिनदर्शिका यांची समज यावर
- मूल्यांकन करताना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजेच एफ. एल. एन. आणि जीवन कौशल्यांच्या मूल्यांकनासाठी विचार होणार आहे.
हे ही वाचा: विक्रमवीर गणेश लोहारांनी केली 2700 कि.मी.व्हर्च्युअल सायकलिंग
प्रश्न पत्रिका काढतांना खालील बार्बीचा विचार केला जाईल.
- प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्षेत्रीय भाषा किंवा मातृभाषेतून असणार आहेत.
- मूल्यांकन अध्ययन निष्पती वर आधारित तसेच लेखी स्वरुपाचे असणार आहे.
- प्रश्नपत्रिकेतील प्रश्न अध्ययन निष्पती वर आधारित असणार आहेत.
- प्रश्नांची भाषा अध्ययनार्थीच्या स्तरानुसार सोपी, सुलभ, सुबोध अशी असणार आहे.
- प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा उद्देश अध्ययनार्थी ने कोणकोणत्या बाबी समजून घेतल्या; त्याचं शिकणं कसं घडून आल; कितपत घडून आलं हे पाहणे असा असणार आहे.
- प्रश्नपत्रिकेची भाषा व स्वरूप आकलनास सुखद आणि सुलभ अशी असेल.
- प्रवेशिकेमधून ज्या संकल्पना भाषा आणि गणिताच्या संदर्भाने अध्ययनार्थी नी समजून घेतलेल्या आहेत त्यांचा समावेश प्रश्न पत्रिकेत असणार आहे.
हे ही वाचा: WhatsApp वर अशी सेटिंग सुरू असेल तर फोन हॅक होऊ शकतो | संरक्षण असे करा.
प्रश्न सोडवण्याची पद्धती अध्ययनार्थीस परिचित असेल आणि त्याचा पुरेसा सराव अध्ययनार्थीकडून पूर्वीच घेण्यात आलेला असेल.
- प्रश्नपत्रिकेची रचना सोप्याकडून कठीणाकडे अशा पद्धतीची असेल जेणेकरून अध्ययनार्थिचा आत्मविश्वास वाढेल.
- मूल्यांकन पत्रिका जास्त लांब किंवा खूप छोटी अशी असणार नाही. ती विहित वेळेत पूर्ण होईल अशा पद्धतीची असेल.
- या प्रश्नपत्रिकेतून लेखन, वाचन व संख्याज्ञान यासंदर्भातील मूल्यांकन होणार आहे.
- नवसाक्षरांचे मूल्यांकन (परीक्षा) राष्ट्रीय स्तरावर एनआयओएस व राज्यस्तरावर एसआयओएस या संस्थांच्या मार्फतीने होणार आहे.
हे ही वाचा: शेत जमीन खरेदी करताना घ्यावयाची महत्त्वाची काळजी
परीक्षेत यशस्वी होणाऱ्या अध्ययनार्थीना सर्टिफिकेट दिले जाणार आहे. अध्ययनार्थीचे निरंतर शिक्षणासाठी पुढील टप्प्याचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी अध्ययनार्थीकडे असणार आहे.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680