TRAI DND 3.0 (Do Not Disturb) install करा आणि अनोळखी कॉल किंवा मेसेज पासून सुटका मिळवा | या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे एक नवीन ॲप लॉंच ( TRAI DND 3.0 ) करण्यात आले आहे. या ॲपचे नाव डू नॉट डिस्टर्ब म्हणजेच DND होय.
पहिल्या ॲप मध्ये चुका झाल्याने त्यात दुरुस्ती करण्यात आली आणि नव्याने हे ॲप लॉन्च करण्यात आले आहे. या ॲपमुळे लोकांना चांगला फायदा होतो. या ॲपमुळे आता नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी कॉल किंवा मेसेज यांपासून सुटका मिळेल.
हे ही वाचा: Mahindra : महिंद्राची 6-सीटर व्हेरिएंटमध्ये आली नवीन कार | कमी किमतीत
मोबाईलवर अनेक अनोळखी कॉल किंवा मेसेज येतात आणि यापासून सुटका मिळवून देण्यासाठी DND ॲप फारच उपयुक्त ठरणार आहे. एका अहवालाप्रमाणे दर दिवशी भारतातील प्रत्येक मोबाईल युजरच्या मोबाईलवर किमान 6 तरी अनोळखी कॉल येतात आणि यावर उपाय म्हणून DND ॲप लॉन्च केलेले आहे.
हे ॲप नवीन असल्याने जास्त लोकांना याबद्दल माहित नाही. या नवीन ॲप द्वारे अनोळखी कॉल पासून वापरकर्त्याला सुटका मिळते. या ॲपमुळे अनोळखी नंबर व आपोआप लॉक होतात. DND ॲप अधिकृत असल्या कारणाने यापासून आपल्याला कोणताही धोका नाही म्हणजेच यामुळे मोबाईल मधील डेटा चोरीला जात नाही.
हे ही वाचा: PM Kisan maandhan Yojana : सरकारची खास योजना.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने लॉन्च केलेले DND ॲप मध्ये सुरुवातीला काही चुका झाल्या होत्या पण आता त्यात दुरुस्ती करून परत त्या ॲपला लॉन्च केलेले आहे.
डाऊनलोड कसे करावे?
सर्वप्रथम प्ले स्टोअर वर जाऊन तिथे TRAT DND 3.0 हे ॲप सर्च करा.
ॲप इन्स्टॉल झाल्यावर आता ओटीपी द्वारे लॉगिन करा.
लॉगिन झाल्यावर DND App त्याचे काम सुरू करते. हा ॲप अनोळखी नंबर व येणारे कॉल व मेसेज यांना लगेच ब्लॉक करेल आणि या ॲपमुळे तुम्ही एखाद्या अनोळखी नंबरची तक्रार देखील करू शकता. अशाप्रकारे हे ॲप तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680