बहुप्रतिक्षित चित्रपट “किंग ऑफ कोठा”चा ट्रेलर झाला लॉन्च.

The trailer of the much awaited movie “King of Kotha” has been launched.

खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर मल्याळ चित्रपट “किंग ऑफ कोठा”चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर काल दिनांक 28 जून रोजी प्रदर्शित झाला आहे.

यामध्ये दुलकर् सलमान वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळणार आहे. तो एक गँगस्टर अंदाजात आपणास पाहायला मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिलाष जोशी यांनी केले आहे.

बऱ्याच वेळ आपल्या चाहत्यांना प्रतीक्षेत ठेवल्यानंतर “किंग ऑफ कोठा” चा जबरदस्त ॲक्शन नी भरलेला टीझर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. शेवटी 28 जून चा मुहूर्त चांगला असल्याने यावेळी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे हे लक्षात येते.

या चित्रपटामध्ये व्हिज्युअल इफेक्ट चा अतिशय प्रभावी वापर केलेला आहे. दक्षिणात्य चित्रपटांमध्ये व्हिज्युअल इफेक्ट अतिशय कल्पकतेने  वापरलेले  असल्याने त्यांचे चित्रपट छप्पर फाडके कमाई करतात. आज कमाई बाबत दक्षिणेतील चित्रपटांनी बॉलिवूडला ही मागे टाकलेले आहे.

यात सुद्धा दक्षिणात्य शैलीचाच वापर केलेला आहे असे वर वर तरी दिसते. या टीचर ने अंगावर रोमांच आणणारी झलक दिली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हा चित्रपट येणाऱ्या 25 ला ऑगस्ट ला “ओणम” या त्यांच्या सणाच्या दरम्यान प्रदर्शित करण्यात येणार आहे अशी समजते.

या चित्रपटाची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. त्यांच्या आवडत्या स्टार ची झलक पाहण्यासाठी अनेक चाहते डोळे लावून बसले होते.चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होण्यापूर्वीच चाहत्यांनी  ट्विटरवर “किंग ऑफ कोठा” आणि दुलकर सलमानचे नाव ट्रेंड करण्यास सुरुवात केलेली आहे.

यावरून चाहत्या मध्ये चित्रपटाची किती उत्सुकता ताणली गेली आहे हे समजते. “किंग ऑफ कोठा” हा चित्रपट अभिलाष जोशी यांनी दिग्दर्शित केलेला आहे, तो दुलकर सलमानचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असे मानले जाते.

या चित्रपटाचा टिझर मल्याळम,तेलगू,कन्नड,तामिळ आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये रिलीज करण्यात आलेला आहे असे सांगण्यात आले. या टीचर मध्ये दुलकर सलमानला एका वेगळ्याच  खतरनाक गुंडाच्या भूमिकेत दाखवण्यात आलेले आहे.

तो शस्त्रे घेऊन लोकांचा पाठलाग करत असलेला यात दिसतो. टीचर मध्ये इतर स्टार कास्टची झलक सुद्धा दाखवण्यात आलेली असून ही जी मंडळी आहे ती थिएटर मध्ये काम करणारी साधे कलाकार असल्याचे सांगण्यात येते .

“किंग ऑफ कोठा” या टिझरमध्ये चित्रपट अधिक मनोरंजक असल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपटात प्रसन्नाच्या भूमिकेत शाहूल हसन, ताराच्या भूमिकेत ऐश्वर्या लक्ष्मी, मंजूच्या भूमिकेत नायला उषा, त्याचबरोबर रंजीतच्या भूमिकेत चेंबन विनोद जोस याचा समावेश केलेला आहे. गोकुळ सुरेश टोनी ची भूमिका साकारत असल्याचे दिसते. शम्मी थीलकन रवीची भूमिका साकारत आहे.शांती कृष्णाने मालतीची भूमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे अनीखा सुरेंद्रनने रिथू ची भूमिका साकारलेली आहे.

टीझर पाहण्यासाठी येथे क्लिक करा :

दुलकर सलमान चा हा होम प्रोडक्शन चा चित्रपट असून त्याच बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. आणखी एक चित्रपट जो दाक्षिणात्य आहे त्याची मेजवानी भारतीय रसिकांना मिळणार यात शंका नाही. आता आपण वाट पाहूया चित्रपट प्रदर्शनाची,”किंग ऑफ कोटा”ची !

Leave a Comment