SIP मध्ये अधिक फायदा होण्यासाठी या बाबी लक्षात ठेवा

SIP मध्ये अधिक फायदा होण्यासाठी या विषयी सविस्तर माहिती

प्रत्येक माणसाने त्याच्या चांगल्या भविष्यासाठी पहिल्यापासूनच अधिक गुंतवणूक करून ठेवायला पाहिजे. जर तुम्ही एसआयपी (SIP) करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे.

सध्या अनेकजण असे आहेत,जे पैसे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून एसआयपी मध्ये गुंतवतात आणि नंतर चांगला रिझल्ट्स मिळाला नाही म्हणून आरडाओरडा ही करत असतात,पण आपल्या कमी रिटर्न्स च्या मागे कारणीभूत आपल्या काही छोट्या चुका असतात. एसआयपीच्या माध्यमातून छोट्या रक्कमेचे रूपांतर मोठ्या रकमेत करता येते, पण एसआयपी हे मार्केट सोबत लिंक असल्याने रीस्कला सामोरे जावे लागते.

हे ही वाचा: लेक लाडकी : ही योजना काय आहे जाणून घ्या |

जर तुम्ही पुढील चार गोष्टी लक्षात ठेवून एसआयपी (SIP) मध्ये पैसे गुंतवत असाल तर नक्कीच तुम्हाला चांगला रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे तर चला याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया.

रिसर्च करा

नेहमी एसआयपी मध्ये पैसे गुंतवण्याआधी त्याविषयी पूर्णपणे संशोधन करा. तसेच तुम्ही याविषयी अनुभवी व्यक्तीकडून सल्ला ही घेऊ शकतात. यामुळे तुम्हाला एसआयपी मधून चांगला रिटर्न् मिळू शकतो. कधी कधी यात तुम्हाला नुकसान होण्याची ही संभावना आहे, पण नेहमी एसआयपी पैसे गुंतवताना त्याविषयी रिसर्च च्या माध्यमातून पूर्णपणे जाणून घ्या.

हे ही वाचा: दहावी नंतर कोणती 8 कौशल्ये विकसित होणे आवश्यक.

छोट्या रक्कमेने करा सुरुवात

एस आय पी करायची असेल तर नेहमी जास्त रक्कम लागते असे नाही तर तुम्हाला कमी रक्कमेतूनही एसआयपी करता येते. अनेक वेळा तुम्ही जास्त रक्कमेतून एसआयपी करतात आणि त्यामुळे तुम्हाला नुकसानाला सामोरे जावे लागते. अशा वेळेस नेहमी कमी रक्कमेतून एसआयपी करा ज्याने तुम्हाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार नाही.

गुंतवणुकीचे टार्गेट ठरवा

कधी ही एसआयपी करण्याआधी तुम्हाला गुंतवणुकीचे टार्गेट ठरवायला हवेत. तुम्ही खूप गोष्टींसाठी एसआयपी करत असता आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च होणार आहे याविषयी तुम्हाला माहीत असते म्हणून तेवढी रक्कम तुम्ही एसआयपीत गुंतवू शकतात.

हे ही वाचा: NPS : एनपीएसमधून पैसे काढतांना नवीन महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

अचानक बंद करू नका एसआयपी (SIP)

एसआयपी गुंतवणूक करताना ती जितकी जास्त वेळ राहते तितकाच चांगला रिटर्न्स भविष्यात मिळत असतो म्हणून कधीही एसआरपीत गुंतवणूक करताना ती थोड्या वेळानंतर काढून घेऊ नका. सुरुवातीला खूप उत्साहात एसआयपीत गुंतवणूक करतात आणि बाजारात मंदी आली की ती एसआरपी काढून घेतात असे करताना पुढे नुकसान झेलावे लागते म्हणून जर बाजारात मंदीची लाट असेल तर ती थोड्या वेळापूरतीच असते, कारण काही काळानंतर ती परत उसळी घेते. अशा प्रकारचे चक्र नेहमी सुरूच असते म्हणून कधीही एसआयपी करताना ती अचानक बंद करू नका.

Leave a Comment