लेक लाडकी : ही योजना काय आहे जाणून घ्या | या विषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी व मुलींचे जन्म प्रमाण वाढावे म्हणून राज्य शासनाने एकात्मिक बालक विकास विभागाने मुलींसाठी एक नवीन ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली आहे. योजनेद्वारे मुलींच्या जन्मानंतर त्यांच्या पालकांच्या खात्यात टप्प्या टप्प्याने एक लाख पाच हजार रुपये जमा करण्यात येईल अशा पद्धतीची ही योजना आहे.
हे ही वाचा: दहावी नंतर कोणती 8 कौशल्ये विकसित होणे आवश्यक
ही योजना मुलींचा जन्मदर वाढावा व त्यांचा मृत्यू दर कमी व्हावा, तिच्या शिक्षणाला चालना मिळावी, मुलींचे सक्षमीकरण व्हावे, बालविवाह थांबावे म्हणून ही योजना अमलात येत आहे. ‘लेक लाडकी’ योजना 30 सप्टेंबर 2023 पासून सुरू केलेली आहे. या योजनेत नोंदणीचे काम हे बालविकास एकात्मिक विभागाच्या वेब पोर्टल वर केले जाते. योजना गरीब मुलींसाठी फारच चांगली ठरणार आहे व त्यांना योजनेमुळे मदतही होणार आहे.
मिळेल या लाभार्थ्यांना लाभ
या योजनेसाठी लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे पैसे अदा करण्यात येतील. या योजनेसाठी सरकारच्या काही अटी आहेत ते पुढील प्रमाणे:-
त्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असायला हवे.
मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला पाहिजे.
एक अथवा दोन मुलींना, एक मुलगा, एक मुलगी असल्यास त्या मुलीला लाभ मिळणार आहे.
दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेस आईला जुळी आपत्ती जन्माला आल्यास त्या मुलीला लाभ मिळेल.
हे ही वाचा: NPS : एनपीएसमधून पैसे काढतांना नवीन महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
लाभार्थी कुटुंबातील मुलींचे रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी असेल तर तिला पाच टप्प्यात एक लाख पाच हजार रुपये एवढा लाभ मिळेल.
लेक लाडकी योजनेची आवश्यक कागदपत्रे
१. मोबाईल नंबर
२. उत्पन्न प्रमाणपत्र
३. जात प्रमाणपत्र
४. बँक खाते विवरण
५. पत्त्याचा पुरावा
६. पासपोर्ट आकाराचा फोटो
७. पालकांचे आधार कार्ड
८. मुलीचे जन्म प्रमाणपत्र
९. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड
1 लाख 5 हजार मिळणार
या योजनेद्वारे मुलींचा जन्म झाल्यावर पाच हजार तर, ती पहिलीत गेल्यावर सहा हजार, सहावीत गेल्यावर सात हजार, अकरावीत गेल्यावर आठ हजार आणि तिचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये तिच्या खात्यात मिळणार आहे. अशाप्रकारे मुलींच्या जन्मानंतर या योजनेअंतर्गत पाच टप्प्यात मुलींना एक लाख पाच हजार रुपये मिळणार आहे. या योजनेमुळे प्रत्येक कुटुंबासाठी मुलगी आता लक्ष्मी ठरेल.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680