Light Bill चिंता मिटणार ! छोटी पवनचक्की ठरणार सामान्य माणसासाठी पर्याय याबाबत सविस्तर माहिती आपण पाहूया.
Table of Contents
संपूर्ण देशात महागाईचे प्रमाण वाढले आहे आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणसासाठी वीज बिलाचा प्रश्न चिंतेचा ठरला आहे. ही महागाई कुठेतरी थांबावी किंवा कमी व्हावी असे प्रत्येक सामन्यातील सामान्य लोकांना वाटते.सर्वसामान्य माणूस तर या महागाईला त्रासला आहेच.रोजच्या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे.तशातच लाईट बिल हे इतके असते जे भरताना सामान्य लोकांचा बजेट कोलमोडतो. Light Bill worries will disappear! A small windmill would be an option for the common man.
हेही वाचा : केंद्रीय गृह मंत्रालयाची अधिसूचना :आता नाही लागणार आधार कार्ड ची गरज !
अशी सामान्य माणसाची परिस्थिती असते. प्रत्येक जण इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर करू लागला आहे. टीव्ही, फ्रिज ,शेगडी ,पंखा ,इत्यादी गोष्टींसाठी विजेची गरज असते. स्वस्तात वीज उपलब्ध व्हावी यासाठी त्यावर पर्याय म्हणून सामान्य माणूस आपल्या घरावर सोलर सिस्टीम बसवत असतो.
सोलर हे सौर उर्जेवर उन्हावर चालते.सोलर सिस्टिम बसवल्यामुळे वीज बिलाची आकडेवारी कमी होते पण ती शून्यापर्यंत कधीच येत नाही.सोलर सिस्टिम चा तोटा देखील आहे.सोलर सिस्टीम कायम ठीक काम करत नाही.पावसाळा व हिवाळा या ऋतूत सोलर काहीसे काम कमी करते.यावर पर्याय म्हणून पवनउर्जा हा एक पर्याय अतिशय उत्तम आहे.पवन ऊर्जा ही सलग 24 तास ऊर्जा देवू शकते. सौर ऊर्जा पेक्षा 220 टक्के पेक्षा जास्त ऊर्जा निर्मिती यातून करता येते. त्याला सूर्याचे आणि सूर्यप्रकाशाचे कोणतेही मर्यादा नाही हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे .यामध्ये कुठल्याही कंपनीचे वितरण कनेक्शन घेण्याची गरज नाही.
हेही वाचा : Oscars 2024 : मल्याळम सिनेमा “2018” ऑस्कर वारीला !
छोट्या पवनचक्की विषयी सविस्तर माहिती पाहूया.
आज आपण ज्या पवन चक्की विषयी बोलणार आहोत,ती पवनचक्की जर्मनीतील एका कंपनीने बनवली आहे त्या कंपनीचे नाव skywind असे आहे. त्याचे वजन वीस किलोग्राम इतके आहे. या उलट मोठ्या पवनचक्कीचे वजन हे 22 हजार किलोग्रॅम इतके असते. या पवनचक्कीचा जो पंखा असतो, तो विशेष धातूपासून बनवण्यात आला आहे. जो धातू विमानामध्ये वापरला जातो, त्या धातूपासून हा पंखा बनवण्यात आला आहे.
त्याचे नक्षीकाम देखील विशिष्ट बनवले आहे. जेणेकरून कमी हवा जरी असेल तरीसुद्धा ते उर्जा तयार करू शकेल असे याचे वैशिष्ट्य आहे.पवनचक्कीसाठी लागणारा हवेचा वेग चार ते सहा मीटर /सेकंद इतका असतो. छोटी पवनचक्की महाराष्ट्रामध्ये 100% चालण्याची हमी देखील आहे.
अशी एक पवनचक्की 100km/HR ऊर्जा तयार करते. छोटी ही पवनचक्की जर्मन तंत्रज्ञानाने विकसित केली आहे. त्याची किंमत 260000 आहे. ही पवनचक्की वजनाने हलकी आहे. ती आपल्या घराजवळ किंवा घरावर बसवणे सुद्धा शक्य आहे .
अनेक ठिकाणी छोटी पवनचक्की उभारण्यात देखील आली आहे.जेणेकरून सामान्य माणसाची लाईट बिलाची चिंता मिटावी हा या पवनचक्कीचा मुख्य हेतू आहे. छोटी पवनचक्की ही सौरऊर्जापेक्षा 220 टक्के जास्त ऊर्जा बनवते हा पर्याय सर्वसामान्यांसाठी चांगला पर्याय आहे वर आपण यावर माहिती पाहिली आहे.

संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680