Mahindra : महिंद्राची 6-सीटर व्हेरिएंटमध्ये आली नवीन कार | कमी किमतीत

महिंद्राची (Mahindra) 6-सीटर व्हेरिएंटमध्ये आली नवीन कार या विषयी सविस्तर माहिती.

काही दिवसांपूर्वीच महिंद्राने (Mahindra) xuv700 व्हर्जन 2024 मध्ये भारतात लॉन्च केलेली आहे. महिंद्राच्या नवीन व्हर्जनमध्ये त्यांनी xuv ची 6 सीटर सीटिंग कॉन्फिगरेशन देखील लाँच केलेली आहे. महिंद्रा (Mahindra) ने त्यांच्या कंपनीचा नवीन व्हर्जन भारतात लॉन्च करताना त्याच्यात चार हजार रुपयांची कपात देखील केलेली आहे.

नवीन एक्सयूव्ही 700 एकूण 5 व्हेरिएंट्स MX, AX3, AX5, AX7 आणि AX7L मध्ये लॉन्च केलेली आहे. कंपनीने दिलेल्या अपडेटनुसार xuv700 2024 व्हर्जन हे 25 जानेवारीपासून ग्राहकांना देशभरातील सर्व महिंद्रा डीलरशिप वर आरामात उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर xuv700 च्या बेस मॉडेलची किंमत 13.99 लाखापासून सुरू होते तर त्याच्या टॉप मॉडेल ची किंमत 23.99 लाखांपर्यंत जाते.

हे ही वाचा: तुमच्या Aadhar Card चा वापर दुसरे कोणी करत नसेल ना ? मोबाईलमध्ये असे तपासा

 नवीन सिटिंग ऑप्शनसह लॉन्च

 कंपनीने xuv700 च्या मिडसाईज xuv ला सहा सीटर कॉन्फिगरेशन दिलेले आहे. हे मिडल रोममध्ये एअर सीट सह उपलब्ध होते. पण कंपनीने मात्र हे सीटिंग ऑप्शन्स फक्त xuv700 च्या Ax7 आणि Ax7L च्या व्हेरिएंटलाच दिलेले आहेत. हे केबिन लेआउट ऑप्शन लॉन्च पासून XUV700 च्या प्रतिस्पर्ध्याद्वारे सादर करण्यात आलेले आहे. लोक दीर्घकाळापासून या कार ची वाट बघत होते.

महिंद्रा xuv700 व्हेरिएंट आणि एक्स शोरूम प्राईज

  • mx व्हेरिएंट :- 13.99 लाख
  • Ax3 व्हेरिएंट :- 16.39 लाख
  • Ax5 व्हेरिएंट :- 17.69 लाख
  • Ax7व्हेरिएंट :- 21.29 लाख
  • Ax7L व्हेरिएंट :- 23.99 लाख

हे ही वाचा: Vitamin D मिळवण्याचे 8 स्त्रोत्त आणि महत्त्वाचे Useful फायदे

हे आहेत काही मोठे अपडेट

कंपनीने xuv700 मध्ये सर्वात मोठी फिचर अपडेट Ax7L च्या व्हेरिएंटमध्ये दिलेली आहे. ते फीचर म्हणजे या व्हेरिएंटची फ्रंट सीट होय. याबरोबरच या व्हेरिएंट मध्ये अजून काही फीचर ही दिलेली आहेत. आता सर्व ग्राहकांना महिंद्रा xuv700 नैपोली ऑल ब्लॅक कलर मध्येही उपलब्ध होणार आहे.

हे ही वाचा: 60 सेकंदात समजेल तुमच्या नावावर किती सिमकार्ड

xuv700 चे इंजिन

कंपनीने महिंद्राच्या (Mahindra) लेटेस्ट xuv700 2024 व्हर्जनच्या इंजिन मध्ये कोणतेही बदल केले नाहीत. इंजिन हे पहिल्याप्रमाणेच दोन लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर डिझेल सह ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. xuv700 च पेट्रोल इंजिन 200 बीएचपी पावर आणि 380 एनएम टॉर्क जनरेट करते आणि डिझेल इंजिन 185 बीएचपी पावर आणि 450 एनएम टॉर्क जनरेट करते.

Leave a Comment