वाट पाहणे थांबले. माझे, आपले,सर्वांचे ! बहुचर्चित गदर-2 रिलीज झाला आहे. आणि असा काहीसा धमाका केला आहे की, बॉलीवूडचे राजे महाराजे म्हणून घेणारे ही चकित झाले आहेत. 22 वर्षानंतर तारासिंग पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अवतरला आहे. बावीस वर्षांपूर्वीचा गदर एक प्रेम कथाचा तोच तारासिंग त्याच इमोशन तोच डॅशिंगपणा या चित्रपटात पहावयास मिळणार आहे. तुम्हाला चित्रपट पाहायचा आहे ना? त्याआधी चित्रपटाबद्दल आम्हाला काय वाटतं ते जाणून घ्या.
हे ही वाचा
सनिदेवलच्या चाहत्यांना या चित्रपटाची खूप मोठ्या प्रमाणावर पाहण्याची इच्छा होती. चित्रपटाची काही गाणी यापूर्वीच रिलीज झालेली आहेत. यापूर्वीचा गदर-2 चा भाग 2001 मध्ये आलेला होता. अपेक्षेप्रमाणे गदर-2 ने सिनेमागृहात मोठाच गदर केला आहे अशी म्हटले तर वावगे ठरणार नाही. पूर्वीच्या गदर एक प्रेम कथा मधील हिंदुस्तान जिंदाबाद हा संवाद प्रेक्षकांना परत एकदा देशभक्तीचा बुस्टर डोस दिल्याशिवाय राहत नाही.
चित्रपटात सुरुवातीला पूर्वीची कथा प्रेक्षकांना ऐकवण्यासाठी नाना पाटेकरचा आवाज देण्यात आलेला आहे. नाना पाटेकरचा आवाज म्हटल्यानंतर प्रेक्षकांना नव्याने सांगण्याची गरज नाही. गदर-2 ची सुरुवात खूपच जबरदस्त आहे. तारासिंगला सकीना कशी भेटते, त्यांच्यात प्रेम कसे होते, हे सर्व नाना पाटेकर कथेची पार्श्वभूमी मध्ये आपल्या शैलीत सांगत आहे. पूर्वीचा तारासिंग एक ट्रक ड्रायव्हर आहे.
चित्रपटाचा दिग्दर्शक अनिल शर्मा येथेच यशस्वी होताना दिसत आहे की, त्यांनी त्यांच्या प्रेक्षक वर्गाला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जो पूर्वीच्या गदर मध्ये आपल्याला दिसून येत होता. वेगवेगळ्या प्रेक्षक वर्गाला जपण्याचा प्रयत्न केला असता तर,चित्रपटाच्या दिग्दर्शनात चुका नक्कीच झाल्या असत्या. मूळ गदर सारखा चित्रपट झाला आहे असे ठामपणे सांगता येणार नाही.
हे ही वाचा
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा ” हा उपक्रम कसा असणार आहे संपुर्ण माहिती.
पूर्वीच्या गदर जिथे संपला होता तिथून या गदर-2 ने टेकऑफ केले आहे. पूर्वीची पात्रे आणि आताची पात्रे इतक्या वर्षानंतर ही त्यांचे धागे एकत्र करण्यात अनिल शर्मा यशस्वी होताना दिसत आहे. बॉलीवूड वर बऱ्यापैकी शहरांचे प्रभाव आहेत. पण सनी देओल सारख्या स्टारला मात्र गाव निमशहरी प्रेक्षकांशी कनेक्ट होण्यास वेळ लागत नाही. ज्यावेळी गदर -2 मधील संवाद सनी देओल फेकतो तेव्हा थेटर मध्ये हंगामा झाल्याशिवाय राहत नाही. गदर-2 वास्तव सिनेमाच्या फुटपट्टीवर मोजता येण्याइतपत पात्र नाही. पण मनोरंजनाचे खणखणीत नाणी आहे असे शंभर टक्के सांगता येईल.
चित्रपटात fight seen जे आहे ते काल्पनिक वाटतात. म्हणजे त्याला कोणतेही लॉजिक दिसत नाही. पण मनोरंजन आणि देश प्रेमाच्या वाहत्या प्रवाहात बाकी सगळं विसरून जाते. अमरीश पुरीच्या ठिकाणी ज्या खलनायकाने भूमिका केलेली आहे ती अत्यंत लाजवाब आहे. कुठेही अमरीश पुरी ची आठवण येत नाही. या चित्रपटात तुफान डायलॉग बाजी आहे. हेच डायलॉग प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. त्यामुळे शिट्ट्या मारायला प्रेक्षक मागे पुढे पाहत नाहीत,ओरडतात असे दिसून येत आहे.
हे ही वाचा
चित्रपटाचे संगीत उठावदार आहे. उत्तम सिंग यांनी जी गाणी पूर्वीच्या गदर ला दिलेली होती ती नव्याने बनवण्यात आलेली आहेत. त्यामुळे पूर्वीचा धागा जोडताना गदर-2 ला काही समस्या येत नाहीत. सर्वच प्रेक्षकांना आवडो किंवा न आवडो पण बॉक्स गदर-2 ची ऑफिसवर त्सुनामी येणार यात वाद नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन असल्याने याचा फायदा सुद्धा गदर-2 या चित्रपटाला होईल यात शंका नाही. चित्रपट मनोरंजक आहे, प्रेक्षकांना पकडून ठेवणार आहे, मनोरंजन 100 टक्के होणार यात दुमत नाही.
संपादक आणि संचालक : नम्रता जानकर
बातमी व जाहिरातीसाठी
📲संपर्क : 94227 77680